Skip to content

Oath बद्दल बायबलमधील वचने

85 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग मी रागाने शपथ घेतली की, ‘ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”

  2. हा करार त्यांनी अब्राहामाशी केला, आणि इसहाकाशी शपथ वाहिली,

  3. याहवेहनी दावीदाला शपथ घेऊन म्हटले की, एक अशी शपथ जी ते कधीही मोडणार नाहीत: “तुझ्या वंशजांपैकी एकाला मी तुझ्या राजासनावर विराजमान करेन.

  4. मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे.

  5. सर्वसमर्थ याहवेहनी शपथ घेतली आहे, “निश्चितच, मी जी योजना केली आहे, तसेच होईल, आणि जो माझा संकल्प आहे, त्याप्रमाणे हे घडून येईल.

  6. मी स्वतः शपथ वाहिली आहे, माझ्या मुखाने संपूर्ण प्रामाणिकपणाने हे शब्द उच्चारले आहेत ते हे शब्द आहेत, जे कधीही रद्द केले जाणार नाहीतः प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ माझ्या नावाने शपथ घेईल.

  7. “याकोबाच्या वंशजांनो, हे ऐका तुम्ही जे इस्राएल या नावाने ओळखले जाता, आणि यहूदाह वंशावळीतून येता, तुम्ही जे याहवेहच्या नावाने शपथ घेता आणि इस्राएलाच्या परमेश्वराचा धावा करता— परंतु सत्यतेत किंवा नीतिमत्तेत नव्हे—

  8. आणि जर सत्यतेने, न्यायीपणाने आणि नीतिमार्गाने चालशील, ‘जिवंत याहवेहची शपथ वाहशील,’ तर मग राष्ट्रे याहवेहच्या द्वारे आशीर्वादित होतील. आणि याहवेहच्या नामामध्ये त्यांचा गौरव करतील.”

  9. ‘जिवंत याहवेहची शपथ’ असे ते ओरडून म्हणतात पण ते ही खोटीच शपथ घेतात.”

  10. “मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली.

  11. परंतु पाहा, तुम्ही खोट्या आश्वासनावर भरवसा ठेवता जी निरर्थक आहेत.

  12. “ ‘तुम्ही चोरी, वध, व्यभिचार, खोट्या शपथा घेतल्या, बआल दैवत व तुम्हाला माहीत नसलेली इतर दैवते यांचे अनुसरण करून,

  13. तेव्हा मी तुमच्या पूर्वजांना वाहलेली शपथ पूर्ण करेन, आणि दूध व मध वाहणारा देश’ ज्यात आज तुम्ही राहत आहात तो मी तुम्हाला देईन.” मी उत्तर दिले, “याहवेह, आमेन.”

  14. आणि जर हे लोक माझे मार्ग शिकतील व माझ्या नावाने शपथ घेऊन म्हणतील, ‘जिवंत याहवेहची शपथ,’ जरी त्यांनी माझ्या लोकांना बआल दैवताच्या नावाची शपथ घेण्यास शिकविले—ते माझ्या लोकांमध्ये स्थिर केल्या जातील.

  15. परंतु जर तुम्ही या आज्ञेचे पालन नाही केले तर, याहवेह जाहीर करतात, मी माझी शपथ घेऊन इशारा देतो की, हा राजवाडा ओसाड होईल.’ ”

  16. याहवेह जाहीर करतात, मी माझ्या नावाची शपथ वाहून म्हणत आहे, बस्रा उद्ध्वस्त व शापित होईल, ते दहशत व उपहासाचा विषय बनतील; आणि त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील.”

  17. सर्वसमर्थ याहवेह, स्वतःच्याच नावाची शपथ घेतातः मी निश्चितच तुम्हाला टोळधाडीसारख्या असंख्य सैनिकांनी भरून टाकेन आणि लोक तुमच्यावरील विजयोन्मादाने गर्जना करतील.

  18. सर्व इस्राएली लोकांनी तुमच्या नियमांचे आज्ञाभंग केले आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यास आपली पाठ फिरविली आहे. “म्हणूनच परमेश्वराचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात लिहून ठेवलेले शाप आणि शपथेवरचा दंड आमच्यावर ओतला गेला आहे, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

  19. तागाची वस्त्रे नेसलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाने आपला उजवा हात आणि त्याचा डावा हात स्वर्गाकडे उंचाविला व जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची शपथ देऊन सांगितले, “एक समय, दोन समय आणि अर्धा समय. शेवटी जेव्हा पवित्र लोकांच्या शक्तीचा नाश होईल तेव्हा या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”

  20. “हे इस्राएला, जरी तू व्यभिचार केला आहेस, तरी यहूदाहला दोषी होऊ देऊ नकोस. “गिलगालकडे जाऊ नका; वर बेथ-आवेन येथे जाऊ नका. आणि ‘याहवेहच्या जीविताची शपथ!’ अशी शपथ घेऊ नका.

  21. “प्राचीन काळाच्या लोकांना सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे, ‘शपथ मोडू नका, तर प्रभूला वाहिलेली प्रत्येक शपथ पूर्ण करा.’

  22. परंतु मी तुम्हाला सांगतो, शपथ वाहू नका. स्वर्गाची नव्हे, कारण ते परमेश्वराचे सिंहासन आहे.

  23. किंवा पृथ्वीची, कारण ते त्यांचे पायासन आहे; किंवा यरुशलेमची, कारण ती थोर राजाची नगरी आहे,

  24. आणि स्वतःच्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण तुम्हाला एक केसही पांढरा किंवा काळा करता येत नाही.

  25. जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे ‘होय’ किंवा ‘नाही’ असावे; यापेक्षा अधिक त्या दुष्टापासून येते.