- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1050–1010 BC
Samuel & King Saul
Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.
या कालखंडातील वचने
- 1 शमुवेल १३:३सुमारे इ.स.पू. १०९३
गेबा येथील पलिष्ट्यांच्या ठाण्यावर योनाथानने हल्ला केला आणि पलिष्ट्यांनी याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने संपूर्ण प्रदेशामधून रणशिंग वाजवित म्हटले, “इब्री लोकांनो, ऐका!”
- 1 शमुवेल १३:४सुमारे इ.स.पू. १०९३
तेव्हा इस्राएली लोकांनी ही बातमी ऐकली: “शौलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर हल्ला केला आहे आणि पलिष्ट्यांसमोर इस्राएली लोक घृणित ठरले.” म्हणून लोकांना गिलगाल येथे शौलाबरोबर येण्यासाठी बोलाविण्यात आले.
- 1 शमुवेल १३:५सुमारे इ.स.पू. १०९३
तीन हजार रथ, सहा हजार रथस्वार आणि समुद्र किनार्यावरील वाळूइतके असंख्य सैनिक बरोबर घेऊन पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करण्यास एकत्र आले. त्यांनी मिकमाश येथे बेथ-आवेनच्या पूर्वेकडे आपला तळ दिला.
- 1 शमुवेल १३:६सुमारे इ.स.पू. १०९३
आपण पेचात पडलो आहोत आणि आपले सैन्य दबावात आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी पाहिले, तेव्हा ते गुहा आणि झुडूपे, खडक आणि कडे व विवरे यामध्ये लपले.
- 1 शमुवेल १३:७सुमारे इ.स.पू. १०९३
काही इब्री लोक तर यार्देनपासून गाद आणि गिलआदापलिकडे गेले. परंतु शौल गिलगालातच राहिला आणि जे लोक त्याच्याबरोबर होते ते भीतीने कंपित झाले होते.
- 1 शमुवेल १३:८सुमारे इ.स.पू. १०९३
शमुवेलने वेळ ठरविल्याप्रमाणे शौलाने सात दिवस वाट पाहिली; परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि शौलाची माणसे विखरू लागली.
- 1 शमुवेल १३:९सुमारे इ.स.पू. १०९३
तेव्हा तो म्हणाला, “होमार्पण आणि शांत्यर्पणे माझ्याकडे आणा.” आणि शौलाने होमार्पण केले.
- 1 शमुवेल १३:१०सुमारे इ.स.पू. १०९३
त्याने होमार्पणाची समाप्ती करताच शमुवेल आला आणि शौल त्याला अभिवादन करण्यास बाहेर गेला.
- 1 शमुवेल १३:११सुमारे इ.स.पू. १०९३
तेव्हा शमुवेलने विचारले, “तू हे काय केले आहेस?” शौलाने उत्तर दिले, “जेव्हा मी पाहिले की, लोक निघून जात आहेत आणि ठरविलेल्या वेळात तुम्ही आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिकमाश येथे जमत होते,
- 1 शमुवेल १३:१२सुमारे इ.स.पू. १०९३
मला वाटले, ‘आता पलिष्टी लोक गिलगाल येथे माझ्याविरुद्ध चाल करून येतील आणि मी अजूनही याहवेहकडून साहाय्यासाठी विनंती केली नाही.’ म्हणून होमार्पण करणे मला भाग पडले.”
- 1 शमुवेल १३:१३सुमारे इ.स.पू. १०९३
शमुवेल शौलास म्हणाला, “तू मूर्खपणा केला आहे, याहवेह तुझ्या परमेश्वरांनी दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही; जर पालन केले असते तर इस्राएलवरील तुझे राज्य याहवेहने सर्वकाळासाठी स्थापले असते.
- 1 शमुवेल १३:१४सुमारे इ.स.पू. १०९३
परंतु आता तुझे राज्य टिकणार नाही; याहवेहने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे आणि आपल्या लोकांचा अधिकारी म्हणून त्याला नेमले आहे. कारण तू याहवेहची आज्ञा पाळली नाही.”
- 1 शमुवेल १३:१५सुमारे इ.स.पू. १०९३
नंतर शमुवेलने गिलगाल सोडले व बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे गेला, आणि शौलाने त्याच्याबरोबर असलेल्या पुरुषांची मोजणी केली. त्यांची संख्या सुमारे सहाशे होती.
- 1 शमुवेल १३:१६सुमारे इ.स.पू. १०९३
शौल आणि त्याचा पुत्र योनाथान आणि त्यांच्याबरोबर असलेले पुरुष बिन्यामीन प्रांतामध्ये गेबा येथे राहिले. आणि पलिष्टी लोकांनी मिकमाश येथे तळ दिला.
- 1 शमुवेल १३:१७सुमारे इ.स.पू. १०९३
छापा टाकलेल्या टोळ्या पलिष्ट्यांच्या छावणीतून तीन तुकड्यांमध्ये बाहेर पडल्या. एक शूआल भागात ओफराहकडे गेली,
- 1 शमुवेल १३:१८सुमारे इ.स.पू. १०९३
दुसरी बेथ-होरोनकडे आणि तिसरी रानासमोर असलेले सेबोईम खोर्याच्या सीमेकडे गेली.
- 1 शमुवेल १३:१९सुमारे इ.स.पू. १०९३
त्या दिवसांत संपूर्ण इस्राएली देशात लोहार सापडत नव्हते, कारण पलिष्टी लोक म्हणाले होते, “कदाचित इब्री लोक तलवारी किंवा भाले तयार करतील!”
- 1 शमुवेल १३:२०सुमारे इ.स.पू. १०९३
म्हणून सर्व इस्राएली लोक त्यांचे फाळ, कुदळी, कुर्हाडी किंवा विळे यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात असत.
- 1 शमुवेल १३:२१सुमारे इ.स.पू. १०९३
नांगराचा फाळ व कुदळी यांना धार लावण्यासाठी दोन तृतीयांश शेकेल, व कुर्हाड, विळा आणि पराणीसाठी एकतृतीयांश शेकेल असा दर होता.
- 1 शमुवेल १३:२२सुमारे इ.स.पू. १०९३
म्हणून लढाईच्या दिवशी शौल आणि योनाथान यांच्याबरोबर असलेल्या कोणाही सैनिकांच्या हाती तलवार किंवा भाला नव्हता; केवळ शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याकडेच हत्यारे होती.
- 1 शमुवेल १३:२३सुमारे इ.स.पू. १०९३
तेव्हा पलिष्टी सैन्यांची एक तुकडी मिकमाशाच्या घाटाकडे गेली होती.
- 1 शमुवेल १४:१सुमारे इ.स.पू. १०८७
एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण पलिष्ट्यांच्या चौकीच्या पलीकडील बाजूला जाऊ.” परंतु त्याने त्याच्या वडिलांना हे सांगितले नाही.
- 1 शमुवेल १४:२सुमारे इ.स.पू. १०८७
शौल गिबियाहच्या बाहेरील हद्दीवर मिग्रोन येथे डाळिंबांच्या झाडाखाली राहत होता. त्याच्याबरोबर सहाशे लोक होते.
- 1 शमुवेल १४:३सुमारे इ.स.पू. १०८७
त्यापैकी एक एफोद घातलेला अहीयाह होता. तो शिलोहमध्ये जो याहवेहचा याजक होता त्या एलीचा पुत्र फिनहास, याचा पुत्र ईखाबोद, याचा भाऊ अहीतूब याचा पुत्र होता. योनाथान गेला आहे, हे कोणालाही माहीत नव्हते.
- 1 शमुवेल १४:४सुमारे इ.स.पू. १०८७
ज्या घाटांनी योनाथानने पलिष्ट्यांच्या चौकीवर जाण्याची योजना केली होती त्याच्या दोन्ही बाजूंनी शिखरे होती; एका शिखराचे नाव बोसेस व दुसर्याचे नाव सेनेह होते.