- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना १८:२३सुमारे इ.स.पू. १४७१
लेवी लोक सभामंडपामध्ये सेवा करतील आणि त्याविरोधात केलेल्या अपराधाची जबाबदारी ते स्वतः वाहतील. येणार्या पिढ्यांपर्यंत हा सर्वकाळचा नियम असेल. इस्राएलमध्ये त्यांना वतन मिळणार नाही.
- गणना १८:२४सुमारे इ.स.पू. १४७१
त्याऐवजी इस्राएली लोक जो दशांश अर्पण म्हणून याहवेहला सादर करतात तो मी लेवींना वतन म्हणून देत आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दल मी म्हटले: “त्यांना इस्राएलमध्ये वतन नसणार.”
- गणना १८:२५सुमारे इ.स.पू. १४७१
याहवेह मोशेला म्हणाले,
- गणना १८:२६सुमारे इ.स.पू. १४७१
“लेवी लोकांशी बोल व त्यांना सांग: ‘इस्राएलातून जो दशांश मी तुम्हाला तुमचे वतन म्हणून देतो, जेव्हा तो तुम्हाला मिळतो, त्या दशमांशातील दहावा हिस्सा याहवेहचे अर्पण म्हणून सादर करावा.
- गणना १८:२७सुमारे इ.स.पू. १४७१
तुमचे अर्पण खळ्यातील धान्य किंवा द्राक्षकुंडातील रसाप्रमाणे तुमच्यासाठी गणले जाईल.
- गणना १८:२८सुमारे इ.स.पू. १४७१
याप्रकारे इस्राएलातून जो दशांश तुम्हाला मिळतो त्यातून तुम्ही सुद्धा आपले अर्पण याहवेहला सादर करावे. या दशमांशातील जो याहवेहचा वाटा तो तुम्ही अहरोन याजकाला द्यावा.
- गणना १८:२९सुमारे इ.स.पू. १४७१
तुम्हाला दिलेल्या प्रत्येक वस्तूतील सर्वोत्तम आणि अतिपवित्र भाग याहवेहचा भाग म्हणून तुम्ही सादर करावा.’
- गणना १८:३०सुमारे इ.स.पू. १४७१
“लेव्यांना सांग: ‘जेव्हा तुम्ही सर्वोत्तम भाग सादर करतात, ते तुमच्यासाठी खळ्यातील किंवा द्राक्षकुंडातील उत्पन्न गणले जाईल.
- गणना १८:३१सुमारे इ.स.पू. १४७१
बाकीच्या अर्पणातून तू व तुझ्या घराण्याने कोणत्याही ठिकाणी खावे, कारण सभामंडपातील तुमच्या सेवेसाठी असलेले ते तुमचे वेतन आहे.
- गणना १८:३२सुमारे इ.स.पू. १४७१
सर्वोत्तम भाग सादर केल्यामुळे तुम्ही याबाबतीत दोषी ठरणार नाही; मग तुम्ही इस्राएली लोकांची अर्पणे विटाळविणार नाही व तुम्ही मरणार नाही.’ ”
- गणना १९:१सुमारे इ.स.पू. १४७१
याहवेह मोशे आणि अहरोनला म्हणाले:
- गणना १९:२सुमारे इ.स.पू. १४७१
“याहवेहने आज्ञापिलेल्या कराराचा हा एक नियम आहे: इस्राएली लोकांस सांग की, जी अव्यंग किंवा निर्दोष आणि जिच्यावर कधीही जू घातले नाही अशी तांबड्या रंगाची कालवड त्यांनी तुमच्याकडे आणावी.
- गणना १९:३सुमारे इ.स.पू. १४७१
ती एलअज़ार याजकाकडे द्यावी; तिला छावणीबाहेर न्यावे व त्याच्यासमोर कालवडीचा वध करावा.
- गणना १९:४सुमारे इ.स.पू. १४७१
त्यानंतर एलअज़ार याजकाने तिचे थोडे रक्त आपल्या बोटावर घ्यावे व सभामंडपाच्या समोरील बाजूस सात वेळा ते शिंपडावे.
- गणना १९:५सुमारे इ.स.पू. १४७१
एलअज़ार याजकादेखत ती कालवड; तिचे कातडे, मांस, रक्त व आतडे यासह जाळण्यात यावी.
- गणना १९:६सुमारे इ.स.पू. १४७१
याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी लोकरीचा दोरा घेऊन त्या जळत्या कालवडीवर टाकावा.
- गणना १९:७सुमारे इ.स.पू. १४७१
त्यानंतर याजकाने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी. मग त्याने छावणीत यावे, परंतु विधीनुसार संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे.
- गणना १९:८सुमारे इ.स.पू. १४७१
जो पुरुष ती कालवड जाळतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
- गणना १९:९सुमारे इ.स.पू. १४७१
“शुद्ध असलेल्या एका पुरुषाने कालवडीची राख गोळा करावी व छावणीबाहेर विधीनुसार शुद्ध असलेल्या ठिकाणी ठेवावी. ही राख इस्राएली समाजाने शुद्धीकरणाच्या पाण्यामध्ये वापरावी; ते पापक्षालनासाठी आहे.
- गणना १९:१०सुमारे इ.स.पू. १४७१
जो मनुष्य कालवडीची राख गोळा करतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. इस्राएली लोक आणि त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय लोक यांच्यासाठी हा सर्वकाळचा नियम असावा.
- गणना १९:११सुमारे इ.स.पू. १४७१
“जो कोणी मानवी मृतदेहाला स्पर्श करतो, त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे.
- गणना १९:१२सुमारे इ.स.पू. १४७१
त्यांनी तिसर्या दिवशी व सातव्या दिवशी स्वतःला पाण्याने शुद्ध करावे; मग ते शुद्ध होतील. पण तिसर्या दिवशी व सातव्या दिवशी त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते अशुद्धच असतील.
- गणना १९:१३सुमारे इ.स.पू. १४७१
मानवी मृतदेहाला स्पर्श केल्यानंतरही जर त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते याहवेहचा निवासमंडप विटाळवितात. इस्राएली लोकांमधून त्यांना काढून टाकले जावे. कारण शुद्ध करणारे पाणी त्याच्यावर शिंपडले गेले नाही, ते अशुद्ध आहेत; त्यांचा अशुध्दपणा त्यांच्यावर तसाच राहतो.
- गणना १९:१४सुमारे इ.स.पू. १४७१
“एखादा मनुष्य जेव्हा तंबूमध्ये मरण पावतो त्यावेळी पाळावयाचा नियम हा: जो कोणी त्या तंबूमध्ये प्रवेश करतो आणि जो कोणी तंबूत आहे त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे,
- गणना १९:१५सुमारे इ.स.पू. १४७१
आणि दोरीने झाकण न बांधलेले प्रत्येक उघडे पात्र अशुद्ध असावे.