मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना १६:३६सुमारे इ.स.पू. १४७१

    याहवेह मोशेला म्हणाले,

  2. गणना १६:३७सुमारे इ.स.पू. १४७१

    “अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला अग्नीमधून सर्व धुपाटणी ओढून घेण्यास सांगावे. कारण ती पवित्र असून याहवेहला समर्पित केलेली आहेत. त्याचप्रमाणे त्याने तो जळका धूपही थोड्या अंतरावर विखरून टाकावा.

  3. गणना १६:३८सुमारे इ.स.पू. १४७१

    ज्या लोकांनी आपला जीव धोक्यात घालून पाप केले होते, त्या लोकांच्या धुपाटण्यांतील हा धूप विखरून टाकावा. नंतर वेदीला आच्छादन म्हणून त्या धुपाटण्याचे रुंद पत्रे तयार करावेत, कारण ती धुपाटणी याहवेहपुढे वापरली असल्यामुळे पवित्र आहेत. वेदीवरील हा पत्रा इस्राएली लोकांना या प्रसंगाचे चिन्ह म्हणून राहील.”

  4. गणना १६:३९सुमारे इ.स.पू. १४७१

    त्याप्रमाणे एलअज़ार याजकाने ती दोनशे पन्नास कास्याची धुपाटणी घेतली आणि ती ठोकून वेदीला आच्छादन करण्याकरिता त्यांचा पत्रा तयार केला.

  5. गणना १६:४०सुमारे इ.स.पू. १४७१

    कोरह आणि त्याचे सोबत्यांची जी दशा झाली, तशी वेदीपुढे अनाधिकृतपणे धूप जाळणार्‍या म्हणजे अहरोनाचा वंशज नसलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीची होऊ नये, याची आठवण इस्राएली लोकांना देण्याकरिता ते वेदीवरील आच्छादन होते. याप्रमाणे याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा पाळण्यात आल्या.

  6. गणना १६:४१सुमारे इ.स.पू. १४७१

    पण दुसर्‍याच दिवशी सकाळी सर्व इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध पुन्हा कुरकुर करू लागले. ते त्यांना म्हणाले, “तुम्हीच याहवेहच्या लोकांना मारून टाकले.”

  7. गणना १६:४२सुमारे इ.स.पू. १४७१

    लवकरच तिथे मोशे व अहरोनाच्या विरुद्ध समुदाय जमला. तेवढ्यात एकाएकी सभामंडपावर मेघ उतरून याहवेहचे गौरव पसरल्याचे त्यांना दिसले.

  8. गणना १६:४३सुमारे इ.स.पू. १४७१

    मोशे आणि अहरोन सभामंडपाच्या दाराशी येऊन उभे राहिले;

  9. गणना १६:४४सुमारे इ.स.पू. १४७१

    आणि याहवेह मोशेला म्हणाले,

  10. गणना १६:४५सुमारे इ.स.पू. १४७१

    “या लोकांपासून दूर व्हा म्हणजे मला त्यांचा क्षणात नाश करता येईल.” आणि ते जमिनीवर पालथे पडले.

  11. गणना १६:४६सुमारे इ.स.पू. १४७१

    नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, “त्वरा कर. एक धुपाटणे घे. वेदीवरील अग्नी त्यावर ठेव. त्यावर धूप टाक आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर. कारण याहवेहचा कोप त्यांच्यावर भडकला आहे आणि पीडा सुरू झाली आहे.”

  12. गणना १६:४७सुमारे इ.स.पू. १४७१

    मोशेने सांगितल्याप्रमाणे अहरोनाने केले. तो लोकांमध्ये पळत गेला, कारण पीडा त्यांच्यामध्ये सुरू झाली होती. त्याने धूप जाळले आणि लोकांसाठी प्रायश्चित्त केले.

  13. गणना १६:४८सुमारे इ.स.पू. १४७१

    मग तो मृतांच्या आणि जिवंतांच्यामध्ये उभा राहिला आणि पीडा थांबली.

  14. गणना १६:४९सुमारे इ.स.पू. १४७१

    परंतु त्याअगोदरच 14,700 लोक मरण पावले होते. आदल्याच दिवशी कोरहाबरोबर मेलेल्या लोकांव्यतिरिक्त हे आणखी लोक मरण पावले होते.

  15. गणना १६:५०सुमारे इ.स.पू. १४७१

    यानंतर अहरोन मोशेकडे सभामंडपाच्या दाराशी परत आला, कारण पीडा थांबली होती.

  16. गणना १७:१सुमारे इ.स.पू. १४७१

    याहवेह मोशेला म्हणाले,

  17. गणना १७:२सुमारे इ.स.पू. १४७१

    “इस्राएली लोकांशी बोल व त्यांच्याकडून त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्‍याकडून एक काठी अशा बारा काठ्या घे. प्रत्येक पुरुषाचे नाव त्याच्या काठीवर लिही.

  18. गणना १७:३सुमारे इ.स.पू. १४७१

    लेवी वंशाच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण प्रत्येक पूर्वजांच्या गोत्राच्या पुढार्‍याची एक काठी असावी.

  19. गणना १७:४सुमारे इ.स.पू. १४७१

    सभामंडपात जिथे मी तुझी भेट घेत असतो, तिथे कराराच्या नियमाच्या कोशापुढे त्या काठ्या ठेवाव्या.

  20. गणना १७:५सुमारे इ.स.पू. १४७१

    ज्या पुरुषाची मी निवड करेन त्याच्या काठीला अंकुर फुटेल आणि इस्राएली लोक तुमच्याविरुद्ध सातत्याने जी कुरकुर करतात त्यापासून मी स्वतःची सुटका करेन.”

  21. गणना १७:६सुमारे इ.स.पू. १४७१

    म्हणून मोशे इस्राएली लोकांशी बोलला आणि त्यांच्या पुढार्‍यांनी त्याला बारा काठ्या दिल्या, त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्‍याकडून एक काठी आणि त्यांच्यामध्ये एक अहरोनाची काठी होती.

  22. गणना १७:७सुमारे इ.स.पू. १४७१

    मोशेने त्या काठ्या कराराच्या नियमाच्या मंडपात याहवेहसमोर ठेवल्या.

  23. गणना १७:८सुमारे इ.स.पू. १४७१

    दुसर्‍या दिवशी मोशे मंडपात गेला आणि अहरोनाची काठी जी लेवी वंशाच्या वतीने ठेवली होती, ती केवळ अंकुरितच नव्हे तर त्याला कळी आली असून तिच्यावर बदाम पिकलेले दिसले.

  24. गणना १७:९सुमारे इ.स.पू. १४७१

    मग मोशेने त्या सर्व काठ्या याहवेहच्या समक्षतेतून इस्राएली लोकांकडे आणल्या. त्यांनी त्या पाहिल्या आणि प्रत्येक पुढार्‍याने आपआपली काठी घेतली.

  25. गणना १७:१०सुमारे इ.स.पू. १४७१

    तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाची काठी कराराच्या नियमाच्या कोशापुढे परत ठेव, बंड करणार्‍यांना चिन्ह म्हणून ती तिथे ठेवावी. अशाने माझ्याविरुद्ध करीत असलेल्या त्यांच्या कुरकुरीचा शेवट होईल, म्हणजे ते मरणार नाहीत.”