मुख्य मजकुरावर जा

circa 1050–1010 BC

Samuel & King Saul

Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.

810 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. 1 शमुवेल १:२६सुमारे इ.स.पू. ११६५

    आणि हन्ना त्याला म्हणाली, “माझ्या स्वामी, मला क्षमा करा. तुमच्या जीविताची शपथ, मी तीच स्त्री आहे जी येथे तुमच्या बाजूला उभी राहून याहवेहकडे प्रार्थना करीत होती.

  2. 1 शमुवेल १:२७सुमारे इ.स.पू. ११६५

    या बाळासाठी मी प्रार्थना केली, आणि याहवेहकडे मी जे मागितले त्यांनी ते मला दिले आहे.

  3. 1 शमुवेल १:२८सुमारे इ.स.पू. ११६५

    तर मी आता त्याला याहवेहला समर्पित करीत आहे. त्याचे संपूर्ण जीवनभर तो याहवेहसाठी दिलेला आहे.” आणि त्याने तिथे याहवेहची उपासना केली.

  4. 1 शमुवेल २:१सुमारे इ.स.पू. ११६५

    तेव्हा हन्नाहने प्रार्थना केली आणि म्हणाली: “माझे हृदय याहवेहमध्ये आनंद करीत आहे; याहवेहमध्ये माझे शिंग उंच केलेले आहे. माझे मुख माझ्या शत्रूंपुढे बढाई मारते, कारण याहवेहने दिलेल्या उद्धारात मी आनंद करते.

  5. 1 शमुवेल २:२सुमारे इ.स.पू. ११६५

    “याहवेहसारखे कोणीही पवित्र नाही; तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही; आमच्या परमेश्वरासारखा दुसरा कोणताही खडक नाही.

  6. 1 शमुवेल २:३सुमारे इ.स.पू. ११६५

    “फार गर्वाने बोलत राहू नका, किंवा तुमच्या मुखाला उद्धट बोलणे करू देऊ नका, कारण ते याहवेह परमेश्वर आहेत जे सर्वज्ञानी आहेत, आणि त्यांच्याद्वारे कृत्ये तोलली जातात.

  7. 1 शमुवेल २:४सुमारे इ.स.पू. ११६५

    “योद्ध्यांचे धनुष्य तुटलेले आहेत, परंतु जे अडखळले, ते शक्तीने सज्ज झाले आहेत.

  8. 1 शमुवेल २:५सुमारे इ.स.पू. ११६५

    ज्यांच्याकडे भरपूर होते ते आता अन्नासाठी मजुरी करीत आहेत, परंतु जे भुकेले होते ते आता भुकेले नाहीत. जी अपत्यहीन होती तिने सात लेकरांना जन्म दिला आहे, परंतु जिला अनेक मुले होती ती क्षीण झाली आहे.

  9. 1 शमुवेल २:६सुमारे इ.स.पू. ११६५

    “याहवेह मृत्यू आणतात आणि जिवंतही करतात; ते कबरेत घेऊन जातात आणि तिथून वरही काढतात.

  10. 1 शमुवेल २:७सुमारे इ.स.पू. ११६५

    गरिबी आणि संपत्ती याहवेह पाठवितात; ते नम्र करतात आणि उंचही तेच करतात.

  11. 1 शमुवेल २:८सुमारे इ.स.पू. ११६५

    ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्‍यातून वर उचलून घेतात; ते त्यांना राजपुत्रांबरोबर बसवितात, आणि त्यांना वतन म्हणून सन्मानाचे आसन प्राप्त होते. “कारण पृथ्वीचा पाया याहवेहचा आहे; त्यावरच त्यांनी जग स्थापले आहे.

  12. 1 शमुवेल २:९सुमारे इ.स.पू. ११६५

    ते आपल्या प्रामाणिक सेवकांची पावले सांभाळतील, परंतु दुष्ट अंधकारमय ठिकाणी शांत केले जातील. “कोणीही बळाने विजय पावत नाही;

  13. 1 शमुवेल २:१०सुमारे इ.स.पू. ११६५

    जे याहवेहचा विरोध करतात त्यांचा चुराडा होईल. सर्वश्रेष्ठ याहवेह स्वर्गातून गर्जना करतील; पृथ्वीच्या शेवटचा न्याय याहवेह करतील. “ते आपल्या राजाला सामर्थ्य देतील, आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करतील.”

  14. 1 शमुवेल २:११सुमारे इ.स.पू. ११६५

    नंतर एलकानाह रामाह येथे त्याच्या घरी गेला, परंतु तो मुलगा शमुवेल एली याजकाच्या हाताखाली याहवेहसमोर सेवा करू लागला.

  15. 1 शमुवेल २:१२सुमारे इ.स.पू. ११६५

    एलीचे पुत्र अतिशय नीच होते; ते याहवेहचा आदर करीत नसत.

  16. 1 शमुवेल २:१३सुमारे इ.स.पू. ११६५

    याजकांची अशी रीत होती की, ज्यावेळेस लोकांमधील कोणी यज्ञार्पण केले व जेव्हा ते मांस शिजविले जात असे, तेव्हा याजकांचा सेवक तीन टोके असलेला काटा घेऊन येत असे

  17. 1 शमुवेल २:१४सुमारे इ.स.पू. ११६५

    आणि परातीत किंवा पातेल्यात किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा टाकून जितके मांस त्या काट्याने वरती येईल याजक ते आपल्या स्वतःसाठी घेत असे, शिलोह येथे आलेल्या सर्व इस्राएल लोकांशी ते असाच व्यवहार करीत असत.

  18. 1 शमुवेल २:१५सुमारे इ.स.पू. ११६५

    परंतु चरबी जळण्याच्या आधी, याजकाचा सेवक येऊन यज्ञ करीत असलेल्या व्यक्तीला म्हणत असे, “भाजून घेण्यासाठी याजकाला थोडे मांस दे; तो तुझ्याकडून शिजविलेले मांस स्वीकारणार नाही, तर कच्चेच मांस घेईल.”

  19. 1 शमुवेल २:१६सुमारे इ.स.पू. ११६५

    जर तो व्यक्ती त्याला म्हणाला, “प्रथम चरबी जळू दे, त्यानंतर तुला हवे ते तू घे,” तो सेवक उत्तर देत असे, “नाही, ते आताच दे; जर तू दिले नाही, तर मी ते सक्तीने घेईन.”

  20. 1 शमुवेल २:१७सुमारे इ.स.पू. ११६५

    या तरुणांचे हे पाप याहवेहच्या दृष्टीने फार मोठे होते, कारण लोकांना याहवेहच्या अर्पणाचा तिरस्कार येऊ लागला होता.

  21. 1 शमुवेल २:१८सुमारे इ.स.पू. ११६५

    परंतु शमुवेल बालक तागाचे एफोद घालून याहवेहसमोर सेवा करीत होता.

  22. 1 शमुवेल २:१९सुमारे इ.स.पू. ११६५

    प्रत्येक वर्षी जेव्हा त्याची आई तिच्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करण्यासाठी जात, तेव्हा त्याच्यासाठी एक लहान झगा बनवून ती त्याला देत असे.

  23. 1 शमुवेल २:२०सुमारे इ.स.पू. ११६५

    एलकानाह आणि त्याची पत्नी यांना एली आशीर्वाद देताना म्हणे, “या स्त्रीने ज्याच्यासाठी प्रार्थना केली आणि याहवेहला दिले त्याच्या बदल्यात या स्त्रीपासून याहवेह तुला लेकरे देवो.” त्यानंतर ते त्यांच्या घरी जात असत.

  24. 1 शमुवेल २:२१सुमारे इ.स.पू. ११६५

    आणि हन्नाहवर याहवेहची कृपा होती; तिने तीन मुलांना आणि दोन मुलींना जन्म दिला. याकाळात शमुवेल बाळ याहवेहच्या उपस्थितीत वाढत गेला.

  25. 1 शमुवेल २:२२सुमारे इ.स.पू. ११६५

    आता एली, जो फार वृद्ध झाला होता, त्याची मुले सर्व इस्राएली लोकांशी कसा व्यवहार करीत होते आणि ज्या स्त्रिया सभामंडपाच्या प्रवेशद्वारात सेवा करीत होत्या त्यांच्याबरोबर त्यांनी जे कुकर्म केले त्या सर्वांविषयी त्याने ऐकले.