मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल २:२३सुमारे इ.स.पू. ११६५

    तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशी कर्मे का करता? तुमच्या दुष्ट कृत्यांबद्दल सर्व लोकांकडून मी ऐकत आहे.

  2. 1 शमुवेल २:२४सुमारे इ.स.पू. ११६५

    नाही, माझ्या मुलांनो; याहवेहच्या लोकांमध्ये पसरत असलेला अहवाल जो मी ऐकत आहे तो चांगला नाही.

  3. 1 शमुवेल २:२५सुमारे इ.स.पू. ११६५

    जर एक व्यक्ती दुसर्‍याविरुद्ध पाप करते, तर परमेश्वर त्या अपराध्यासाठी मध्यस्थी करतील; परंतु जर कोणी याहवेहविरुद्ध पाप केले तर त्यांच्यासाठी कोण मध्यस्थी करेल?” तरीही त्याच्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या निषेधाकडे लक्ष दिले नाही, कारण त्यांना जिवे मारावे अशी याहवेहची इच्छा होती.

  4. 1 शमुवेल २:२६सुमारे इ.स.पू. ११६५

    आणि शमुवेल बाळ याहवेहच्या आणि लोकांच्या कृपेत वाढत गेला.

  5. 1 शमुवेल २:२७सुमारे इ.स.पू. ११६५

    परमेश्वराचा एक मनुष्य एलीकडे आला आणि त्याला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तुझे पूर्वज इजिप्तमध्ये फारोहच्या दास्यात असताना मी त्यांना स्पष्टपणे प्रगट झालो नाही काय?

  6. 1 शमुवेल २:२८सुमारे इ.स.पू. ११६५

    माझे याजक व्हावे, धूप जाळावे, माझ्या वेदीकडे जावे व माझ्या समक्षतेत एफोद घालावा म्हणून इस्राएलच्या सर्व गोत्रांतून मी तुझ्या पूर्वजांना निवडले. त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी दिलेले सर्व अन्नार्पण मी तुझ्या पूर्वजांच्या कुटुंबांला दिले.

  7. 1 शमुवेल २:२९सुमारे इ.स.पू. ११६५

    माझे जे यज्ञ व अर्पणे मी माझ्या मंदिरासाठी नेमून दिली आहेत त्याचा तुम्ही अवमान का करता? माझ्या इस्राएली लोकांनी केलेल्या अर्पणातून सर्वोत्तम भाग खाऊन तू स्वतःला पुष्ट करून माझ्यापेक्षा तुझ्या पुत्रांचा जास्त सन्मान का करतो?’

  8. 1 शमुवेल २:३०सुमारे इ.स.पू. ११६५

    “म्हणून याहवेह इस्राएलचे परमेश्वर, असे जाहीर करतात: ‘मी वचन दिले होते की, तुझ्या कुटुंबातील सदस्य सर्वकाळ माझ्यासमोर सेवा करतील.’ परंतु आता याहवेह असे जाहीर करतात: ‘ते माझ्यापासून दूर असो! जे माझा सन्मान करतात त्यांचा मी सन्मान करेन, परंतु जे माझा अवमान करतात त्यांचा अवमान होईल.’

  9. 1 शमुवेल २:३१सुमारे इ.स.पू. ११६५

    अशी वेळ येत आहे की, मी तुझी आणि तुझ्या याजकीय घराण्याची शक्ती कमी करेन, म्हणजे त्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाही,

  10. 1 शमुवेल २:३२सुमारे इ.स.पू. ११६५

    आणि माझ्या वस्तीत तू मोठे दुःख पाहशील. जरी इस्राएली लोकांचे भले केले जाईल तरी तुझ्या घराण्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाहीत.

  11. 1 शमुवेल २:३३सुमारे इ.स.पू. ११६५

    तुमच्यापैकी ज्यांना मी माझ्या वेदीवरील सेवा करण्यापासून दूर करणार नाही, त्यांच्यापैकी तुझी मात्र नजर मी क्षीण करेन व तुझ्या शक्तीचा नाश करेन आणि तुझे सर्व वंशज भर तारुण्यात मरतील.

  12. 1 शमुवेल २:३४सुमारे इ.स.पू. ११६५

    “ ‘आणि तुझे दोन पुत्र, होफनी आणि फिनहास यांच्यावर जे येईल, ते तुला एक चिन्ह असे असतील—ते दोघेही एकाच दिवशी मरण पावतील.

  13. 1 शमुवेल २:३५सुमारे इ.स.पू. ११६५

    मी माझ्यासाठी एक विश्वासू याजक पुढे आणेन, जो माझ्या अंतःकरणात आणि माझ्या मनात जे आहे त्यानुसार करेल. मी त्याचे याजकीय घराणे स्थिर स्थापित करेन आणि ते निरंतर माझ्या अभिषिक्तासमोर सेवा करतील.

  14. 1 शमुवेल २:३६सुमारे इ.स.पू. ११६५

    नंतर तुझ्या घराण्यातील राहिलेला प्रत्येकजण येईल आणि चांदीच्या तुकड्यासाठी आणि भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यासमोर वाकतील आणि विनंती करतील, “मला खाण्यासाठी अन्न असावे म्हणून माझ्यासाठी काही याजकीय पद द्या.” ’ ”

  15. 1 शमुवेल ३:१सुमारे इ.स.पू. ११६५

    शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली याहवेहची सेवा करीत होता. त्या दिवसात याहवेहचे वचन दुर्मिळ होते; दृष्टान्तही फारसे मिळत नसत.

  16. 1 शमुवेल ३:२सुमारे इ.स.पू. ११६५

    एका रात्री एलीची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला फारसे दिसत नव्हते, तो त्याच्या नेहमीच्या जागी पडून होता.

  17. 1 शमुवेल ३:३सुमारे इ.स.पू. ११६५

    परमेश्वराचा दीप अजूनही विझला नव्हता आणि शमुवेल याहवेहच्या घरात परमेश्वराचा कोश होता त्या ठिकाणी निजला होता.

  18. 1 शमुवेल ३:४सुमारे इ.स.पू. ११६५

    तेव्हा याहवेहने शमुवेलाला हाक मारली. शमुवेलाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”

  19. 1 शमुवेल ३:५सुमारे इ.स.पू. ११६५

    आणि तो धावत एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” परंतु एली म्हणाला, “मी बोलाविले नाही; परत जा आणि झोप.” तेव्हा तो गेला आणि झोपला.

  20. 1 शमुवेल ३:६सुमारे इ.स.पू. ११६५

    याहवेहने पुन्हा, “शमुवेल!” अशी हाक मारली आणि शमुवेल उठला आणि एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” एली म्हणाला, “माझ्या मुला, मी बोलाविले नाही; परत जा आणि झोप.”

  21. 1 शमुवेल ३:७सुमारे इ.स.पू. ११६५

    शमुवेलने तर अजूनही याहवेहला ओळखले नव्हते: याहवेहचे वचन आतापर्यंत त्याला प्रकट झाले नव्हते.

  22. 1 शमुवेल ३:८सुमारे इ.स.पू. ११६५

    याहवेहने तिसर्‍यांदा हाक मारली, “शमुवेल!” आणि शमुवेल उठला आणि एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” तेव्हा एलीला समजले की, याहवेह त्या बालकाला बोलावित होते.

  23. 1 शमुवेल ३:९सुमारे इ.स.पू. ११६५

    म्हणून एलीने शमुवेलास सांगितले, “जा आणि झोप आणि जर त्यांनी पुन्हा तुला हाक मारली, तर म्हण, ‘याहवेह, बोला, कारण, तुमचा सेवक ऐकत आहे.’ ” तेव्हा शमुवेल गेला आणि त्याच्या जागेवर झोपला.

  24. 1 शमुवेल ३:१०सुमारे इ.स.पू. ११६५

    याहवेह आले आणि तिथे उभे राहिले आणि इतर वेळेप्रमाणे हाक मारली, “शमुवेल! शमुवेल!” तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोला, तुमचा सेवक ऐकत आहे.”

  25. 1 शमुवेल ३:११सुमारे इ.स.पू. ११६५

    आणि याहवेह शमुवेलास म्हणाले: “पाहा, मी इस्राएलमध्ये असे काहीतरी करणार आहे, जे ऐकून प्रत्येकाचे कान भणभणतील.