- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना २२:३०सुमारे इ.स.पू. १४५२
गाढवीने बलामाला म्हटले, “मी तुझी ती गाढवी नाही काय जिच्यावर तू आजपर्यंत बसत आलास? मी तुझ्याशी कधी अशी वागणूक केली काय?” तो म्हणाला, “नाही.”
- गणना २२:३१सुमारे इ.स.पू. १४५२
तेव्हा याहवेहने बलामाचे डोळे उघडले आणि त्याने रस्त्यावर तलवार उपसून उभे असलेल्या याहवेहच्या दूताला पाहिले आणि तो नमन करून पालथा पडला.
- गणना २२:३२सुमारे इ.स.पू. १४५२
याहवेहच्या दूताने बलामाला विचारले, “तू तुझ्या गाढवीला असे तीन वेळा का मारलेस? मी तुला अडविण्यास आलो कारण माझ्यासमोर तुझा मार्ग विपरीत आहे.
- गणना २२:३३सुमारे इ.स.पू. १४५२
गाढवीने मला पाहिले व तीन वेळा माझ्यापासून ती वळली. ती जर वळली नसती, तर आतापर्यंत मी तुला जिवे मारले असते, परंतु त्या गाढवीला वाचविले असते.”
- गणना २२:३४सुमारे इ.स.पू. १४५२
बलाम याहवेहच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे. मला अडवावे म्हणून तुम्ही वाटेत उभे आहात हे मला समजले नाही. मग आता जर हे तुम्हाला आवडले नाही, तर मी माघारी जाईन.”
- गणना २२:३५सुमारे इ.स.पू. १४५२
याहवेहच्या दूताने बलामाला म्हटले, “त्या पुरुषांबरोबर जा, परंतु जे मी तुला सांगेन तेच तू बोलावे.” म्हणून बलाम बालाकाच्या त्या सरदारांबरोबर गेला.
- गणना २२:३६सुमारे इ.स.पू. १४५२
बलाम येत आहे, हे जेव्हा बालाकाने ऐकले, तेव्हा तो त्याला भेटण्याकरिता आर्णोनाच्या तीरावर, त्याच्या देशाच्या सीमेवर असलेल्या मोआबाच्या नगराकडे गेला.
- गणना २२:३७सुमारे इ.स.पू. १४५२
बालाकाने बलामाला विचारले, “मी तुला तातडीचे बोलाविणे पाठवले नव्हते काय? तू माझ्याकडे का आला नाहीस? तुला बक्षीस देण्यास मी खरोखर समर्थ नाही काय?”
- गणना २२:३८सुमारे इ.स.पू. १४५२
बलामाने बालाकाला उत्तर दिले, “पाहा आता मी तुझ्याकडे आलो आहे, परंतु मला वाटेल ते मी बोलू शकत नाही, परमेश्वर माझ्या मुखात जे शब्द घालतील तेच मी बोलेन.”
- गणना २२:३९सुमारे इ.स.पू. १४५२
मग बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हुसोथ येथे गेला.
- गणना २२:४०सुमारे इ.स.पू. १४५२
तिथे बालाकाने गुरे व मेंढरे यांचे यज्ञ केले आणि त्यातील काही बलाम व जे सरदार त्याच्याबरोबर होते त्यांना दिले.
- गणना २२:४१सुमारे इ.स.पू. १४५२
सकाळी बालाकाने बलामास वर बामोथ-बआल या ठिकाणी नेले आणि तिथून तो इस्राएली लोकांच्या छावणीचा शेवटचा भाग पाहू शकत होता.
- गणना २३:१सुमारे इ.स.पू. १४५२
बलाम बालाकाला म्हणाला, “या ठिकाणी माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्हे व सात मेंढे तयार ठेव.”
- गणना २३:२सुमारे इ.स.पू. १४५२
बलामाने सांगितले त्याप्रमाणे बालाकाने केले आणि दोघांनी प्रत्येक वेदीवर गोर्हा व मेंढा यांचे अर्पण केले.
- गणना २३:३सुमारे इ.स.पू. १४५२
मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू या तुझ्या होमार्पणाजवळ थांब आणि मी जरा बाजूला जातो. कदाचित याहवेह मला भेटायला येतील. ते जे काही मला प्रकट करतील ते मी तुला सांगेन.” मग तो एका उंच ओसाड ठिकाणी गेला.
- गणना २३:४सुमारे इ.स.पू. १४५२
परमेश्वर त्याला भेटले आणि बलाम म्हणाला, “मी सात वेद्या बांधून प्रत्येक वेदीवर एक गोर्हा आणि एक मेंढा अर्पण केला आहे.”
- गणना २३:५सुमारे इ.स.पू. १४५२
तेव्हा याहवेहने बलामाच्या मुखात शब्द घातले व म्हटले, “जा आणि बालाकाला हे वचन सांग.”
- गणना २३:६सुमारे इ.स.पू. १४५२
म्हणून बलाम परत बालाकाकडे आला. तेव्हा तो त्याच्या मोआबी सरदारांसह होमार्पणाजवळ उभा होता असे त्याने पाहिले.
- गणना २३:७सुमारे इ.स.पू. १४५२
तेव्हा बलामाने आपला संदेश सांगितला: “बालाकाने मला अरामाहून आणले, मोआबाच्या राजाने पूर्वेकडील डोंगरातून मला आणले. तो म्हणाला, ‘ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे; ये, इस्राएलाचा धिक्कार कर.’
- गणना २३:८सुमारे इ.स.पू. १४५२
ज्यांना परमेश्वराने शाप दिला नाही, त्यांना मी शाप कसा देऊ? ज्यांचा तिरस्कार याहवेहने केला नाही; त्यांचा तिरस्कार मी कसा करू?
- गणना २३:९सुमारे इ.स.पू. १४५२
खडकाच्या शिखरांवरून मी त्यांना पाहतो, उंच ठिकाणावरून मला ते दिसतात. वेगळे राहत असलेले लोक मी पाहतो राष्ट्रांबरोबर ते स्वतःला गणत नाहीत.
- गणना २३:१०सुमारे इ.स.पू. १४५२
याकोबाची धूळ कोण मोजू शकेल, किंवा इस्राएलच्या चौथ्या भागाची तरी मोजणी कोण करणार? मला नीतिमानाचे मरण मरू दे, आणि माझा शेवट त्यांच्याप्रमाणे असो!”
- गणना २३:११सुमारे इ.स.पू. १४५२
बालाक बलामाला म्हणाला, “तू मला हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला आणले, पण तू तर आशीर्वाद दिल्याशिवाय काही केले नाहीस!”
- गणना २३:१२सुमारे इ.स.पू. १४५२
बलामाने म्हटले, “जे शब्द याहवेह माझ्या मुखात घालतील तेच मी बोलू नये काय?”
- गणना २३:१३सुमारे इ.स.पू. १४५२
तेव्हा बालाक त्याला म्हणाला, “माझ्याबरोबर दुसर्या ठिकाणी चल जिथून तू त्यांना पाहू शकशील; तुला ते सर्व दिसणार नाहीत तर केवळ त्यांच्या छावणीचा शेवटचा भाग मात्र दिसेल. तिथून त्यांना माझ्यासाठी शाप दे.”