- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना २१:१५सुमारे इ.स.पू. १४५३
आणि ओहोळांचा जो ओघ आर येथील वस्तीकडे वाहतो आणि मोआब प्रदेशालगत आहे.”
- गणना २१:१६सुमारे इ.स.पू. १४५३
तिथून ते बैर म्हणजे विहीर या ठिकाणाकडे निघाले. ज्या ठिकाणी याहवेह मोशेला म्हणाले होते, “लोकांना बोलव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.”
- गणना २१:१७सुमारे इ.स.पू. १४५३
मग इस्राएलने हे गीत गाईले: “हे विहिरी, उफाळून ये! त्याविषयी गा,
- गणना २१:१८सुमारे इ.स.पू. १४५३
जी विहीर राजपुत्रांनी खोदली, की ज्यामध्ये लोकांचे सरदार— आपल्या राजदंड आणि काठीसह बुडले.” मग ते त्या रानातून मत्तानाहला गेले,
- गणना २१:१९सुमारे इ.स.पू. १४५३
मत्तानाहहून नाहालीयेल, नाहालीयेलपासून बामोथास,
- गणना २१:२०सुमारे इ.स.पू. १४५३
आणि बामोथपासून मोआबामधील खोर्यापर्यंत जिथे पिसगाच्या शिखरावर ओसाड जमीन दिसते.
- गणना २१:२१सुमारे इ.स.पू. १४५३
इस्राएलने अमोर्यांचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले:
- गणना २१:२२सुमारे इ.स.पू. १४५३
“आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही शेताकडे किंवा द्राक्षमळ्याकडे वळणार नाही किंवा विहिरीतील पाणी पिणार नाही. तुमची सीमा पार करेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच प्रवास करू.”
- गणना २१:२३सुमारे इ.स.पू. १४५३
परंतु सीहोन राजाने इस्राएलास त्याच्या सीमेमधून जाण्यास परवानगी दिली नाही. त्याने आपल्या संपूर्ण सैन्याला जमा केले व इस्राएला विरुद्ध बाहेर रानात गेला आणि याहस येथे पोहोचल्यावर तो इस्राएलाशी लढला.
- गणना २१:२४सुमारे इ.स.पू. १४५३
परंतु इस्राएलने त्याला तलवारीवर धरले आणि आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंत, अम्मोनी लोक राहतात तिथपर्यंत त्यांच्या देशावर कब्जा केला, कारण त्यांची सीमा तटबंदची होती.
- गणना २१:२५सुमारे इ.स.पू. १४५३
याप्रकारे इस्राएलने हेशबोन व आसपासच्या नगरांसह अमोर्यांची सर्व नगरे ताब्यात घेतली व त्यात वस्ती केली.
- गणना २१:२६सुमारे इ.स.पू. १४५३
हेशबोन हे अमोर्यांचा राजा सीहोनचे शहर होते, ज्याने मोआबाच्या पूर्वीच्या राजाशी युद्ध केले होते आणि आर्णोन पर्यंतचा सर्व प्रदेश त्याच्याकडून घेतला होता.
- गणना २१:२७सुमारे इ.स.पू. १४५३
म्हणूनच कवी म्हणतात: “हेशबोनला या आणि ते पुन्हा बांधू द्या; सीहोनाच्या शहराची पुनर्स्थापना होऊ द्या.
- गणना २१:२८सुमारे इ.स.पू. १४५३
“हेशबोनमधून अग्नी निघाला, सीहोनाच्या शहरातून ज्वाला निघाली. त्याने मोआबचे आर या आर्णोनाच्या उंच प्रदेशातील नागरिकांना भस्म केले आहे.
- गणना २१:२९सुमारे इ.स.पू. १४५३
हे मोआबा, तुझा धिक्कार असो! कमोशाच्या लोकांनो, तुम्ही नष्ट झाला आहात! त्याने आपल्या मुलांना निर्वासित केले व अमोर्यांचा राजा सीहोनच्या हाती आपल्या मुलींना बंदी म्हणून दिले.
- गणना २१:३०सुमारे इ.स.पू. १४५३
“पण आम्ही त्यांना पराजित केले आहे; दिबोनपर्यंत हेशबोनचे वर्चस्व नष्ट झाले आहे. मेदबापर्यंत पसरलेल्या नोफाहपर्यंत, आम्ही त्यांचा नाश केला आहे.”
- गणना २१:३१सुमारे इ.स.पू. १४५३
याप्रमाणे इस्राएली अमोरी लोकांच्या देशात स्थायिक झाले.
- गणना २१:३२सुमारे इ.स.पू. १४५३
मोशेने याजेर नगराकडे हेर पाठवल्यानंतर, इस्राएली लोकांनी तेथील आसपासच्या वसाहती हस्तगत केल्या आणि तिथे असलेल्या अमोरी लोकांना बाहेर घालवून दिले.
- गणना २१:३३सुमारे इ.स.पू. १४५३
नंतर तिथून वळून ते बाशानाच्या वाटेने वर गेले आणि बाशानचा राजा ओग आणि त्याचे सर्व सैन्य जमवून त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे गेले.
- गणना २१:३४सुमारे इ.स.पू. १४५३
याहवेहने मोशेला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता, याचे तू जसे केले तसेच याला कर.”
- गणना २१:३५सुमारे इ.स.पू. १४५३
तेव्हा इस्राएली लोकांनी त्याला, त्याची मुले व सर्व सैन्यासह नष्ट करून टाकले, त्यांच्यातील कोणीही वाचला नाही आणि इस्राएली लोकांनी त्याचा देश ताब्यात घेतला.
- गणना २२:१सुमारे इ.स.पू. १४५२
नंतर इस्राएली लोक प्रवास करीत मोआबाच्या मैदानात आले, जे यार्देनच्या पलीकडे यरीहोच्या समोर आहे.
- गणना २२:२सुमारे इ.स.पू. १४५२
इस्राएली लोकांनी अमोरी लोकांचे काय केले हे सर्व सिप्पोरचा पुत्र बालाकाने पाहिले.
- गणना २२:३सुमारे इ.स.पू. १४५२
इस्राएली लोक पुष्कळ आहेत हे पाहून मोआब फार घाबरला. इस्राएलमुळे मोआब हादरून गेला.
- गणना २२:४सुमारे इ.स.पू. १४५२
मोआबी लोकांनी मिद्यान्यांच्या वडील लोकांना म्हटले, “जसा बैल शेतातील गवत चाटून फस्त करतो, त्याप्रमाणे हा मोठा जमाव आमच्या सभोवती असलेले सर्वकाही चाटून घेईल.” तेव्हा सिप्पोरचा पुत्र बालाक, जो त्यावेळी मोआबाचा राजा होता,