मुख्य मजकुरावर जा

Prayer बद्दल बायबलमधील वचने

720 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांचे भय बाळगणार्‍यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात; त्यांचा धावा ते ऐकतात आणि त्यांना संकटमुक्त करतात:

  2. मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील, आणि शहाणपण आत्मसात करण्यासाठी आक्रोश करशील,

  3. तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.

  4. तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा, आणि ते तुझे मार्ग सुकर करतील.

  5. दुष्ट ज्याला भितो, तेच त्याच्यावर येईल; नीतिमान मनुष्याच्या इच्छा फलद्रूप होतील.

  6. याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे, पण सात्विक लोकांची प्रार्थना त्यांना आनंद देते.

  7. याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात.

  8. अंतःकरणाच्या योजना मानव करतो, परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते.

  9. जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही, परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते.

  10. कपटी वागणे आणि असत्य बोलणे यापासून मला दूर ठेवा; मला दारिद्र्य किंवा श्रीमंतीही देऊ नका; परंतु फक्त माझी रोजची भाकर मला द्या.

  11. बोलण्यात उतावळा असू नको, परमेश्वरासमोर काहीही उच्चारण्यास आपल्या मनात घाई करू नकोस. कारण परमेश्वर स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे शब्द थोडकेच असू दे.

  12. प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत!

  13. “मला धिक्कार असो!” मी ओरडलो. “मी उद्ध्वस्त झालो! कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो आणि माझ्या डोळ्यांनी महाराज सर्वसमर्थ याहवेह यांचे मुखावलोकन केले आहे!”

  14. इजिप्त देशामध्ये सर्वसमर्थ याहवेहसाठी ते एक चिन्ह आणि साक्ष असतील. जेव्हा ते त्यांच्या जुलमी लोकांमुळे याहवेहकडे धावा करतील, तेव्हा ते त्यांच्याकडे एक तारणारा आणि रक्षक पाठवतील आणि ते त्यांना सोडवतील.

  15. हे याहवेह, ते त्यांच्या संकटात असताना तुमच्याकडे आले; जेव्हा तुम्ही त्यांना शिस्त लावली, तेव्हा ते कुजबुजत थोडीफार प्रार्थना करू शकत होते.

  16. यरुशलेममध्ये राहणाऱ्या सीयोनच्या लोकांनो, तुम्ही यापुढे रडणार नाही. जेव्हा तुम्ही मदतीसाठी हाक माराल, तेव्हा ते किती दयाळू असतील! तुमची हाक ऐकताच ते तुम्हाला उत्तर देतील.

  17. हे याहवेह, आम्हावर कृपा करा; आम्ही तुमची आस धरलेली आहे. रोज सकाळी तुम्ही आमचे सामर्थ्य व्हा, संकटाच्या वेळी आमचे तारण व्हा.

  18. आणि हिज्कीयाहने याहवेहला प्रार्थना केली:

  19. “अहो सर्वसमर्थ याहवेह इस्राएलांचे परमेश्वरा, करुबांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे तुम्ही एकमेव परमेश्वर आहात. स्वर्ग व पृथ्वी तुम्हीच उत्पन्न केली आहे.

  20. हे याहवेह, आपले कान लावा आणि ऐका; याहवेह, आपले डोळे उघडा आणि पाहा; आणि जिवंत परमेश्वराचा उपहास करण्यास पाठविलेले सन्हेरीबचे सर्व शब्द ऐका.

  21. “हे याहवेह, हे खरे आहे की अश्शूरच्या राजांनी या सर्व लोकांचा आणि त्यांच्या भूमीचा नाश केला आहे.

  22. आणि त्यांनी त्यांची दैवते अग्नीत फेकून दिली आहेत, कारण त्या मूर्ती परमेश्वर नव्हत्या. ते तर मनुष्याने घडविलेले लाकूड आणि दगड होते.

  23. आता हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, त्याच्या तावडीतून आम्हाला सोडव, म्हणजे याहवेह केवळ तुम्हीच परमेश्वर आहात, हे पृथ्वीवरील सर्व राज्यांना कळेल.”

  24. हे ऐकताच हिज्कीयाहने आपले तोंड भिंतीकडे वळविले आणि याहवेहकडे प्रार्थना केली,

  25. “हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला.