- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना १६:११सुमारे इ.स.पू. १४७१
तू व तुझे सर्व अनुयायी असे एकत्र आला ते याहवेहच्या विरोधात आहे. अहरोन कोण आहे की तुम्ही त्याच्या विरोधात कुरकुर करावी?”
- गणना १६:१२सुमारे इ.स.पू. १४७१
मग मोशेने एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम यांना बोलाविले. परंतु त्यांनी म्हटले, “आम्ही येणार नाही!
- गणना १६:१३सुमारे इ.स.पू. १४७१
दूध व मध वाहत असलेल्या देशातून तू आम्हाला या रानात मारण्यास आणले ते पुरे नाही काय? आणि आता तुला आमच्यावर प्रभुत्व करावयाचे आहे!
- गणना १६:१४सुमारे इ.स.पू. १४७१
त्या शिवाय, तू आम्हाला दूध व मध वाहणार्या देशात आणले नाहीस किंवा आम्हाला शेतीचे व द्राक्षमळ्यांचे वतन दिले नाहीस. या पुरुषांना तू गुलाम समजतोस काय? नाही, आम्ही येणार नाही!”
- गणना १६:१५सुमारे इ.स.पू. १४७१
मग मोशे खूप संतापला आणि याहवेहला म्हणाला, “त्यांच्या अर्पणांचा स्वीकार करू नका. त्यांच्या एका गाढवाची देखील मी चोरी केली नाही आणि त्यांच्यातील एकालाही दुखविले नाही.”
- गणना १६:१६सुमारे इ.स.पू. १४७१
पुढे मोशे कोरहाला म्हणाला, “उद्या तुला अनुसरणाऱ्या सर्वांना घेऊन तू येथे याहवेहसमोर ये. तू आणि ते व अहरोनही त्यावेळी हजर असेल.
- गणना १६:१७सुमारे इ.स.पू. १४७१
प्रत्येकाने असे सर्व मिळून आपआपल्या दोनशे पन्नास धुपाटण्या धुपासह याहवेहसमक्ष घेऊन यावे. अहरोन त्याचे आणि तू तुझे धुपाटणे घेऊन हजर व्हावे.”
- गणना १६:१८सुमारे इ.स.पू. १४७१
याप्रमाणे प्रत्येकाने आपले धुपाटणे घेतले, त्यात जळते निखारे व धूप टाकला आणि ते मोशे आणि अहरोन यांच्याबरोबर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबले.
- गणना १६:१९सुमारे इ.स.पू. १४७१
जेव्हा कोरहाने त्यांच्याविरुद्ध असून त्याला अनुसरणाऱ्या सर्वांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ जमविले, याहवेहचे वैभव संपूर्ण समुदायासमक्ष प्रगट झाले.
- गणना १६:२०सुमारे इ.स.पू. १४७१
याहवेह, मोशे व अहरोन यांना म्हणाले,
- गणना १६:२१सुमारे इ.स.पू. १४७१
“तुम्ही या लोकांच्या समुदायापासून दूर व्हा म्हणजे मी क्षणार्धात त्यांचा नाश करेन.”
- गणना १६:२२सुमारे इ.स.पू. १४७१
पण मोशे आणि अहरोन याहवेहपुढे जमिनीवर पालथे पडले व विनंती करून म्हणाले “हे परमेश्वरा, सर्व जीवधार्यांना जीवनाचा श्वास प्रदान करणाऱ्या परमेश्वरा, एकाच मनुष्याने पाप केले तरी तुम्ही सर्व लोकांवर रागावणार काय?”
- गणना १६:२३सुमारे इ.स.पू. १४७१
नंतर याहवेह मोशेला म्हणाले,
- गणना १६:२४सुमारे इ.स.पू. १४७१
“कोरह, दाथान आणि अबीराम यांच्या तंबूपासून सर्व समुदायाला दूर व्हावयाला सांग.”
- गणना १६:२५सुमारे इ.स.पू. १४७१
तेव्हा मोशे दाथान व अबीराम यांच्या तंबूकडे धावत गेला. त्याच्यामागे इस्राएली पुढारीही गेले.
- गणना १६:२६सुमारे इ.स.पू. १४७१
त्वरा करा, मोशे समुदायाला म्हणाला, “या दुष्ट माणसांच्या तंबूंपासून दूर व्हा. त्यांच्या मालकीच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका. नाहीतर त्यांच्या पापामुळे त्यांच्याबरोबर तुमचाही नाश होईल.”
- गणना १६:२७सुमारे इ.स.पू. १४७१
मग कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबूंपासून ते दूर गेले. दाथान व अबीराम हे आपल्या पत्नी, मुले व तान्ही बाळे यांच्यासह आपआपल्या तंबूंच्या दारांशी येऊन उभे राहिले.
- गणना १६:२८सुमारे इ.स.पू. १४७१
त्यावर मोशे म्हणाला, “ज्यागोष्टी मी करतो त्या करण्यास मला याहवेहने पाठविले आहे. हे माझ्या मनाचे विचार नाहीत, हे तुम्हाला यावरून समजेल:
- गणना १६:२९सुमारे इ.स.पू. १४७१
जर हे लोक नैसर्गिक कारणाने अपघाताने मरण पावले, तर याहवेहने मला पाठविले नाही.
- गणना १६:३०सुमारे इ.स.पू. १४७१
परंतु याहवेहने चमत्कार केला आणि या भूमीने आपले तोंड उघडून या लोकांना त्यांच्या सर्व मालमत्तेसह जिवंतपणे अधोलोकात गिळून टाकले, तर या लोकांनी याहवेहला तुच्छ मानले आहे, हे तुम्हाला समजून येईल.”
- गणना १६:३१सुमारे इ.स.पू. १४७१
त्याचे हे बोलणे संपताच, त्या लोकांच्या पायाखालची जमीन एकदम दुभागली
- गणना १६:३२सुमारे इ.स.पू. १४७१
आणि कोरह व त्याचे तंबू त्यांची कुटुंबे आणि त्यांच्याजवळ उभे असलेले त्यांचे मित्र व त्यांच्या सर्व मालमत्तेसह पृथ्वीने गिळून टाकले.
- गणना १६:३३सुमारे इ.स.पू. १४७१
ते जिवंतपणीच अधोलोकात गेले आणि त्यांचा व त्यांच्या मालकीचे जे होते त्यांचा नाश झाला; मग जमीन पूर्ववत झाली, त्यांचा नाश होऊन ते सर्वजण समुदायातून नाहीसे झाले.
- गणना १६:३४सुमारे इ.स.पू. १४७१
त्यांच्या आक्रोशामुळे, “पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकील!” असे म्हणत इस्राएली लोक भीतीने ओरडत पळत सुटले.
- गणना १६:३५सुमारे इ.स.पू. १४७१
नंतर याहवेहपासून अग्नी निघाला आणि त्याने धूपाचे अर्पण करणार्या त्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.