मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना २४:९सुमारे इ.स.पू. १४५२

    सिंहाप्रमाणे ते दबा धरून निपचित पडून राहतात, सिंहिणीप्रमाणे ते पडून राहतात—त्यांना उठविण्याचे धाडस कोण करणार? “जे तुम्हाला आशीर्वाद देतात ते आशीर्वादित होतील आणि जे तुम्हाला शाप देतात ते शापित असो!”

  2. गणना २४:१०सुमारे इ.स.पू. १४५२

    तेव्हा बलामाविरुद्ध बालाकाचा राग पेटला. त्याने आपले हात एकत्र आपटले व त्याला म्हणाला, “माझ्या शत्रूंना शाप द्यावा म्हणून मी तुला बोलाविले, पण या तीन वेळा तू त्यांना आशीर्वादच दिलास.

  3. गणना २४:११सुमारे इ.स.पू. १४५२

    आता येथून चालता हो! आणि आपल्या घरी जा. मी तुझा मोठा सन्मान करेन असे मी म्हटले होते, परंतु याहवेहने तुला सन्मानापासून वंचित केले आहे.”

  4. गणना २४:१२सुमारे इ.स.पू. १४५२

    बलामाने बालाकाला उत्तर दिले, “तू ज्या दूतांना माझ्याकडे पाठवले त्यांना मी सांगितले नव्हते काय,

  5. गणना २४:१३सुमारे इ.स.पू. १४५२

    ‘बालाकाने जरी मला त्याच्या राजवाड्यातील सर्व चांदी आणि सोने दिले, तरीही मला वाटेल ते मी करू शकत नाही, याहवेहच्या आज्ञेपलीकडे मी काहीही कमी किंवा जास्त करू शकत नाही; आणि याहवेह सांगतील तेच मी बोलणार’?

  6. गणना २४:१४सुमारे इ.स.पू. १४५२

    आता मी माझ्या लोकांकडे परत जात आहे, पण ये, हे इस्राएली लोक येणार्‍या दिवसात तुझ्या लोकांचे काय करणार त्याविषयी मी तुला चेतावणी देतो.”

  7. गणना २४:१५सुमारे इ.स.पू. १४५२

    मग त्याने हा संदेश दिला: “बौराचा पुत्र बलामाची भविष्यवाणी, ज्याच्या नजरेस स्पष्ट दिसते त्याची भविष्यवाणी,

  8. गणना २४:१६सुमारे इ.स.पू. १४५२

    जो परमेश्वराचे शब्द ऐकतो त्याची भविष्यवाणी, ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थाकडून दर्शन घडते, जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडले आहेत:

  9. गणना २४:१७सुमारे इ.स.पू. १४५२

    “मी त्याला पाहतो, पण आता नाही; मी त्याला न्याहाळतो, पण जवळ नाही. याकोबातून एक तारा उदयास येईल; इस्राएलातून एक राजदंड निघेल. तो मोआबाचे डोके व शेथाच्या सर्व लोकांच्या कवट्या चिरडून टाकेल.

  10. गणना २४:१८सुमारे इ.स.पू. १४५२

    एदोम जिंकला जाईल; इस्राएलचा शत्रू सेईर सुद्धा जिंकला जाईल, पण इस्राएल बलवान होईल.

  11. गणना २४:१९सुमारे इ.स.पू. १४५२

    याकोबातून एक अधिकारी येईल आणि नगरातील उरलेल्यांचा नाश करेल.”

  12. गणना २४:२०सुमारे इ.स.पू. १४५२

    नंतर बलामाने अमालेकाला पाहिले व आपला संदेश दिला: “अमालेक सर्व राष्ट्रांमध्ये प्रथम राष्ट्र होते, परंतु त्यांचा शेवट संपूर्ण विनाशात होईल.”

  13. गणना २४:२१सुमारे इ.स.पू. १४५२

    यानंतर त्याने केनी लोकांना पाहिले व आपला संदेश दिला: “तुझे वसतिस्थान सुरक्षित आहे, तुझे घरटे खडकात स्थिर आहे;

  14. गणना २४:२२सुमारे इ.स.पू. १४५२

    तरीही हे केनी, जेव्हा अश्शूर तुला कैद करून घेतील तेव्हा तुझा नाश होईल.”

  15. गणना २४:२३सुमारे इ.स.पू. १४५२

    त्यानंतर त्याने हा संदेश दिला: “हाय हाय! परमेश्वर हे करीत असताना कोण जगू शकेल?

  16. गणना २४:२४सुमारे इ.स.पू. १४५२

    कित्तीमाच्या किनार्‍यावरून जहाजे येतील; ते अश्शूर व एबर यांच्यावर जुलूम करतील, परंतु त्यांचाही नाश होईल.”

  17. गणना २४:२५सुमारे इ.स.पू. १४५२

    त्यानंतर बलाम उठून आपल्या घरी परतला व बालाकही आपल्या मार्गाने गेला.

  18. गणना २५:१सुमारे इ.स.पू. १४५२

    इस्राएली लोक शिट्टीम येथे राहत असताना, त्यांचे पुरुष तेथील मोआबी कन्यांशी व्यभिचार करू लागले,

  19. गणना २५:२सुमारे इ.स.पू. १४५२

    त्या कन्यांनी इस्राएली पुरुषांना त्यांच्या दैवतांच्या यज्ञास बोलाविले. लोकांनी त्या यज्ञांचे भोजन खाल्ले आणि त्या दैवतांना नमन केले.

  20. गणना २५:३सुमारे इ.स.पू. १४५२

    अशा प्रकारे इस्राएली लोक बआल-पौराशी जडले आणि याहवेहचा कोप त्यांच्याविरुद्ध भडकला.

  21. गणना २५:४सुमारे इ.स.पू. १४५२

    याहवेहने मोशेला म्हटले, “या लोकांच्या सर्व पुढार्‍यांना घे, त्यांना फासावर टांग व त्यांना दिवसाच्या प्रकाशात याहवेहसमोर उघडे कर, म्हणजे इस्राएलवर पेटलेला याहवेहचा क्रोध शांत होईल.”

  22. गणना २५:५सुमारे इ.स.पू. १४५२

    तेव्हा मोशे इस्राएलच्या न्यायाधीशांनी म्हणाला, “तुम्ही स्वतःला बआल-पौराशी जोडले आहे, तुम्हा प्रत्येकाला जिवे मारावे.”

  23. गणना २५:६सुमारे इ.स.पू. १४५२

    त्यावेळी ते सभामंडपाच्या दारात रडत असताना, एका इस्राएली पुरुषाने मोशे व संपूर्ण इस्राएली मंडळीसमोर एक मिद्यानी स्त्री आणली.

  24. गणना २५:७सुमारे इ.स.पू. १४५२

    जेव्हा अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने हे पाहिले, तेव्हा तो समुदायातून उठला व त्याने आपल्या हाती एक भाला घेतला

  25. गणना २५:८सुमारे इ.स.पू. १४५२

    आणि त्यांच्यामागे तंबूत गेला व त्या दोघांच्या म्हणजेच तो इस्राएली पुरुष व ती स्त्री यांच्या पोटात तो भाला भोसकला, तेव्हा इस्राएलच्या लोकांमधून पीडा थांबली;