मुख्य मजकुरावर जा

Prayer बद्दल बायबलमधील वचने

720 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे याहवेह, सर्वांना कळावे की जे काही होत आहे, ते सर्वकाही तुमच्याच हातांनी केले आहे.

  2. त्या सर्वांनी शाप दिले तरी तुम्ही मला आशीर्वादित करा; जे माझ्यावर हल्ला करतात, ते लज्जित होवोत, पण मी, तुमचा सेवक मात्र हर्षभरित होवो.

  3. माझे विरोधक एखाद्या वस्त्राप्रमाणे अनादर धारण करोत, आणि लज्जेने ते स्वतःस पांघरूण घेवोत.

  4. त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल; नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल.

  5. आमचे नको, हे याहवेह, आमचे नको, तुमची प्रेमदया आणि तुमच्या विश्वसनीयते निमित्त, तुमचेच नाव गौरवित होवो.

  6. इतर राष्ट्र असे का म्हणतात, “यांचा परमेश्वर कुठे आहे?”

  7. मी याहवेहवर प्रीती करतो, कारण त्यांनी माझी वाणी ऐकली; माझी दयेची विनवणी ऐकली.

  8. कारण त्यांनी आपला कान माझ्या हाकेकडे लावला, म्हणून आजीवन मी त्यांचा धावा करीत राहीन.

  9. तेव्हा मी याहवेहचा धावा करून म्हणालो: “हे याहवेह, मला वाचवा!”

  10. संकटात असताना मी याहवेहचा धावा केला; ते मला एका विशाल स्थळी घेऊन आले.

  11. मी तुम्हाला धन्यवाद देईन, कारण तुम्ही माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले; तुम्ही माझे तारण झाला आहात.

  12. मी माझ्या मार्गाचे वर्णन केले आणि तुम्ही मला उत्तर दिले; तुमचे नियम मला शिकवा.

  13. तुमच्या सेवकाला दिलेली अभिवचने पूर्ण करा, म्हणजे तुमचे भय कायम राहील.

  14. मग मला टोचून बोलणार्‍यांना मी उत्तर देईन, कारण तुमच्या अभिवचनांवर मी विश्वास ठेवतो.

  15. तुमचे सत्यवचन माझ्या मुखातून कधीही काढून घेऊ नका, कारण तुमच्या अधिनियमावर मी आशा ठेवली आहे.

  16. तुमच्या सेवकाला दिलेल्या अभिवचनाचे स्मरण करा, कारण तुम्हीच मला आशा दिली आहे;

  17. पूर्ण हृदयाने मी तुमचे मुख पाहण्याचा प्रयास करतो; आपल्या अभिवचनाप्रमाणे तुम्ही माझ्यावर कृपा करा.

  18. तुमच्या हातांनी मला घडविले आणि आकार दिला; आता तुमचे नियम समजण्यास मला सुबुद्धी द्या.

  19. गर्विष्ठ लोकांची अप्रतिष्ठा होवो, विनाकारण त्यांनी मजवर अन्याय केला आहे, परंतु मी तुमच्या नियमांचे मनन करेन.

  20. तुमच्या सेवकाने किती काळ वाट पाहावी? माझा छळ करणार्‍यांना तुम्ही कधी शिक्षा कराल?

  21. मी तुमचा आहे, माझे तारण करा; कारण मी तुमच्या विधीचा शोधक आहे.

  22. हे परमेश्वरा, तुमच्या अभिवचनानुसार माझे जतन करा, म्हणजे मी जिवंत राहीन; माझी आशाभंग होऊ देऊ नका.

  23. आपल्या प्रेमदयेस अनुसरून तुमच्या सेवकाशी व्यवहार करा आणि मला तुमचे नियम शिकवा.

  24. हे याहवेह, मी मनापासून धावा करीत आहे; मला उत्तर द्या, म्हणजे मी तुमच्या नियमांचे पालन करेन.

  25. मी आरोळी मारून म्हणतो, माझे रक्षण करा म्हणजे मी तुमच्या आज्ञा पाळू शकेन.