मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना १९:१६सुमारे इ.स.पू. १४७१

    “जो कोणी मोकळ्या मैदानात तलवारीने मारलेल्या व्यक्तीच्या शवाला स्पर्श करतो किंवा कोणी नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला किंवा कोणी मानवी हाडाला किंवा कबरेला स्पर्श करतो, त्याने सात दिवस अशुद्ध राहावे.

  2. गणना १९:१७सुमारे इ.स.पू. १४७१

    “अशुद्ध व्यक्तीसाठी, जाळलेल्या शुद्धतेच्या अर्पणातून थोडी राख घेऊन ती एका पात्रात घेऊन त्यांच्यावर स्वच्छ पाणी ओतावे.

  3. गणना १९:१८सुमारे इ.स.पू. १४७१

    आणि जो मनुष्य विधीनुसार शुद्ध आहे, त्याने एजोबाची फांदी घेऊन ती पाण्यात बुचकळावी व ते तंबू व त्याची पात्रे आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर शिंपडावे. त्याचप्रमाणे ज्यांनी मानवी हाड किंवा कबर किंवा ज्याचा वध झाला किंवा नैसर्गिकरित्या मरण पावलेल्याला स्पर्श केला त्यांच्यावरही ते पाणी शिंपडावे.

  4. गणना १९:१९सुमारे इ.स.पू. १४७१

    जो मनुष्य शुद्ध आहे, त्याने अशुद्ध झालेल्या व्यक्तींवर तिसर्‍या व सातव्या दिवशी हे पाणी शिंपडावे आणि सातव्या दिवशी त्याने त्यांना शुद्ध करावे. ज्यांचे शुद्धीकरण होत आहे त्यांनी आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्या संध्याकाळी ते शुद्ध होतील.

  5. गणना १९:२०सुमारे इ.स.पू. १४७१

    पण जे अशुद्ध आहेत आणि स्वतःला शुद्ध करीत नाहीत, त्यांना समाजातून काढून टाकले जावे, कारण त्यांनी याहवेहचे पवित्रस्थान विटाळविले आहे. शुद्धतेचे पाणी त्यांच्यावर शिंपडले गेले नाही आणि ते अशुद्ध आहेत.

  6. गणना १९:२१सुमारे इ.स.पू. १४७१

    हा त्यांच्यासाठी कायमचा नियम आहे. “जो मनुष्य शुद्धतेचे पाणी शिंपडतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावीत आणि जो कोणी शुद्धतेच्या पाण्याला स्पर्श करतो तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  7. गणना १९:२२सुमारे इ.स.पू. १४७१

    अशुद्ध व्यक्ती ज्या वस्तूला स्पर्श करेल ती अशुद्ध होईल आणि जो कोणी त्या वस्तूला स्पर्श करेल त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.”

  8. गणना २०:१सुमारे इ.स.पू. १४७१

    पहिल्या महिन्यात सर्व इस्राएली लोकांचा समुदाय सीन अरण्यात आला आणि त्यांनी कादेश येथे तळ दिला. तिथे मिर्याम मरण पावली व तिला तिथेच पुरण्यात आले.

  9. गणना २०:२सुमारे इ.स.पू. १४७१

    त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले.

  10. गणना २०:३सुमारे इ.स.पू. १४७१

    लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “याहवेहसमोर आमचे भाऊबंद जेव्हा मरून पडले, तेव्हाच आम्हीही मेलो असतो तर बरे होते!

  11. गणना २०:४सुमारे इ.स.पू. १४७१

    याहवेहच्या समुदायाला तुम्ही या अरण्यात का आणले, आम्ही व आमच्या जनावरांनी मरावे म्हणून आणले काय?

  12. गणना २०:५सुमारे इ.स.पू. १४७१

    इजिप्त देशाबाहेर या भयंकर ठिकाणी तुम्ही आम्हाला का आणले? या ठिकाणी ना धान्य किंवा अंजीर ना द्राक्षवेल किंवा डाळिंबे आहेत आणि प्यायला पाणीही नाही!”

  13. गणना २०:६सुमारे इ.स.पू. १४७१

    मग मोशे व अहरोन मंडळीपुढून निघून सभामंडपाच्या दाराशी गेले व पालथे पडले आणि याहवेहचे तेज त्यांना प्रकट झाले.

  14. गणना २०:७सुमारे इ.स.पू. १४७१

    मग याहवेह मोशेला म्हणाले,

  15. गणना २०:८सुमारे इ.स.पू. १४७१

    “आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मंडळीला एकत्र करा. त्यांच्यासमोर खडकाशी बोल आणि त्यातून पाणी निघेल. तू त्या खडकातून समुदायासाठी पाणी काढशील म्हणजे ते व त्यांचे कळप पाणी पितील.”

  16. गणना २०:९सुमारे इ.स.पू. १४७१

    मोशेने आपली काठी याहवेहच्या उपस्थितीपुढून घेतली आणि जसे आज्ञापिले त्याप्रमाणेच त्याने केले.

  17. गणना २०:१०सुमारे इ.स.पू. १४७१

    मोशे आणि अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर एकत्र केले व मोशे त्यांना म्हणाला, “अहो, बंडखोरांनो, तुम्ही ऐका, या खडकातून आम्ही तुमच्यासाठी पाणी काढावे काय?”

  18. गणना २०:११सुमारे इ.स.पू. १४७१

    मग मोशेने आपला हात उगारला व आपल्या काठीने खडकावर दोनदा वार केला. तेव्हा पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला व समुदायाने आणि त्यांच्या कळपाने पाणी प्याले.

  19. गणना २०:१२सुमारे इ.स.पू. १४७१

    परंतु याहवेह मोशे आणि अहरोन यांना म्हणाले, “कारण इस्राएली लोकांच्या दृष्टीत मी पवित्र असावे इतका सन्मान करण्याइतपत तुम्ही माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवला नाही, मी जो देश त्यांना देऊ करीत आहे त्यात या समुदायाला तुम्ही आणणार नाही.”

  20. गणना २०:१३सुमारे इ.स.पू. १४७१

    हे मरीबाहचे पाणी होते, जिथे इस्राएली लोक याहवेहशी भांडले आणि जिथे याहवेह त्यांच्यामध्ये पवित्र असे सिद्ध केले गेले.

  21. गणना २०:१४सुमारे इ.स.पू. १४७१

    मोशेने कादेशमधून एदोमाच्या राजाकडे निरोप्यांच्या द्वारे हा संदेश पाठविला: “तुझा भाऊ इस्राएल असे म्हणतो: आमच्यावर आलेल्या सर्व कष्टांविषयी तुला ठाऊक आहे.

  22. गणना २०:१५सुमारे इ.स.पू. १४७१

    आमचे पूर्वज खाली इजिप्तमध्ये गेले आणि पुष्कळ वर्षे आम्ही तिथे राहिलो. इजिप्तच्या लोकांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना अयोग्य वागणूक दिली,

  23. गणना २०:१६सुमारे इ.स.पू. १४७१

    पण आम्ही जेव्हा याहवेहचा धावा केला, तेव्हा याहवेहने आमचे रडणे ऐकले, त्यांनी एक दूत पाठवून आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले. “आता आम्ही इथे तुझ्या सीमेवरील टोकावर, कादेश नगरात आहोत.

  24. गणना २०:१७सुमारे इ.स.पू. १४७१

    कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून जाऊ दे. आम्ही कोणत्याही शेतातून किंवा द्राक्षमळ्यातून जाणार नाही किंवा कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. तुझी सीमा ओलांडून जाईपर्यंत आम्ही राजमार्गावरच प्रवास करू.”

  25. गणना २०:१८सुमारे इ.स.पू. १४७१

    पण एदोम म्हणाला: “तुम्ही इथून पार जाऊ शकत नाही; जर तुम्ही प्रयत्न केला, तर आम्ही चाल करून तुमच्यावर तलवारीने हल्ला करू.”