- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना २३:१४सुमारे इ.स.पू. १४५२
त्याने बलामाला सोफिमाच्या मैदानाच्या पिसगाच्या डोंगरावर नेले, तिथे त्याने सात वेद्या बांधल्या आणि प्रत्येक वेदीवर एक गोर्हा व एक मेंढा अर्पण केला.
- गणना २३:१५सुमारे इ.स.पू. १४५२
बलाम बालाकाला म्हणाला, “तू इथे तुझ्या होमार्पणाजवळ थांब, मी तिथे जाऊन याहवेहशी भेट घेतो.”
- गणना २३:१६सुमारे इ.स.पू. १४५२
याहवेह बलामाला भेटले व त्याच्या मुखात आपला शब्द घातला व म्हटले, “बालाकाकडे परत जा आणि त्याला हे संदेश दे.”
- गणना २३:१७सुमारे इ.स.पू. १४५२
जेव्हा तो परत आला तेव्हा तो आपल्या मोआबी सरदारांबरोबर त्याच्या होमार्पणाजवळ उभा असलेला त्याला दिसला. बालाकाने त्याला विचारले, “याहवेह काय म्हणाले?”
- गणना २३:१८सुमारे इ.स.पू. १४५२
नंतर त्याने हा संदेश सांगितला: “बालाका, ऊठ आणि ऐक; सिप्पोरच्या पुत्रा, माझे ऐक.
- गणना २३:१९सुमारे इ.स.पू. १४५२
परमेश्वर मनुष्य नाहीत की त्यांनी लबाडी करावी, ते मानव नाहीत, की त्यांनी आपले मन बदलावे. याहवेह बोलणार आणि त्यानुसार करणार नाहीत काय? त्यांनी अभिवचन दिले आणि ते पूर्ण करणार नाहीत काय?
- गणना २३:२०सुमारे इ.स.पू. १४५२
आशीर्वाद देण्याची आज्ञा मला मिळाली आहे; याहवेहने आशीर्वाद दिला आहे आणि मी तो बदलू शकत नाही.
- गणना २३:२१सुमारे इ.स.पू. १४५२
“याकोबात विपत्ती सापडली नाही, इस्राएलात क्लेश दिसत नाहीत. त्यांचे परमेश्वर याहवेह त्यांच्याबरोबर आहेत; राजाचा जयघोष त्यांच्यामध्ये आहे.
- गणना २३:२२सुमारे इ.स.पू. १४५२
परमेश्वराने त्यांना इजिप्तच्या बाहेर आणले. रानबैलासारखे त्यांचे बळ आहे.
- गणना २३:२३सुमारे इ.स.पू. १४५२
याकोबाविरुद्ध मंत्रतंत्र नाही, इस्राएलविरुद्ध अपशकुन नाही. याकोबाविषयी व इस्राएलाविषयी असे म्हटले जाईल, परमेश्वराने काय केले आहे ते पाहा!
- गणना २३:२४सुमारे इ.स.पू. १४५२
लोक सिंहिणीप्रमाणे उठतात; ते सिंहासारखे उभे राहतात जे त्याची शिकार खाईपर्यंत व वधलेल्यांचे रक्त पिईपर्यंत विसावा घेत नाहीत.”
- गणना २३:२५सुमारे इ.स.पू. १४५२
मग बालाक बलामाला म्हणाला, “त्यांना अजिबात शापही देऊ नकोस किंवा आशीर्वादही देऊ नकोस.”
- गणना २३:२६सुमारे इ.स.पू. १४५२
बलामाने बालाकाला उत्तर दिले, “याहवेह जे सांगतील त्याचप्रमाणे मी केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
- गणना २३:२७सुमारे इ.स.पू. १४५२
नंतर बालाक बलामाला म्हणाला, “चल, मी तुला आणखी एका ठिकाणी नेतो. कदाचित त्या ठिकाणाहून तू माझ्यासाठी त्यांना शाप द्यावा हे परमेश्वराला बरे वाटेल.”
- गणना २३:२८सुमारे इ.स.पू. १४५२
आणि बालाकाने बलामाला पेओर डोंगराच्या शिखराकडे ओसाड जागेसमोर नेले.
- गणना २३:२९सुमारे इ.स.पू. १४५२
बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि सात गोर्हे व सात मेंढे माझ्यासाठी तयार ठेव.”
- गणना २३:३०सुमारे इ.स.पू. १४५२
बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने केले आणि प्रत्येक वेदीवर एकएक गोर्हा व मेंढा अर्पण केला.
- गणना २४:१सुमारे इ.स.पू. १४५२
आता जेव्हा बलामाने पाहिले की इस्राएलास आशीर्वाद देण्यास याहवेहला बरे वाटले, तेव्हा तो पूर्वीप्रमाणे मंत्रतंत्र करावयाला गेला नाही, तर त्याने रानाकडे आपले तोंड वळविले.
- गणना २४:२सुमारे इ.स.पू. १४५२
जेव्हा बलामाने दृष्टी वर करून पाहिले की इस्राएली लोक आपआपल्या गोत्राप्रमाणे छावणी देऊन राहत होते, परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला
- गणना २४:३सुमारे इ.स.पू. १४५२
आणि त्याने आपला संदेश सांगितला: “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, ज्याच्या डोळ्याला स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी,
- गणना २४:४सुमारे इ.स.पू. १४५२
जो याहवेहचा शब्द ऐकतो त्याची भविष्यवाणी, जो सर्वसमर्थाकडून दृष्टान्त पाहतो, जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडले आहेत:
- गणना २४:५सुमारे इ.स.पू. १४५२
“हे याकोबा, तुझे तंबू, हे इस्राएला, तुझी राहण्याची ठिकाणे किती सुंदर आहेत!
- गणना २४:६सुमारे इ.स.पू. १४५२
“ते खोर्याप्रमाणे पसरतात, नदीकिनारी असलेल्या बागेप्रमाणे, याहवेहने रोपलेल्या जटामांसीसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत.
- गणना २४:७सुमारे इ.स.पू. १४५२
त्यांच्या पोहर्यातून पाणी वाहेल; त्यांच्या बिजांना भरपूर पाणी मिळेल. “त्यांचा राजा अगाग राजापेक्षा महान असेल; त्यांचे राज्य गौरवित केले जाईल.
- गणना २४:८सुमारे इ.स.पू. १४५२
“परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले; रानबैलासारखे त्यांचे बळ आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रांचा ते नाश करतात आणि त्यांच्या हाडांचे ते तुकडे करतात; ते आपल्या बाणांनी त्यांना भोसकतात.