मुख्य मजकुरावर जा

Ark of the Covenant बद्दल बायबलमधील वचने

88 वचने · 37 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या नियोजित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला.

  2. म्हणून दावीद, इस्राएलचे वडीलजन, सैन्याचे उच्चाधिकारी याहवेहच्या कराराचा कोश यरुशलेममध्ये आणण्यासाठी मोठ्या हर्षाने ओबेद-एदोमच्या घरी गेले.

  3. याहवेह परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेणार्‍या लेव्यांची याहवेहने मदत केली म्हणून सात बैल आणि सात गोर्‍हे अर्पण केले गेले.

  4. दावीद, कोश वाहणारे सर्व लेवी, सर्व गायक व गायकांचा मुख्य संगीतकार कनन्याह होता, या सर्वांनी तलम तागाची वस्त्रे परिधान केली होती. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.

  5. अशाप्रकारे इस्राएलाच्या सर्व लोकांनी हर्षाने जयघोष करीत, रणशिंगे, कर्णे, झांजा, सतार व वीणा यांच्या मोठ्या निनादात याहवेहचा कराराचा कोश आणला.

  6. तेव्हा शलोमोनाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना यरुशलेमास बोलाविले.

  7. आणि इस्राएलचे सर्व लोक सातव्या महिन्यातील सणाच्या काळात राजाकडे एकत्र आले.

  8. जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले तेव्हा लेवी लोकांनी कोश उचलून घेतला,

  9. आणि त्यांनी कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजकीय लेवींनी ती वाहून आणली,

  10. राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचे आणि गुरांचे बळी देत होते की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती.

  11. नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या निर्धारित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला.

  12. करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे झाकले जात होते.

  13. ते दांडे इतके लांब होते की, त्यांची कोशालगत असलेली टोके आतील खोलीसमोरील पवित्रस्थानातून दिसत असे, परंतु पवित्रस्थानाच्या बाहेरून ते दिसत नसे; आणि ते आजही तिथेच आहेत.