मुख्य मजकुरावर जा

Ark of the Covenant बद्दल बायबलमधील वचने: Brought by Solomon into the temple with great solemnity

14 वचने · 37 पैलू

Brought by Solomon into the temple with great solemnity बद्दल वचने

  1. तेव्हा शलोमोन राजाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना त्याच्यापुढे येण्यास यरुशलेमास बोलाविले.

  2. इस्राएलचे सर्व लोक एथानीम महिन्यात, म्हणजे सातव्या महिन्यातील सणाच्या काळात शलोमोन राजाकडे एकत्र आले.

  3. जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले, तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला,

  4. आणि त्यांनी याहवेहचा कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजक व लेवींनी ती वाहून आणली,

  5. राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचा आणि गुरांचा बळी दिले की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती.

  6. नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या नियोजित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला.

  7. तेव्हा शलोमोनाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना यरुशलेमास बोलाविले.

  8. आणि इस्राएलचे सर्व लोक सातव्या महिन्यातील सणाच्या काळात राजाकडे एकत्र आले.

  9. जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले तेव्हा लेवी लोकांनी कोश उचलून घेतला,

  10. आणि त्यांनी कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजकीय लेवींनी ती वाहून आणली,

  11. राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचे आणि गुरांचे बळी देत होते की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती.

  12. नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या निर्धारित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला.

  13. करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे झाकले जात होते.

  14. ते दांडे इतके लांब होते की, त्यांची कोशालगत असलेली टोके आतील खोलीसमोरील पवित्रस्थानातून दिसत असे, परंतु पवित्रस्थानाच्या बाहेरून ते दिसत नसे; आणि ते आजही तिथेच आहेत.