- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1050–1010 BC
Samuel & King Saul
Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.
या कालखंडातील वचने
- 1 शमुवेल १४:३०सुमारे इ.स.पू. १०८७
आपल्या शत्रूकडून मिळालेल्या लुटीतील लोकांनी काही खाल्ले तर किती बरे असते. पलिष्ट्यांचा संहार केल्याचा आनंद यापेक्षा मोठा असता काय?”
- 1 शमुवेल १४:३१सुमारे इ.स.पू. १०८७
त्या दिवशी मिकमाशपासून अय्यालोन पर्यंत पलिष्ट्यांना त्यांनी मारले होते, त्यामुळे ते अतिशय थकले होते.
- 1 शमुवेल १४:३२सुमारे इ.स.पू. १०८७
तेव्हा ते लुटीवर तुटून पडले, त्यांनी मेंढरे, गुरे व वासरे घेऊन त्यांना जमिनीवर कापले आणि ते रक्तासहित खाल्ले.
- 1 शमुवेल १४:३३सुमारे इ.स.पू. १०८७
मग कोणी शौलाला सांगितले, “पाहा, रक्तासहित मांस खाऊन लोक याहवेहविरुद्ध पाप करीत आहेत.” “तुम्ही विश्वासघात केला आहे,” तो म्हणाला, “एक मोठा दगड इकडे लवकर लोटत आणा.”
- 1 शमुवेल १४:३४सुमारे इ.स.पू. १०८७
तेव्हा शौल म्हणाला, “लोकांमध्ये जा आणि त्यांना सांग, ‘तुमच्यातील प्रत्येकाने तुमचे गुरे व मेंढरे माझ्याकडे आणा आणि त्यांना या ठिकाणी कापून खा. रक्तासहित मांस खाऊन याहवेहविरुद्ध पाप करू नका.’ ” तेव्हा सर्वांनी आपआपले बैल आणून त्या रात्री तिथे ते कापले.
- 1 शमुवेल १४:३५सुमारे इ.स.पू. १०८७
नंतर शौलाने याहवेहसाठी एक वेदी बांधली. शौलाने बांधलेली ही पहिलीच वेदी होती.
- 1 शमुवेल १४:३६सुमारे इ.स.पू. १०८७
शौल म्हणाला, “चला, आपण रात्री खाली जाऊन पलिष्ट्यांचा पहाटेपर्यंत पाठलाग करू आणि त्यांच्यातील एकालाही जिवंत सोडू नये.” लोक म्हणाले, “तुला जे उत्तम वाटेल ते कर.” परंतु याजकाने म्हटले, “याबाबत आपण परमेश्वराला विचारू.”
- 1 शमुवेल १४:३७सुमारे इ.स.पू. १०८७
तेव्हा शौलाने परमेश्वराला विचारले, “मी खाली जाऊन पलिष्ट्यांचा पाठलाग करावा काय? त्यांना तुम्ही इस्राएलच्या हाती देणार काय?” परंतु परमेश्वराने त्या दिवशी त्याला उत्तर दिले नाही.
- 1 शमुवेल १४:३८सुमारे इ.स.पू. १०८७
तेव्हा शौल म्हणाला, “जे सेनानायक आहात ते तुम्ही माझ्याकडे या आणि आज कोणते पाप घडले हे आपण शोधू.
- 1 शमुवेल १४:३९सुमारे इ.स.पू. १०८७
इस्राएलचा उद्धार करणारा याहवेह यांची शपथ, पापाचा दोष जरी माझा पुत्र योनाथान याच्यावर असला, तरी त्याने मरावे.” परंतु कोणीही काही बोलले नाही.
- 1 शमुवेल १४:४०सुमारे इ.स.पू. १०८७
तेव्हा शौल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “तुम्ही एका बाजूला उभे राहा; मी व माझा पुत्र योनाथान या बाजूला उभे राहतो.” लोक म्हणाले, “तुला जे उत्तम वाटेल ते कर.”
- 1 शमुवेल १४:४१सुमारे इ.स.पू. १०८७
शौलाने याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, “तुम्ही आपल्या सेवकाला आज उत्तर का दिले नाही? जर मी किंवा माझा पुत्र योनाथान दोषी आहे तर उरीमद्वारे ते दाखवावे, परंतु जर इस्राएलचे लोक दोषी आहेत, तर थुम्मीमद्वारे ते दाखवावे.” योनाथान व शौलाची चिठ्ठी निघाली आणि लोक त्यातून सुटले.
- 1 शमुवेल १४:४२सुमारे इ.स.पू. १०८७
शौल म्हणाला, “आता माझ्या व माझा पुत्र योनाथानवर चिठ्ठ्या टाका,” तेव्हा योनाथानची चिठ्ठी निघाली.
- 1 शमुवेल १४:४३सुमारे इ.स.पू. १०८७
शौलाने योनाथानला विचारले, “तू काय केलेस ते मला सांग.” योनाथानने उत्तर दिले, “माझ्या काठीच्या टोकावर घेऊन मी थोडा मध खाल्ला; परंतु आता मला मरणे भाग आहे.”
- 1 शमुवेल १४:४४सुमारे इ.स.पू. १०८७
शौल म्हणाला, “योनाथान, जर मी तुला मृत्युदंड दिला नाही, तर परमेश्वर माझ्याशी कठोरपणे वागो.”
- 1 शमुवेल १४:४५सुमारे इ.स.पू. १०८७
परंतु सैनिकांनी शौलाला म्हटले, “ज्याने इस्राएली लोकांस हा मोठा उद्धार आणला आहे, तो योनाथान मरावा काय? कदापि नाही! जिवंत याहवेहची शपथ, त्याच्या डोक्यावरील एक केसही खाली पडणार नाही, कारण त्याने आज जे केले ते परमेश्वराच्या साहाय्याने केले आहे.” याप्रकारे लोकांनी योनाथानला सोडविले आणि त्याला मृत्युदंड दिला नाही.
- 1 शमुवेल १४:४६सुमारे इ.स.पू. १०८७
यानंतर शौलाने पलिष्ट्यांचा पाठलाग करणे थांबविले आणि ते आपापल्या ठिकाणी परतले.
- 1 शमुवेल १४:४७सुमारे इ.स.पू. १०८७
इस्राएलवर आपले राज्य स्थापित केल्यावर, चहूकडील असलेले त्यांचे शत्रू: मोआब, अम्मोनी, एदोम, सोबाहचे राजे व पलिष्टी यांच्याशी शौल लढला. जिथे कुठे तो जाई, तिथे तो विजयी होई.
- 1 शमुवेल १४:४८सुमारे इ.स.पू. १०८७
तो शौर्याने लढला आणि त्याने अमालेक्यांचा पराभव केला आणि ज्यांनी इस्राएलला लुटले होते त्यांच्या हातूनही त्यांची सुटका केली.
- 1 शमुवेल १४:४९सुमारे इ.स.पू. १०८७
शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब इश्वी व मलकी-शुआ हे होते. त्याच्या थोरल्या मुलीचे नाव मेरब व धाकटीचे नाव मीखल होते.
- 1 शमुवेल १४:५०सुमारे इ.स.पू. १०८७
त्याच्या पत्नीचे नाव अहीनोअम होते, ती अहीमाजची कन्या होती. शौलाचा सेनापती, नेरचा पुत्र अबनेर होता आणि नेर शौलाचा काका होता.
- 1 शमुवेल १४:५१सुमारे इ.स.पू. १०८७
शौलाचा पिता कीश व अबनेरचा पिता नेर अबीएलचे पुत्र होते.
- 1 शमुवेल १४:५२सुमारे इ.स.पू. १०८७
शौलाच्या सर्व कारकिर्दीत इस्राएल व पलिष्ट्यांमध्ये घनघोर युद्ध होते, आणि जेव्हा शौलाला एखादा पराक्रमी किंवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या सेवेत सामील करीत असे.
- 1 शमुवेल १५:१सुमारे इ.स.पू. १०७९
शमुवेल शौलास म्हणाला, “इस्राएल लोकांवर राजा म्हणून तुझा अभिषेक करण्यास याहवेहने मलाच पाठवले होते; तर आता याहवेहचा संदेश ऐक.
- 1 शमुवेल १५:२सुमारे इ.स.पू. १०७९
सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात: ‘इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले त्यावेळी अमालेकी लोकांनी त्यांना रस्त्यात कसे अडविले, त्यासाठी मी त्यांना शिक्षा करणार.