Skip to content

Ashdod

18 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Ashdothites

31.8000, 34.6300 गूगल नकाशावर पाहा

Ashdod चा उल्लेख असलेली वचने

  1. इस्राएली लोकांच्या देशात एकही अनाकी जिवंत उरला नाही, मात्र गाझा, गथ व अश्दोद येथे काही उरले.

  2. पूर्व इजिप्तच्या शिहोर नदीपासून उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या सीमेपर्यंत सर्व मिळून कनानी लोकांचा प्रदेश समजला जात असे, जरी इथे गाझा, अश्दोद, अष्कलोन, गथ आणि एक्रोन असे पाच पलिष्टी शासक होते; अव्वी लोकांचा प्रदेश:

  3. एक्रोनच्या पश्चिमेपासून अश्दोदच्या परिसरात असलेल्या गावांसहीत सर्वकाही;

  4. अश्दोद व त्याच्या सभोवतालच्या वस्त्या व गावे, गाझा, त्याच्या वस्त्या व गावे, इजिप्तच्या नाल्यापर्यंतची गावे व भूमध्य समुद्राच्या काठापर्यंत.

  5. परमेश्वराचा कोश पलिष्टी सैन्याने हस्तगत केल्यानंतर त्यांनी तो एबेन-एजर येथून अश्दोदकडे नेला.

  6. जेव्हा अश्दोदचे लोक दुसर्‍या दिवशी पहाटे उठले, तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्यांनी दागोनला उचलले आणि पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले.

  7. त्यामुळेच आजपर्यंत दागोनचे पुजारी किंवा जे अश्दोद येथे दागोनच्या मंदिरात जातात ते उंबरठ्यावर पाय ठेवीत नाहीत.

  8. याहवेहचा हात अश्दोद व त्याच्या जवळच्या भागातील लोकांवर भारी होता; याहवेहने त्यांच्यावर विध्वंस आणला आणि त्यांना पीडेच्या गाठींनी पीडले.

  9. जे घडत होते ते अश्दोदच्या लोकांनी पाहिले, तेव्हा ते म्हणाले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश येथे आमच्यामध्ये असू नये, कारण त्यांचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोन याच्यावर भारी आहे.”

  10. पलिष्ट्यांनी याहवेहला दोषार्पण म्हणून ज्या गाठीच्या सोन्याच्या प्रतिमा पाठविल्या त्या या: अश्दोद, गाझा, अष्कलोन, गथ आणि एक्रोन यांच्याकरिता प्रत्येकी एक अशा होत्या.

  11. तो पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करण्यास गेला आणि त्याने गथ, याबनेह आणि अश्दोद यांच्या भिंती पाडल्या. त्यानंतर त्याने अश्दोदजवळ आणि पलिष्ट्यांमध्ये इतर ठिकाणी शहरांची पुनर्बांधणी केली.

  12. याच सुमारास माझ्या निदर्शनास आले की काही यहूदी पुरुषांनी अश्दोदी, अम्मोनी व मोआबी स्त्रियांशी विवाह केला होता.

  13. त्यांची अर्धी मुलेबाळे अश्दोदी अथवा इतर लोकांची भाषा बोलत होती, पण त्यांना यहूदीयाची भाषा बोलता येत नसे.

  14. ज्या वर्षी अश्शूरचा राजा सार्गोनने पाठविलेला सर्वोच्च सेनापती अश्दोदला आला आणि त्याने हल्ला केला आणि ते ताब्यात घेतले—

  15. त्याचप्रमाणे ऊस देशातील राजे; व पलिष्ट्यांचे राजे (अष्कलोन, गाझा, एक्रोन, अश्दोदचे अवशिष्ट लोक);

  16. मी अश्दोदच्या राजाचा आणि अष्कलोनचा राजदंड धरणार्‍याचा नाश करेन. शेवटच्या पलिष्टीचा नाश होत नाही तोपर्यंत मी आपला हात एक्रोनावर चालवेन,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.

  17. अश्दोदच्या गडांना आणि इजिप्तच्या गडांना ही घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतावर एकत्र व्हा; तिच्यामधील गोंधळ आणि तिच्या लोकांवरील अत्याचाराकडे पाहा.”

  18. मिश्रजातीचे लोक अश्दोदास व्यापून टाकतील, आणि मी पलिष्ट्यांच्या गर्वाचा अंत करेन.