मुख्य मजकुरावर जा

Ark of the Covenant बद्दल बायबलमधील वचने

88 वचने · 37 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ती गाडी बेथ-शेमेश येथील यहोशुआच्या शेतात आली आणि तिथे ती एका मोठ्या खडकाजवळ जाऊन थांबली. लोकांनी त्या गाडीच्या लाकडाचे तुकडे केले आणि याहवेहसाठी होमार्पण म्हणून त्या गाईंचा यज्ञ केला.

  2. लेवी लोकांनी याहवेहचा कोश व त्याबरोबरच्या त्या सोन्याच्या वस्तू ठेवलेली पेटी खाली उतरवून घेतल्या व त्यांनी त्या मोठ्या खडकावर ठेवल्या. त्या दिवशी बेथ-शेमेशच्या लोकांनी याहवेहसाठी होमार्पणे आणि यज्ञ केले.

  3. पलिष्टी लोकांच्या त्या पाच पुढार्‍यांनी हे सर्व पाहिले आणि त्याच दिवशी ते एक्रोनकडे परतले.

  4. पलिष्ट्यांनी याहवेहला दोषार्पण म्हणून ज्या गाठीच्या सोन्याच्या प्रतिमा पाठविल्या त्या या: अश्दोद, गाझा, अष्कलोन, गथ आणि एक्रोन यांच्याकरिता प्रत्येकी एक अशा होत्या.

  5. आणि सोन्याच्या उंदरांच्या प्रतिमांची संख्या त्या पाच पुढार्‍यांच्या मालकीचे असलेले पलिष्टी नगरे; तटबंदीची नगरे व त्यांच्या गावांच्या संख्येनुसार होती. बेथ-शेमेशमधील यहोशुआच्या शेतात ज्या मोठ्या खडकावर लेवी लोकांनी याहवेहचा कोश ठेवला तो आजपर्यंत साक्ष म्हणून आहे.

  6. दावीदाने पुन्हा इस्राएलातील सर्व सक्षम तरुण माणसांना एकत्र आणले, ते तीस हजार होते.

  7. दावीद व त्याची सर्व माणसे, यहूदीयातील बालाह येथून सर्वसमर्थ याहवेह परमेश्वराचा कोश, जे करुबांमध्ये आरूढ आहेत त्यांच्या नावाने ओळखला जात असे, तो कोश आणण्यासाठी निघाले.

  8. त्यांनी परमेश्वराचा कोश एका नवीन गाडीत ठेवला व तो डोंगरावर असलेल्या अबीनादाबाच्या घरातून बाहेर आणला. अबीनादाबाचे पुत्र उज्जा आणि अहियो नवीन गाडी चालवित होते

  9. अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून परमेश्वराचा कोश त्या गाडीवर ठेवून, अहियो त्यापुढे चालत होता.

  10. दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर चिपळ्या, सनोवर लाकडापासून बनविलेले वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा वाजवित आनंद करीत होते.

  11. जेव्हा ते नाकोनच्या खळ्याजवळ आले तेव्हा बैल अडखळले आणि परमेश्वराचा कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला.

  12. त्याच्या या आदरहीन कृत्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला; म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले आणि तो तिथे परमेश्वराच्या कोशाच्या बाजूला मरण पावला.

  13. तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह असे म्हणतात.

  14. त्या दिवशी दावीदाला याहवेहचे भय वाटले आणि तो म्हणाला, “आता याहवेहचा कोश माझ्याकडे कसा येणार?”

  15. याहवेहचा कोश त्याच्याबरोबर दावीदाच्या नगरात घेऊन जाण्यास त्याची इच्छा नव्हती. त्याऐवजी, त्याने तो गित्ती ओबेद-एदोम याच्या घरी नेला.

  16. याहवेहचा कोश गित्ती ओबेद-एदोम याच्या घरात तीन महिने राहिला आणि याहवेहने त्याला आणि त्याच्या संपूर्ण घराण्यास आशीर्वाद दिला.

  17. दावीद राजाला असे सांगण्यात आले की, “याहवेहने ओबेद-एदोमच्या घराण्यास व त्याचे जे काही आहे त्यास, परमेश्वराच्या कोशामुळे आशीर्वादित केले आहे,” तेव्हा परमेश्वराचा कोश ओबेद-एदोमच्या घरापासून दावीदाच्या नगरात आणावा म्हणून दावीद आनंद करीत गेला.

  18. याहवेहचा कोश वाहून नेणारे जेव्हा सहा पावले पुढे गेले, तेव्हा त्याने एक बैल आणि एक पुष्ट वासरू यांचा यज्ञ केला.

  19. तागाचे एफोद परिधान करून दावीद त्याच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर नाचत होता,

  20. दावीद आणि सर्व इस्राएली लोक आनंदाचा जयघोष करीत आणि रणशिंगांचा नाद करीत याहवेहचा कोश आणत होते.

  21. तेव्हा शलोमोन राजाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना त्याच्यापुढे येण्यास यरुशलेमास बोलाविले.

  22. इस्राएलचे सर्व लोक एथानीम महिन्यात, म्हणजे सातव्या महिन्यातील सणाच्या काळात शलोमोन राजाकडे एकत्र आले.

  23. जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले, तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला,

  24. आणि त्यांनी याहवेहचा कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजक व लेवींनी ती वाहून आणली,

  25. राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचा आणि गुरांचा बळी दिले की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती.