मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल ७:११सुमारे इ.स.पू. ११२०

    तेव्हा इस्राएली लोक मिस्पाहातून पलिष्ट्यांचा पाठलाग करीत बाहेर आले आणि बेथ-कार पर्यंत त्यांना जिवे मारीत गेले.

  2. 1 शमुवेल ७:१२सुमारे इ.स.पू. ११२०

    नंतर शमुवेलाने एक दगड घेतला आणि तो मिस्पाह आणि शेन यांच्यामध्ये उभारला. “येथपर्यंत याहवेहने आमचे साहाय्य केले आहे” असे म्हणत त्याने त्याला एबेन-एजर असे नाव दिले.

  3. 1 शमुवेल ७:१३सुमारे इ.स.पू. ११२०

    अशाप्रकारे पलिष्टी लोक पराभूत झाले आणि त्यांनी इस्राएलच्या सीमेवर पुन्हा हल्ला केला नाही आणि शमुवेलच्या सर्व जीवनकाळात याहवेहचा हात पलिष्ट्यांविरुद्ध होता.

  4. 1 शमुवेल ७:१४सुमारे इ.स.पू. ११२०

    एक्रोनपासून गथपर्यंत पलिष्ट्यांनी जी नगरे इस्राएलपासून ताब्यात घेतली होती ती इस्राएली लोकांस परत मिळाली आणि इस्राएली लोकांनी आसपासच्या प्रदेश सोडवून घेतला. व इस्राएली व अमोरी लोकात शांतता होती.

  5. 1 शमुवेल ७:१५सुमारे इ.स.पू. ११३१

    शमुवेल आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसांत इस्राएलचा शास्ता होऊन न्याय करीत होता.

  6. 1 शमुवेल ७:१६सुमारे इ.स.पू. ११३१

    प्रतिवर्षी तो बेथेल, गिलगाल, मिस्पाह येथे अनुक्रमाने इस्राएलचा न्याय करीत फिरत असे.

  7. 1 शमुवेल ७:१७सुमारे इ.स.पू. ११३१

    पण तो रामाह येथे, जिथे तो राहत होता तिथे परत जात असे आणि तिथेही तो इस्राएलचा न्याय करीत असे. आणि त्याने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली होती.

  8. 1 शमुवेल ८:१सुमारे इ.स.पू. १११२

    जेव्हा शमुवेल उतार वयाचा झाला, तेव्हा त्याने त्याच्या मुलांना इस्राएलचे पुढारी म्हणून नेमले.

  9. 1 शमुवेल ८:२सुमारे इ.स.पू. १११२

    त्याच्या प्रथमपुत्राचे नाव योएल आणि दुसर्‍याचे नाव अबीयाह असे होते आणि त्यांनी बेअर-शेबा येथे सेवा केली.

  10. 1 शमुवेल ८:३सुमारे इ.स.पू. १११२

    परंतु त्याच्या पुत्रांनी त्याचे अनुकरण केले नाही. ते अप्रामाणिकपणे लाभ मिळविण्याच्या मागे लागले आणि लाच स्वीकारून विपरीत न्याय करत.

  11. 1 शमुवेल ८:४सुमारे इ.स.पू. १११२

    म्हणून इस्राएलचे सर्व पुढारी एकत्र झाले आणि रामाह येथे शमुवेलकडे आले.

  12. 1 शमुवेल ८:५सुमारे इ.स.पू. १११२

    ते शमुवेलला म्हणाले, “तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाहीत; तर आता जसे इतर राष्ट्रांना आहे त्याप्रमाणे आमचेही नेतृत्व करण्यासाठी एक राजा नेमून द्यावा.”

  13. 1 शमुवेल ८:६सुमारे इ.स.पू. १११२

    परंतु जेव्हा ते म्हणाले, “आमचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला एक राजा नेमून द्या,” त्यामुळे शमुवेल दुःखी झाला; आणि त्याने याहवेहकडे प्रार्थना केली.

  14. 1 शमुवेल ८:७सुमारे इ.स.पू. १११२

    तेव्हा याहवेहने शमुवेलला सांगितले: “लोक तुला जे सांगत आहेत ते सगळे ऐक; त्यांनी तुझा नकार नाही तर त्यांचा राजा म्हणून त्यांनी माझा नकार केला आहे.

  15. 1 शमुवेल ८:८सुमारे इ.स.पू. १११२

    मी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी असेच केले आहे, त्यांनी माझा त्याग करून इतर दैवतांची सेवा केली, तसेच ते तुझ्याशीही करीत आहेत.

  16. 1 शमुवेल ८:९सुमारे इ.स.पू. १११२

    आता त्यांचे ऐकून घे; परंतु त्यांना गंभीरपणे चेतावणी दे, जो राजा त्यांच्यावर राज्य करेल तो त्यांच्याकडून त्याला हवे ते हक्काने मागेल हे त्यांना माहीत होऊ दे.”

  17. 1 शमुवेल ८:१०सुमारे इ.स.पू. १११२

    शमुवेलाने याहवेहचे सर्व शब्द त्या लोकांना सांगितले जे त्यांच्याकडे राजा मागत होते.

  18. 1 शमुवेल ८:११सुमारे इ.स.पू. १११२

    शमुवेल म्हणाला, “जो राजा तुमच्यावर राज्य करेल तो या गोष्टी तुमच्याकडून हक्काने मागेल: तो तुमचे पुत्र घेईल आणि त्यांना त्याचे रथ आणि घोडे यांच्याबरोबर सेवा करावयास लावील आणि ते त्याच्या रथांच्या पुढे धावतील.

  19. 1 शमुवेल ८:१२सुमारे इ.स.पू. १११२

    त्यातील काहींना हजारांवर तर काहींना पन्नासांवर तो सरदार म्हणून नेमील, आणि इतरांना जमीन नांगरण्याचे आणि पिकांची कापणी करण्यास व काहींना युद्धाची शस्त्रे आणि त्याच्या रथांसाठी हत्यारे तयार करण्यास लावील.

  20. 1 शमुवेल ८:१३सुमारे इ.स.पू. १११२

    तो तुमच्या कन्यांना अत्तरे तयार करणार्‍या, स्वयंपाकिणी व भटारणी असे करेल.

  21. 1 शमुवेल ८:१४सुमारे इ.स.पू. १११२

    तो तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे घेईल आणि त्याच्या सेवकांस देईल.

  22. 1 शमुवेल ८:१५सुमारे इ.स.पू. १११२

    तो तुमच्या धान्यातील व द्राक्षमळे यांचा दहावा हिस्सा घेऊन त्याच्या अधिकाऱ्यांना आणि सेवकांना देईल.

  23. 1 शमुवेल ८:१६सुमारे इ.स.पू. १११२

    तुमचे दास व दासी आणि तुमचे उत्तम पशू व गाढवे तो स्वतःच्या उपयोगासाठी घेईल.

  24. 1 शमुवेल ८:१७सुमारे इ.स.पू. १११२

    तो तुमच्या कळपांचा दहावा हिस्सा घेईल आणि तुम्ही त्याचे गुलाम व्हाल.

  25. 1 शमुवेल ८:१८सुमारे इ.स.पू. १११२

    जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तुम्ही निवडून घेतलेल्या राजापासून सुटका मिळावी म्हणून तुम्ही रडाल, परंतु याहवेह त्या दिवशी तुमचे ऐकणार नाही.”