- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना २२:५सुमारे इ.स.पू. १४५२
त्याने बौराचा पुत्र बलामला बोलवायला दूत पाठवले. तो त्यावेळी फरात नदीजवळ त्याच्या मातृभूमीत असलेल्या पथोर येथे होता. त्याला बालाक म्हणाला: “इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे आणि आता माझ्यासमोर वसले आहेत.
- गणना २२:६सुमारे इ.स.पू. १४५२
तर आता ये आणि या लोकांना शाप दे, कारण ते माझ्यासाठी खूप प्रबळ आहेत. मग कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेन. कारण मला माहीत आहे की ज्या कोणाला तू आशीर्वाद देतोस ते आशीर्वादित होतात आणि ज्या कोणाला तू शाप देतोस ते शापित होतात.”
- गणना २२:७सुमारे इ.स.पू. १४५२
मोआबी व मिद्यानी वडील, शकुन पाहण्यासाठी मोबदला घेऊन निघाले. जेव्हा ते बलामाकडे आले, तेव्हा बालाक जे काही म्हणाला ते त्याला सांगितले.
- गणना २२:८सुमारे इ.स.पू. १४५२
बलाम त्यांना म्हणाला, “आज रात्री येथे मुक्काम करा आणि याहवेह मला जे काही सांगतील ते मी तुम्हाला कळवेन.” म्हणून मोआबी सरदार त्याच्याकडे राहिले.
- गणना २२:९सुमारे इ.स.पू. १४५२
परमेश्वराने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर हे पुरुष कोण आहेत?”
- गणना २२:१०सुमारे इ.स.पू. १४५२
बलाम परमेश्वराला म्हणाला, “सिप्पोरचा पुत्र बालाक, मोआबाच्या राजाने मला हा संदेश पाठवला आहे:
- गणना २२:११सुमारे इ.स.पू. १४५२
‘इजिप्तमधून काही लोक बाहेर आले आहेत; व त्यांनी पृथ्वी व्यापून टाकली आहे. तर आता ये आणि माझ्यासाठी त्यांना शाप दे. कदाचित मी त्यांचा पराभव करून त्यांना देशातून हाकलून देऊ शकेल.’ ”
- गणना २२:१२सुमारे इ.स.पू. १४५२
परंतु परमेश्वर बलामाला म्हणाले, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. त्या लोकांना तू शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.”
- गणना २२:१३सुमारे इ.स.पू. १४५२
सकाळी उठून बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “तुमच्या आपल्या देशाला परत जा, कारण मी तुमच्याबरोबर जाण्यास याहवेहने नाकारले आहे.”
- गणना २२:१४सुमारे इ.स.पू. १४५२
तेव्हा मोआबी सरदार बालाकाकडे परत गेले व म्हणाले, “बलामाने आमच्याबरोबर येण्यास नाकारले.”
- गणना २२:१५सुमारे इ.स.पू. १४५२
नंतर बालाकाने दुसरे सरदार पाठवले, जे पहिल्यापेक्षा अधिक व आणखी प्रतिष्ठित होते.
- गणना २२:१६सुमारे इ.स.पू. १४५२
ते बलामाकडे आले आणि म्हणाले: सिप्पोरचा पुत्र बालाक असे म्हणतो: “माझ्याकडे येण्यासाठी तुला कोणतीही अडचण असू नये,
- गणना २२:१७सुमारे इ.स.पू. १४५२
कारण मी तुला चांगले प्रतिफळ देईन आणि तू जे सांगशील ते करेन. तर आता ये आणि माझ्यासाठी या लोकांना शाप दे.”
- गणना २२:१८सुमारे इ.स.पू. १४५२
परंतु बलामाने त्यांना उत्तर दिले, “बालाकाने जरी मला त्याच्या राजवाड्यातील सर्व चांदी आणि सोने दिले, तरीही याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेपलीकडे मी काहीही कमी किंवा जास्त करू शकत नाही.
- गणना २२:१९सुमारे इ.स.पू. १४५२
तरी आजची रात्र येथे राहा, म्हणजे याहवेह मला अजून काय सांगतात ते मला कळेल.”
- गणना २२:२०सुमारे इ.स.पू. १४५२
त्या रात्री परमेश्वर बलामाकडे येऊन म्हणाले, “कारण हे लोक तुला बोलवायला आले आहेत, तू त्यांच्याबरोबर जा, परंतु केवळ मी तुला जे सांगेन तेच कर.”
- गणना २२:२१सुमारे इ.स.पू. १४५२
बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घातले आणि मोआबी सरदारांबरोबर निघाला.
- गणना २२:२२सुमारे इ.स.पू. १४५२
परंतु तो निघाला त्यावेळी परमेश्वराचा राग पेटला आणि त्याला अडविण्यासाठी याहवेहचा दूत वाटेत उभा राहिला. बलाम आपल्या गाढवीवर स्वार होता व त्याचे दोन सेवक त्याच्याबरोबर होते.
- गणना २२:२३सुमारे इ.स.पू. १४५२
जेव्हा याहवेहचा दूत उपसलेली तलवार हातात घेऊन वाटेत उभा आहे असे गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाटेतून वळून शेतात गेली. बलामाने तिला मारून पुन्हा वाटेवर आणले.
- गणना २२:२४सुमारे इ.स.पू. १४५२
नंतर याहवेहचा दूत द्राक्षमळ्यांच्या मधील अरुंद वाटेवर उभा राहिला, त्याच्या दोन्ही बाजूंना भिंती होत्या.
- गणना २२:२५सुमारे इ.स.पू. १४५२
जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, ती भिंतीला घसटली व बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला. म्हणून त्याने गाढवीला पुन्हा मारले.
- गणना २२:२६सुमारे इ.स.पू. १४५२
नंतर याहवेहचा दूत पुढे जाऊन जिथे उजवीकडे किंवा डावीकडे वळायला जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला.
- गणना २२:२७सुमारे इ.स.पू. १४५२
जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, बलाम तिच्यावर बसलेला असतानाच ती त्याच्यासहच खाली बसली आणि तो रागावला व तिला काठीने मारले.
- गणना २२:२८सुमारे इ.स.पू. १४५२
तेव्हा याहवेहने त्या गाढवीचे मुख उघडले, व ती बलामाला म्हणाली, “तू मला तीन वेळा मारावेस असे मी काय केले आहे?”
- गणना २२:२९सुमारे इ.स.पू. १४५२
बलाम गाढवीला म्हणाला, “तू मला मूर्ख बनविले! माझ्या हातात तलवार असती, तर मी आता तुला मारून टाकले असते.”