Skip to content

Wives बद्दल बायबलमधील वचने

73 वचने · 37 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ती लोकर व ताग मिळविते आणि कामात गर्क राहून ते पिंजते.

  2. ती एका व्यापारी जहाजासारखी आहे, तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते.

  3. ती रात्र सरताच उठते; आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते.

  4. ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते; तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते.

  5. ती उत्साही व कष्टाळू आहे. कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत.

  6. तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते, आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही.

  7. ती तिच्या हातांमध्‍ये चाती धरते, आणि ती बोटांनी चरकी चालविते.

  8. ती गरिबांना उदारहस्ते देते आणि गरजूंना सढळ हाताने देते.

  9. हिवाळा येतो तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची चिंता करीत नसते; कारण ते सर्वजण किरमिजी वस्त्र घातलेले असतात.

  10. ती तिचा पलंग सजविण्यासाठी चादरी विणते; ती रेशमी तागाचा आणि जांभळा पोशाख घालते.

  11. तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो, जिथे तो देशातील पुढार्‍यांबरोबर बसतो.

  12. ती तागाची वस्त्रे करून विकते आणि व्यापार्‍यांना कमरबंद पुरविते.

  13. बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत. भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते.

  14. तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत. तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते.

  15. घरातील प्रत्येक गोष्टींवर तिचे बारकाईने लक्ष असते; आळसाने मिळवलेली भाकर ती कधीही खात नाही.

  16. तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात; आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो:

  17. कारण हेरोदाने योहानाला बांधून तुरुंगात टाकण्यासाठी हुकूम दिला होता. हेरोदाने हे यासाठी केले, की त्याचा भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिच्याशी त्याने विवाह केला होता.

  18. दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असून प्रभूच्या आज्ञा व नियम पालन करण्यामध्ये निर्दोष होते.

  19. आता हनन्याह नावाचा मनुष्य आणि त्याची पत्नी सप्पीरा या दोघांनी मिळून आपल्या संपत्तीचा एक भाग विकला.

  20. मिळालेल्या पैशातून काही पैसे त्याने त्याच्या पत्नीच्या पूर्ण संमतीने स्वतःसाठी ठेवले व बाकीचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणी ठेवले.

  21. तिथे त्याला पोनतस गावाचा अक्विला नावाचा एक यहूदी भेटला, तो त्याची पत्नी प्रिस्किल्लाला घेऊन इटली देशातून काही दिवसांपूर्वीच तिथे आलेला होता. कारण रोममधून सर्व यहूदी लोकांनी निघून जावे, अशी क्लौडियस सीझरने आज्ञा केली होती. पौल त्यांच्या भेटीला गेला,

  22. तो धैर्याने सभागृहामध्ये बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विला यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्या घरी आमंत्रित केले आणि परमेश्वराचा मार्ग त्याला अधिक स्पष्टपणे समजावून सांगितला.

  23. उदाहरणार्थ, लग्न झालेली स्त्री तिचा पती जिवंत असेपर्यंत त्याला बांधलेली असते, परंतु जर तिचा पती मरण पावला, तर ती ज्या नियमाद्वारे त्याला बांधलेली असते त्यापासून मुक्त होते.

  24. पती जिवंत असताना, तिने दुसर्‍या पुरुषाशी संबंध ठेवले तर तिला व्यभिचारिणी म्हणतात; पण पती मरण पावल्यावर ती त्या नियमापासून मुक्त होते; नंतर तिने दुसर्‍या पुरुषाशी विवाह केला, तर ती व्यभिचारिणी होत नाही.

  25. विवाहित स्त्री म्हणून असलेले सर्व हक्क पुरुषाने आपल्या पत्नीला द्यावेत, आणि पत्नीनेही आपल्या पतीसाठी तसेच करावे.