Skip to content

Oath बद्दल बायबलमधील वचने

85 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनाच विसाव्यात जाता येते, जसे परमेश्वराने म्हटले, “मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.” जरी जगाच्या स्थापनेपासून परमेश्वर त्यांना स्वीकारावयास सिद्ध आहेत व त्यांची वाट पाहत आहेत.

  2. जेव्हा परमेश्वराने अब्राहामाला त्यांचे वचन दिले, तेव्हा त्यांना शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे ते स्वतःचीच शपथ वाहून,

  3. म्हणाले, “मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि तुला अनेक वंशज देईन.”

  4. लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्यांची शपथ वाहतात आणि जे काही म्हटले आहे शपथ त्याचे समर्थन करते आणि सर्व वादांचा शेवट करते.

  5. कारण परमेश्वराने आपला कधीही न बदलणारा संकल्प त्यांच्या वारसांना स्पष्टपणे कळावा म्हणून स्वतःच्या शपथेने तो कायम केला.

  6. परंतु तो शपथ घेऊन याजक झाला, जेव्हा परमेश्वर त्याला म्हणाले, “प्रभूने शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: ‘तू सदासर्वकाळचा याजक आहेस.’ ”

  7. नियमशास्त्र दुर्बलतेने भरलेल्या माणसांना महायाजक नेमते; पण नियमशास्त्रानंतर आलेली शपथ ती जो युगानुयुग परिपूर्ण आहे त्या पुत्राला नेमते.

  8. या सर्वांपेक्षा, माझ्या बंधू आणि भगिनींनो, ना स्वर्गाची, ना पृथ्वीची किंवा दुसर्‍या कोणत्याच गोष्टींची शपथ वाहू नका. जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे “होय” किंवा “नाही” असावे. नाही तर तुम्ही दोषी ठरविले जाल.

  9. मग समुद्र व जमीन यावर उभे राहिलेल्या त्या बलवान देवदूताने आपला उजवा हात स्वर्गाकडे उंचाविला.

  10. आणि जे युगानुयुग जिवंत आहे, ज्यांनी आकाश व त्यातील सर्वकाही, पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही, समुद्र व त्यातील सर्व जलचर निर्माण केले, त्यांची शपथ वाहून म्हटले, “आता अधिक विलंब लागणार नाही!