Skip to content

Beth-aven

7 verses

31.8900, 35.2500 गूगल नकाशावर पाहा

Beth-aven चा उल्लेख असलेली वचने

  1. यहोशुआने काही माणसे यरीहोकडून आयकडे पाठविली, जे बेथेलच्या पूर्वेकडे बेथ-आवेनजवळ आहे आणि त्यांना म्हणाला, “जा आणि त्या प्रदेशाला हेरा.” तेव्हा ती माणसे निघाली आणि त्यांनी आय शहर हेरले.

  2. उत्तरेकडील सीमा यार्देन नदीजवळ सुरू होऊन ती यरीहोच्या उत्तरेच्या उतरणीस जाऊन नंतर पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून व बेथ-आवेनच्या रानातून गेलेली होती.

  3. तीन हजार रथ, सहा हजार रथस्वार आणि समुद्र किनार्‍यावरील वाळूइतके असंख्य सैनिक बरोबर घेऊन पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करण्यास एकत्र आले. त्यांनी मिकमाश येथे बेथ-आवेनच्या पूर्वेकडे आपला तळ दिला.

  4. अशाप्रकारे त्या दिवशी याहवेहने इस्राएलची सुटका केली आणि युद्ध बेथ-आवेनच्या पलीकडे गेले.

  5. “हे इस्राएला, जरी तू व्यभिचार केला आहेस, तरी यहूदाहला दोषी होऊ देऊ नकोस. “गिलगालकडे जाऊ नका; वर बेथ-आवेन येथे जाऊ नका. आणि ‘याहवेहच्या जीविताची शपथ!’ अशी शपथ घेऊ नका.

  6. “तुम्ही गिबियाहात शिंग फुंका, रामाह येथे कर्णा वाजवा. बेथ-आवेन येथे उंच आवाजात युद्धाची घोषणा करा; बिन्यामीन आमचे नेतृत्व करा.

  7. शोमरोनात राहणारे लोक बेथ-आवेनच्या वासरूच्या मूर्तीला घाबरतात. त्याचे लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचप्रमाणे त्याचे मूर्तिपूजक पुजारी करतील, जे पूर्वी त्याच्या वैभवात आनंदित होते. कारण ते वैभव त्यांच्याकडून हिसकावून त्यांना बंदिवासात नेण्यात आले आहे.