- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1050–1010 BC
Samuel & King Saul
Israel demands a king; Samuel anoints Saul, whose disobedience leads to his rejection as God chooses a man after his own heart.
या कालखंडातील वचने
- 1 शमुवेल १४:५सुमारे इ.स.पू. १०८७
एक शिखर उत्तरेकडे मिकमाशासमोर आणि दुसरे दक्षिणेकडे गेबासमोर होते.
- 1 शमुवेल १४:६सुमारे इ.स.पू. १०८७
योनाथान त्याच्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंती लोकांच्या चौकीकडे जाऊ या. कदाचित याहवेह आपल्या बाजूने कार्य करतील, कारण याहवेहने आमचे तारण करू नये म्हणून त्यांना कोण अडखळविणार? मग ते पुष्कळांद्वारे असो किंवा थोडक्यांद्वारे.”
- 1 शमुवेल १४:७सुमारे इ.स.पू. १०८७
त्याचा शस्त्रवाहक म्हणाला, “तुझ्या मनामध्ये जे आहे ते कर, पुढे जा; मी माझ्या पूर्ण मनाने व जिवाने तुझ्याबरोबर आहे.”
- 1 शमुवेल १४:८सुमारे इ.स.पू. १०८७
योनाथान म्हणाला, “चल, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्या दृष्टीस पडू.
- 1 शमुवेल १४:९सुमारे इ.स.पू. १०८७
जर ते आपल्याला म्हणतील, ‘आम्ही तुमच्याकडे येईपर्यंत तिथेच थांबा,’ तर आपण जिथे आहोत तिथेच थांबू आणि त्यांच्यापर्यंत जाणार नाही.
- 1 शमुवेल १४:१०सुमारे इ.स.पू. १०८७
परंतु जर ते म्हणाले, ‘आमच्याकडे वर या,’ तर आपण चढून जाऊ, कारण याहवेहने त्यांना आपल्या हाती दिले आहे याचे ते चिन्ह असेल.”
- 1 शमुवेल १४:११सुमारे इ.स.पू. १०८७
जेव्हा ते दोघेजण पलिष्ट्यांच्या चौकीवर त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा पलिष्टी लोक म्हणाले, “पाहा, इब्री लोक ज्या बिळांमध्ये लपले होते त्यातून आता बाहेर येत आहेत.”
- 1 शमुवेल १४:१२सुमारे इ.स.पू. १०८७
चौकीवरील लोक योनाथान व त्याच्या शस्त्रवाहकाला ओरडून म्हणाले, “इकडे आमच्याकडे वर या, म्हणजे आम्ही तुम्हाला धडा शिकवू.” तेव्हा योनाथान शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, माझ्यामागे वर ये; कारण याहवेहने त्यांना इस्राएलच्या हाती दिले आहे.”
- 1 शमुवेल १४:१३सुमारे इ.स.पू. १०८७
योनाथान आपल्या हातापायांचा वापर करीत वर चढला, त्याच्यामागे त्याचा शस्त्रवाहक चढत गेला. पलिष्टी लोक योनाथानसमोर पडले व त्याचा शस्त्रवाहक त्याच्यामागे पलिष्ट्यांना मारत त्यांच्यामागे गेला.
- 1 शमुवेल १४:१४सुमारे इ.स.पू. १०८७
त्या पहिल्या हल्ल्यात योनाथान व त्याच्या शस्त्रवाहकाने सुमारे अर्ध्या एकर जमिनीवर वीस माणसे मारली.
- 1 शमुवेल १४:१५सुमारे इ.स.पू. १०८७
छावणीत व शेतात, चौकीवर व छापा टाकणारे अशा संपूर्ण सैन्यामध्ये भय निर्माण झाले; आणि भूमी हादरली, ते परमेश्वराकडून पाठविलेले भयंकर भय होते.
- 1 शमुवेल १४:१६सुमारे इ.स.पू. १०८७
इकडे बिन्यामीनच्या गिबियाहतील शौलाच्या पहारेकर्यांनी पाहिले की सैन्य विखरून सर्व दिशेने धावत जात आहे.
- 1 शमुवेल १४:१७सुमारे इ.स.पू. १०८७
तेव्हा शौलाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची हजेरी घ्या आणि आम्हाला कोण सोडून गेला आहे ते पाहा.” त्यांनी हजेरी घेतली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तिथे नव्हते.
- 1 शमुवेल १४:१८सुमारे इ.स.पू. १०८७
शौल अहीयाहला म्हणाला, “परमेश्वराचा एफोद इकडे आण,” (कारण त्यावेळी तो इस्राएली लोकांसोबत होता.)
- 1 शमुवेल १४:१९सुमारे इ.स.पू. १०८७
शौल याजकांबरोबर बोलत असताना, पलिष्ट्यांच्या छावणीतील गोंधळ अधिकच वाढत गेला. तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “थांब!”
- 1 शमुवेल १४:२०सुमारे इ.स.पू. १०८७
तेव्हा शौल व त्याचे लोक एकत्र जमा होऊन युद्धास निघाले. त्यांना पलिष्टी लोक मोठ्या गोंधळात, त्यांच्याच तलवारीने एकमेकास मारत असलेले दिसले.
- 1 शमुवेल १४:२१सुमारे इ.स.पू. १०८७
जे इब्री लोक आधी पलिष्ट्यांबरोबर होते व त्यांच्याबरोबर त्यांच्या छावणीत गेले होते, ते आता जे इस्राएली लोक शौल व योनाथान बरोबर होते त्यांच्याकडे गेले.
- 1 शमुवेल १४:२२सुमारे इ.स.पू. १०८७
एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात जे इस्राएली लोक लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की पलिष्ट्यांनी पळ काढला आहे त्यांनीही त्याच ईर्षेने युद्धात भाग घेतला.
- 1 शमुवेल १४:२३सुमारे इ.स.पू. १०८७
अशाप्रकारे त्या दिवशी याहवेहने इस्राएलची सुटका केली आणि युद्ध बेथ-आवेनच्या पलीकडे गेले.
- 1 शमुवेल १४:२४सुमारे इ.स.पू. १०८७
त्या दिवशी इस्राएल कष्टात होते, कारण शौलाने लोकांना असे म्हणत शपथबद्ध केले होते, “दिवस मावळण्यापूर्वी व मी माझ्या शत्रूंवर सूड घेईपर्यंत, जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!” त्यामुळे सैन्यातील कोणीही अन्न चाखले नाही.
- 1 शमुवेल १४:२५सुमारे इ.स.पू. १०८७
सर्व सैन्य जेव्हा रानात गेले, त्यावेळी जमिनीवर मध पडलेले होते.
- 1 शमुवेल १४:२६सुमारे इ.स.पू. १०८७
जेव्हा ते आत जंगलात गेले, तेव्हा त्यांनी मध वाहत असलेले पाहिले; परंतु कोणीही आपला हात तोंडाला लावला नाही, कारण त्यांना शपथेचे भय होते.
- 1 शमुवेल १४:२७सुमारे इ.स.पू. १०८७
परंतु आपल्या पित्याने लोकांना शपथबद्ध केले आहे याविषयी योनाथानला माहीत नव्हते, म्हणून त्याने त्याच्या हातात असलेल्या काठीचे टोक मधाच्या पोळ्यात घातले व ते खाल्ले आणि त्याचे डोळे टवटवीत झाले.
- 1 शमुवेल १४:२८सुमारे इ.स.पू. १०८७
नंतर त्याला एका सैनिकाने सांगितले, “तुझ्या पित्याने सैन्याला सक्त शपथेने बद्ध केले की ‘आज जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!’ म्हणूनच लोक खूप थकून गेले आहेत.”
- 1 शमुवेल १४:२९सुमारे इ.स.पू. १०८७
योनाथान म्हणाला, “माझ्या पित्याने देशावर कष्ट आणले आहे. हे थोडे मध चाखून माझे डोळे पाहा किती टवटवीत झाले आहेत.