मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय १०:२८सुमारे इ.स. ३३

    जे तुमच्या शरीराचा वध करू शकतात, परंतु आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, अशांना भिऊ नका. तर तुमचा आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकामध्ये जे नाश करू शकतात, त्या परमेश्वराचे मात्र भय धरा.

  2. मत्तय १०:२९सुमारे इ.स. ३३

    दोन चिमण्या एका पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणी तुमच्या पित्याच्या इच्छेविना जमिनीवर पडणार नाही.

  3. मत्तय १०:३०सुमारे इ.स. ३३

    आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत.

  4. मत्तय १०:३१सुमारे इ.स. ३३

    म्हणून भीती बाळगू नका, कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.

  5. मत्तय १०:३२सुमारे इ.स. ३३

    “जो कोणी मला इतरांपुढे जाहीरपणे स्वीकारेल, तर मीही त्याचा माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे स्वीकार करेन.

  6. मत्तय १०:३३सुमारे इ.स. ३३

    जे मला लोकांसमोर नाकारतात, मीही त्यांना माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे नाकारेन.

  7. मत्तय १०:३४सुमारे इ.स. ३३

    “मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे, अशी कल्पना करू नका. शांती देण्यासाठी नाही, तर तलवार चालविण्यास आलो आहे.

  8. मत्तय १०:३५सुमारे इ.स. ३३

    “ ‘मनुष्य आपल्या पित्याविरुद्ध, मुलगी तिच्या आईविरुद्ध, आणि सून तिच्या सासूविरुद्ध करण्यासाठी मी आलो आहे.

  9. मत्तय १०:३६सुमारे इ.स. ३३

    मनुष्याचे शत्रू त्याच्या आपल्याच कुटुंबातील सदस्य असतील.’

  10. मत्तय १०:३७सुमारे इ.स. ३३

    “जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आईवडीलांवर अधिक प्रेम करीत असेल, तर तो मला पात्र नाही; जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या पुत्र व कन्यांवर अधिक प्रेम करीत असेल, तर ते मला पात्र नाही.

  11. मत्तय १०:३८सुमारे इ.स. ३३

    जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो मला पात्र नाही.

  12. मत्तय १०:३९सुमारे इ.स. ३३

    कारण जो कोणी आपला जीव मिळवितो तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल.

  13. मत्तय १०:४०सुमारे इ.स. ३३

    “जे तुमचे स्वागत करतात, ते माझे स्वागत करतात, आणि जे माझे स्वागत करतात, ते ज्यांनी मला पाठविले त्यांचे स्वागत करतात.

  14. मत्तय १०:४१सुमारे इ.स. ३३

    जो संदेष्ट्यांचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो, त्याला संदेष्ट्यांचे प्रतिफळ मिळेल; जो कोणी नीतिमान व्यक्तीचा नीतिमान म्हणून स्वीकार करतो, त्याला नीतिमान व्यक्तीचे प्रतिफळ मिळेल.

  15. मत्तय १०:४२सुमारे इ.स. ३३

    मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या लहानातील एकाला, जो माझा शिष्य आहे, त्याला पेलाभर थंड पाणी प्यावयास दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.”

  16. मत्तय ११:१सुमारे इ.स. ३१

    येशूंनी आपल्या बारा शिष्यांना या सूचना देण्याचे संपविल्यावर, तिथून ते गालील प्रांतातील शहरांमध्ये उपदेश करण्यास व शिक्षण देण्यास गेले.

  17. मत्तय ११:२सुमारे इ.स. ३१

    जेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता, ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी त्याने ऐकले, आपल्या शिष्यांना हे विचारावयास पाठविले,

  18. मत्तय ११:३सुमारे इ.स. ३१

    “जे यावयाचे ते आपण आहात की आम्ही दुसर्‍या कोणाची वाट पाहावी?”

  19. मत्तय ११:४सुमारे इ.स. ३१

    येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही जे ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा:

  20. मत्तय ११:५सुमारे इ.स. ३१

    आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्‍यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते.

  21. मत्तय ११:६सुमारे इ.स. ३१

    जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”

  22. मत्तय ११:७सुमारे इ.स. ३१

    योहानाचे शिष्य निघून गेल्यावर येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्‍याच्या झोताने हलणार्‍या लव्हाळ्याला काय?

  23. मत्तय ११:८सुमारे इ.स. ३१

    जर नाही, तर मग काय पाहावयाला तुम्ही गेला होता? किमती पोशाख घातलेला एखादा पुरुष काय? नाही, भारी पोशाख घालणारे राजाच्या राजवाड्यातच आहेत.

  24. मत्तय ११:९सुमारे इ.स. ३१

    तर मग तुम्ही काय पाहावयास गेला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हाला सांगतो, संदेष्ट्यापेक्षाही अधिक.”

  25. मत्तय ११:१०सुमारे इ.स. ३१

    हा तोच आहे ज्याच्याविषयी लिहिले आहे: “ ‘मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन आणि तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करेल.’