Wives बद्दल बायबलमधील वचने: Are diligent and prudent
Are diligent and prudent बद्दल वचने
ती लोकर व ताग मिळविते आणि कामात गर्क राहून ते पिंजते.
ती एका व्यापारी जहाजासारखी आहे, तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते.
ती रात्र सरताच उठते; आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते.
ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते; तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते.
ती उत्साही व कष्टाळू आहे. कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत.
तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते, आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही.
ती तिच्या हातांमध्ये चाती धरते, आणि ती बोटांनी चरकी चालविते.
ती गरिबांना उदारहस्ते देते आणि गरजूंना सढळ हाताने देते.
हिवाळा येतो तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची चिंता करीत नसते; कारण ते सर्वजण किरमिजी वस्त्र घातलेले असतात.
ती तिचा पलंग सजविण्यासाठी चादरी विणते; ती रेशमी तागाचा आणि जांभळा पोशाख घालते.
तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो, जिथे तो देशातील पुढार्यांबरोबर बसतो.
ती तागाची वस्त्रे करून विकते आणि व्यापार्यांना कमरबंद पुरविते.
बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत. भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते.
तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत. तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते.
घरातील प्रत्येक गोष्टींवर तिचे बारकाईने लक्ष असते; आळसाने मिळवलेली भाकर ती कधीही खात नाही.