मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल ४:१६सुमारे इ.स.पू. ११४१

    त्याने एलीला सांगितले, “मी आताच युद्धभूमीवरून आलो आहे; मी आजच तिथून पळून आलो आहे.” एलीने विचारले, “माझ्या मुला, काय घडले आहे?”

  2. 1 शमुवेल ४:१७सुमारे इ.स.पू. ११४१

    ज्या मनुष्याने बातमी आणली होती त्याने उत्तर दिले, “इस्राएलने पलिष्ट्यांपुढून पळ काढला आणि सैन्याचा मोठा वध झाला. तुझे दोघे पुत्र होफनी आणि फिनहास सुद्धा मारले गेले आहेत आणि परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.”

  3. 1 शमुवेल ४:१८सुमारे इ.स.पू. ११४१

    जेव्हा त्याने परमेश्वराच्या कोशाचा उल्लेख केला, एली वेशीजवळच्या आसनावरून मागे खाली पडला. त्याची मान मोडली आणि तो मरण पावला, कारण तो वृद्ध आणि जड अंगाचा मनुष्य होता. त्याने चाळीस वर्षे इस्राएली लोकांचे पुढारीत्व केले होते.

  4. 1 शमुवेल ४:१९सुमारे इ.स.पू. ११४१

    त्याची सून फिनहासाची पत्नी, तेव्हा गरोदर असून तिचा प्रसूतिकाळ जवळ आला होता. जेव्हा तिने ऐकले की, परमेश्वराचा कोश हस्तगत केला गेला आहे आणि तिचा सासरा आणि तिचा पती मरण पावले आहेत, तेव्हा तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या व ती प्रसूत झाली, परंतु तिच्या प्रसूती वेदनांनी तिच्यावर मात केली.

  5. 1 शमुवेल ४:२०सुमारे इ.स.पू. ११४१

    तिच्या मरणाच्या वेळी, तिच्या सभोवताली ज्या स्त्रिया होत्या, त्या म्हणाल्या, “भिऊ नकोस; तू एका मुलाला जन्म दिलेला आहेस.” परंतु तिने काही उत्तर दिले नाही किंवा लक्षही दिले नाही.

  6. 1 शमुवेल ४:२१सुमारे इ.स.पू. ११४१

    त्या मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवत ती म्हणाली, “इस्राएलचे वैभव निघून गेले आहे,” कारण परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे आणि तिच्या सासर्‍याचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे.

  7. 1 शमुवेल ४:२२सुमारे इ.स.पू. ११४१

    ती म्हणाली, “इस्राएलमधून वैभव निघून गेले आहे, परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.”

  8. 1 शमुवेल ५:१सुमारे इ.स.पू. ११४१

    परमेश्वराचा कोश पलिष्टी सैन्याने हस्तगत केल्यानंतर त्यांनी तो एबेन-एजर येथून अश्दोदकडे नेला.

  9. 1 शमुवेल ५:२सुमारे इ.स.पू. ११४१

    नंतर पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश दागोनच्या मंदिरात नेला आणि दागोनच्या मूर्तीच्या बाजूला ठेवला.

  10. 1 शमुवेल ५:३सुमारे इ.स.पू. ११४१

    जेव्हा अश्दोदचे लोक दुसर्‍या दिवशी पहाटे उठले, तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्यांनी दागोनला उचलले आणि पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले.

  11. 1 शमुवेल ५:४सुमारे इ.स.पू. ११४१

    परंतु दुसर्‍या दिवशी पहाटे जेव्हा ते उठले तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्याचे डोके आणि हात तुटून ते दाराच्या उंबरठ्यावर पडलेले होते; फक्त त्याचे शरीर तसेच होते.

  12. 1 शमुवेल ५:५सुमारे इ.स.पू. ११४१

    त्यामुळेच आजपर्यंत दागोनचे पुजारी किंवा जे अश्दोद येथे दागोनच्या मंदिरात जातात ते उंबरठ्यावर पाय ठेवीत नाहीत.

  13. 1 शमुवेल ५:६सुमारे इ.स.पू. ११४१

    याहवेहचा हात अश्दोद व त्याच्या जवळच्या भागातील लोकांवर भारी होता; याहवेहने त्यांच्यावर विध्वंस आणला आणि त्यांना पीडेच्या गाठींनी पीडले.

  14. 1 शमुवेल ५:७सुमारे इ.स.पू. ११४१

    जे घडत होते ते अश्दोदच्या लोकांनी पाहिले, तेव्हा ते म्हणाले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश येथे आमच्यामध्ये असू नये, कारण त्यांचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोन याच्यावर भारी आहे.”

  15. 1 शमुवेल ५:८सुमारे इ.स.पू. ११४१

    तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्‍यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “इस्राएलच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” त्यांनी उत्तर दिले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश गथकडे घेऊन जा.” तेव्हा त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश तिथून हालविला.

  16. 1 शमुवेल ५:९सुमारे इ.स.पू. ११४१

    परंतु त्यांनी कोश हालविल्यानंतर, याहवेहचा हात त्या शहराच्या विरुद्ध उठला आणि ते फार घाबरून गेले. परमेश्वराने त्या शहरातील लहान मोठ्यांना पीडेच्या गाठींनी पीडले.

  17. 1 शमुवेल ५:१०सुमारे इ.स.पू. ११४१

    म्हणून त्यांनी परमेश्वराचा कोश एक्रोन येथे पाठविला. परमेश्वराचा कोश एक्रोनमध्ये प्रवेश करताच एक्रोनचे लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “आम्हाला आणि आमच्या लोकांनी मारावे म्हणून त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश आमच्याकडे आणला आहे.”

  18. 1 शमुवेल ५:११सुमारे इ.स.पू. ११४१

    तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्‍यांना एकत्र बोलाविले आणि म्हटले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश दूर पाठवून द्या; त्याच्या मूळ ठिकाणी त्याला जाऊ द्या, नाहीतर तो आम्हाला आणि आमच्या लोकांना जिवे मारेल.” कारण शहरात मृत्यूमुळे भय पसरले होते; परमेश्वराचा हात त्यावर फार भारी होता.

  19. 1 शमुवेल ५:१२सुमारे इ.स.पू. ११४१

    जे मरण पावले नाही ते पीडेच्या गाठींनी पीडित झाले होते व त्या शहराचा आक्रोश स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचला.

  20. 1 शमुवेल ६:१सुमारे इ.स.पू. ११४०

    याहवेहचा कोश सात महिने पलिष्टी देशात होता,

  21. 1 शमुवेल ६:२सुमारे इ.स.पू. ११४०

    तेव्हा पलिष्ट्यांनी याजकांस आणि दैवप्रश्न पाहणार्‍यांस बोलाविले आणि विचारले, “आम्ही याहवेहच्या कोशाचे काय करावे? त्याच्या मूळ ठिकाणी आम्ही तो कसा पाठवावा.”

  22. 1 शमुवेल ६:३सुमारे इ.स.पू. ११४०

    ते म्हणाले, “जर तुम्ही इस्राएलच्या परमेश्वराचा कोश परत पाठवित आहात, तर तो त्यांच्याकडे भेटीशिवाय पाठवू नये! दोषार्पण तर अवश्य पाठवा. म्हणजे तुम्ही बरे व्हाल आणि त्यांचा हात तुमच्यापासून का दूर होत नाही हे तुम्हाला समजेल.”

  23. 1 शमुवेल ६:४सुमारे इ.स.पू. ११४०

    पलिष्ट्यांनी विचारले, “जे दोषार्पण आम्ही त्यांच्याकडे पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्टी अधिकार्‍यांच्या संख्येप्रमाणे पीडेच्या गाठींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हाला व तुमच्या अधिकार्‍यांना त्याच पीडांनी पीडले आहे.

  24. 1 शमुवेल ६:५सुमारे इ.स.पू. ११४०

    ज्यामुळे देशाचा नाश होत आहे त्या पीडेच्या गाठींच्या आणि उंदरांच्या प्रतिमा तयार करा आणि इस्राएलच्या देवाला गौरव द्या. कदाचित तुमच्यावरून आणि तुमच्या दैवतावरून आणि तुमच्या देशावरून ते त्यांचा हात काढून घेतील.

  25. 1 शमुवेल ६:६सुमारे इ.स.पू. ११४०

    फारोह व इजिप्तच्या लोकांनी केली तशी तुम्ही तुमची हृदये कठीण का करता? इस्राएलच्या याहवेहने त्यांना कठोरपणाने वागविले होते, म्हणून इस्राएली लोकांना त्यांनी जाऊ दिले नव्हते का?