Skip to content

Oath बद्दल बायबलमधील वचने

85 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आता हेरोदाने आपली पत्नी हेरोदिया, जी पूर्वी त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी होती हिच्या मागणीनुसार योहानाला बांधून तुरुंगात ठेवले होते.

  2. कारण योहान त्याला म्हणत असे: “तू तिला ठेवावे हे नियमाने योग्य नाही.”

  3. म्हणून हेरोद त्याचा जीव घेण्यास पाहत होता, पण लोकांना तो भीत होता, कारण योहान संदेष्टा आहे असे लोक मानत होते.

  4. हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियेच्या कन्येने पाहुण्यांसाठी नृत्य करून हेरोदाला खूप संतुष्ट केले.

  5. त्यामुळे वचन देऊन ती जे मागेल ते देण्याची त्याने शपथ वाहिली.

  6. तिने आपल्या आईच्या संकेताप्रमाणे म्हटले, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर एका तबकात मला द्या.”

  7. तेव्हा राजा अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे त्याने मुलीची मागणी अंमलात आणण्यासाठी हुकूम दिला,

  8. आणि योहानाचा तुरुंगात शिरच्छेद करण्यात आला.

  9. त्याचे शिर एका तबकात आणून त्या मुलीला देण्यात आले व तिने ते आपल्या आईला दिले.

  10. योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि पुरले. नंतर जे घडले ते त्यांनी येशूंना सांगितले.

  11. तुम्ही असेही म्हणता, ‘मंदिरातील वेदीची शपथ घेतली आणि ती मोडली तरी चालेल,’ पण वेदीवरील दानाची शपथ घेतली तर तो त्यास बंधनकारक आहे.

  12. अहो आंधळ्यांनो, ती देणगी श्रेष्ठ आहे की त्या देणगीला पवित्र करणारी वेदी श्रेष्ठ आहे?

  13. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही वेदीची शपथ वाहता, त्यावेळी वेदीबरोबर वेदीवरील सर्व वस्तूंचीही शपथ वाहता.

  14. आणि ज्यावेळी तुम्ही मंदिराची शपथ वाहता, त्यावेळी मंदिराबरोबरच मंदिरात राहणार्‍या परमेश्वराचीही शपथ वाहता.

  15. ज्यावेळी तुम्ही स्वर्गाची शपथ वाहता, त्यावेळी तुम्ही परमेश्वराच्या सिंहासनाची आणि खुद्द परमेश्वराची शपथ वाहता.

  16. पण येशू शांत राहिले. नंतर महायाजकाने त्यांना विचारले, “जिवंत परमेश्वराच्या नावाने शपथ घालून मी तुला विचारतो की, परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस का?”

  17. तेव्हा राजा अतिशय अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे तिला नकार देणे त्याला बरे वाटले नाही.

  18. आणि त्यांनी आमचा पूर्वज अब्राहामाला शपथ देऊन वचन दिले:

  19. मग दुसर्‍या दिवशी सकाळी काही यहूद्यांनी कट करून शपथ घेतली की पौलाचा वध करेपर्यंत ते अन्न व पाणी सेवन करणार नाहीत.

  20. चाळीस किंवा त्याहून अधिक यहूदी या कटकारस्थानामध्ये सामील झाले.

  21. नंतर ते महायाजक व वडीलजनांकडे गेले आणि म्हणाले, “पौलाचा वध करेपर्यंत आम्ही अन्न सेवन करणार नाही, अशी कडक शपथ आम्ही घेतली आहे.

  22. परमेश्वराला मी माझा साक्षीदार म्हणून हाक मारतो—आणि माझे जीवन पणाला लावले आहे—तुमची गय करावी म्हणून मी करिंथास परतलो नाही.

  23. मी परमेश्वरासमोर तुम्हाला खात्री देतो की, मी जे तुम्हाला लिहित आहे त्यामध्ये काही खोटे नाही.

  24. मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”

  25. ते त्यांच्या विसाव्यात केव्हाही येणार नाहीत असे परमेश्वराने शपथ वाहून म्हटले, ते ज्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत, त्यांना नाही तर कोणाला बोलत होते?