मुख्य मजकुरावर जा

Ark of the Covenant बद्दल बायबलमधील वचने: Brought into the city of David

8 वचने · 37 पैलू

Brought into the city of David बद्दल वचने

  1. दावीद राजाला असे सांगण्यात आले की, “याहवेहने ओबेद-एदोमच्या घराण्यास व त्याचे जे काही आहे त्यास, परमेश्वराच्या कोशामुळे आशीर्वादित केले आहे,” तेव्हा परमेश्वराचा कोश ओबेद-एदोमच्या घरापासून दावीदाच्या नगरात आणावा म्हणून दावीद आनंद करीत गेला.

  2. याहवेहचा कोश वाहून नेणारे जेव्हा सहा पावले पुढे गेले, तेव्हा त्याने एक बैल आणि एक पुष्ट वासरू यांचा यज्ञ केला.

  3. तागाचे एफोद परिधान करून दावीद त्याच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर नाचत होता,

  4. दावीद आणि सर्व इस्राएली लोक आनंदाचा जयघोष करीत आणि रणशिंगांचा नाद करीत याहवेहचा कोश आणत होते.

  5. म्हणून दावीद, इस्राएलचे वडीलजन, सैन्याचे उच्चाधिकारी याहवेहच्या कराराचा कोश यरुशलेममध्ये आणण्यासाठी मोठ्या हर्षाने ओबेद-एदोमच्या घरी गेले.

  6. याहवेह परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेणार्‍या लेव्यांची याहवेहने मदत केली म्हणून सात बैल आणि सात गोर्‍हे अर्पण केले गेले.

  7. दावीद, कोश वाहणारे सर्व लेवी, सर्व गायक व गायकांचा मुख्य संगीतकार कनन्याह होता, या सर्वांनी तलम तागाची वस्त्रे परिधान केली होती. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.

  8. अशाप्रकारे इस्राएलाच्या सर्व लोकांनी हर्षाने जयघोष करीत, रणशिंगे, कर्णे, झांजा, सतार व वीणा यांच्या मोठ्या निनादात याहवेहचा कराराचा कोश आणला.