- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना १७:११सुमारे इ.स.पू. १४७१
याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणेच मोशेने केले.
- गणना १७:१२सुमारे इ.स.पू. १४७१
इस्राएली लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरून जाऊ! आम्ही हरलो आहोत, आम्ही सर्व हरलो आहोत!
- गणना १७:१३सुमारे इ.स.पू. १४७१
जो कोणी याहवेहच्या निवास मंडपाजवळ जरी येईल तरी त्याचा नाश होईल. आम्ही सर्व मरणार आहोत का?”
- गणना १८:१सुमारे इ.स.पू. १४७१
याहवेह अहरोनाला म्हणाले, “पवित्रस्थानासंबंधी झालेल्या अन्यायास तू, तुझे पुत्र आणि तुझे घराणे जबाबदार असणार व याजकपणासंबंधीच्या अपराधासही तू व तुझे पुत्र जबाबदार असणार.
- गणना १८:२सुमारे इ.स.पू. १४७१
तू व तुझे पुत्र कराराच्या नियमाच्या कोशापुढे जेव्हा सेवा करतात तेव्हा तुझ्याशी जडून व तुला मदत करण्यासाठी लेवी वंशातील, तुझ्या पूर्वजांच्या गोत्रातील तुझ्या बांधवांना आपल्यासोबत आण.
- गणना १८:३सुमारे इ.स.पू. १४७१
ते तुला जबाबदार असणार व त्यांनी मंडपातील सर्व कर्तव्ये पार पाडावीत, परंतु त्यांनी पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ किंवा वेदीजवळ जाऊ नये. नाहीतर ते व तुम्हीही मृत व्हाल.
- गणना १८:४सुमारे इ.स.पू. १४७१
त्यांनी तुझ्याशी जडून सभामंडपाच्या सेवेसंबंधी—म्हणजेच मंडपातील सर्व कामासंबंधी जबाबदार असावे—आणि जिथे तू असणार तिथे इतर कोणीही जवळ येऊ नये.
- गणना १८:५सुमारे इ.स.पू. १४७१
“पवित्रस्थान व वेदीच्या सेवेसंबंधी तू जबाबदार असावे, यासाठी की इस्राएली लोकांवर माझा क्रोध पुन्हा भडकू नये.
- गणना १८:६सुमारे इ.स.पू. १४७१
इस्राएली लोकांतून सभामंडपातील सेवाकार्य करण्यासाठी, याहवेहसाठी समर्पित म्हणून लेवी वंशातील तुझे सोबती तुझ्यासाठी भेट म्हणून निवडले आहेत.
- गणना १८:७सुमारे इ.स.पू. १४७१
परंतु वेदी व आतील पडद्यासंबंधी केवळ तू व तुझ्या पुत्रांनीच याजक म्हणून पवित्रस्थानातील पडद्यामागील आणि वेदीवरील पवित्र सेवा करावी. याजकपणाची सेवा मी तुला भेट म्हणून देत आहे. इतर कोणीही जे पवित्रस्थानाच्या जवळ येतील त्यांना जिवे मारावे.”
- गणना १८:८सुमारे इ.स.पू. १४७१
याहवेह अहरोनाला म्हणाले, मला सादर केलेल्या अर्पणांवर मी स्वतः तुला प्रभारी नेमले आहे; सर्व पवित्र अर्पणे जी इस्राएली लोक मला देतात ती मी तुला व तुझ्या पुत्रांना तुमचा वाटा, तुमचा शाश्वत भाग म्हणून देत आहे.
- गणना १८:९सुमारे इ.स.पू. १४७१
जो अग्नीपासून राखला जातो तो अर्पणातील परमपवित्र भाग तुझा व्हावा. परमपवित्र अर्पणे म्हणून ते माझ्यासाठी जे आणतात त्या सर्वांतून, ती अन्नार्पणे किंवा पापार्पणे किंवा दोषार्पणे असो, तो वाटा तुझा व तुझ्या पुत्रांचा आहे.
- गणना १८:१०सुमारे इ.स.पू. १४७१
जसे परमपवित्र वस्तूतील, तसे ते खावे; प्रत्येक पुरुषाने ते खावे, ते तुम्ही पवित्र मानावे.
- गणना १८:११सुमारे इ.स.पू. १४७१
हे देखील तुझे असावे: इस्राएली लोकांच्या हेलावणीच्या अर्पणातील ज्या भेटी बाजूला काढून ठेवल्या जातात, त्या मी तुला व तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना तुमचा शाश्वत वाटा म्हणून देतो. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध असतील त्या प्रत्येकाने ते खावे.
- गणना १८:१२सुमारे इ.स.पू. १४७१
जैतुनाचे सर्वोत्तम तेल आणि सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याच्या हंगामाचे प्रथमफळ म्हणून याहवेहला लोक देतात ते मी तुला देत आहे.
- गणना १८:१३सुमारे इ.स.पू. १४७१
आपल्या भूमीचे सर्व प्रथमफळ लोक याहवेहकडे आणतात ते तुझे होईल. तुझ्या घरातील जे कोणी विधीनुसार शुद्ध आहेत त्या प्रत्येकाने ते खावे.
- गणना १८:१४सुमारे इ.स.पू. १४७१
इस्राएलात याहवेहला समर्पित केलेली प्रत्येक वस्तू तुझी होईल.
- गणना १८:१५सुमारे इ.स.पू. १४७१
उदरातून जन्मलेले प्रत्येक प्रथम जन्मलेले संतान, जे याहवेहला अर्पिलेले आहेत, मग ते मनुष्याचे असो किंवा जनावरांचे, ते तुझे होतील. परंतु प्रत्येक प्रथम जन्मलेल्या पुत्राला व प्रत्येक अशुद्ध जनावराच्या नर वत्साला तू खंडणी भरून सोडवावे.
- गणना १८:१६सुमारे इ.स.पू. १४७१
ते एक महिन्याचे झाल्यावर, पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ठरवलेली खंडणीची किंमत जी पाच चांदीचे शेकेल, म्हणजेच वीस गेरा भरून त्यांची खंडणी भरावी.
- गणना १८:१७सुमारे इ.स.पू. १४७१
गाईचे, मेंढीचे व शेळीचे प्रथमवत्स यांची तू खंडणी भरू नये; ते पवित्र आहे. त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे आणि त्यांची चरबी अन्नार्पण म्हणून जाळावी. हा याहवेहला संतोषविणारा सुगंध आहे.
- गणना १८:१८सुमारे इ.स.पू. १४७१
जसे ओवाळणीचा छातीचा भाग व उजवी मांडी तुझे आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे मांस सुद्धा तुझ्या वाट्याचे होईल.
- गणना १८:१९सुमारे इ.स.पू. १४७१
इस्राएली लोक याहवेहसाठी जी पवित्र अर्पणे आणतात, त्यातील जे काही बाजूला काढून ठेवले जाते, ते मी तुला आणि तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना शाश्वत वाटा म्हणून देत आहे. हा याहवेहसमोर तुझ्यासाठी व तुझ्या संतानांसाठी सर्वकाळचा मिठाच्या करार आहे.
- गणना १८:२०सुमारे इ.स.पू. १४७१
याहवेहने अहरोनाला म्हटले, “त्यांच्या देशात तुला वतन असणार नाही किंवा तुला त्यांच्यात कोणताही वाटा असणार नाही; इस्राएलमध्ये मी तुझा वाटा व तुझे वतन आहे.”
- गणना १८:२१सुमारे इ.स.पू. १४७१
लेवी वंश सभामंडपाची सेवा करताना जी कामे करतात त्याचा मोबदला म्हणून इस्राएलातून येणारा सर्व दशांश मी त्यांना त्यांचे वतन असे देत आहे.
- गणना १८:२२सुमारे इ.स.पू. १४७१
येथून पुढे इस्राएली लोकांनी सभामंडपाजवळ जाऊ नये, नाहीतर त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल व ते मरतील.