Ark of the Covenant बद्दल बायबलमधील वचने: Furnished with rings and staves
Furnished with rings and staves बद्दल वचने
त्यासाठी सोन्याच्या चार कड्या बनवून कोशाच्या चार पायांना, दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्या बाजूला अशा त्या बसवाव्यात.
मग बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण द्यावे.
कोश वाहून नेण्यासाठी ते दांडे दोन्ही बाजूंच्या कड्यात घालाव्या.
या दांड्या कोशाच्या कड्यातच असाव्यात; त्या काढू नये.
त्याने त्यासाठी सोन्याच्या चार कड्या केल्या आणि त्याच्या चार पायांना दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्या बाजूला लावल्या.
मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण घातले.
आणि ते दांडे कोश वाहून नेण्यासाठी कोशाच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले.