मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय १०:३सुमारे इ.स. ३३

    फिलिप्प आणि बर्थलमय; थोमा आणि मत्तय जकातदार; अल्फीचा पुत्र याकोब आणि तद्दय;

  2. मत्तय १०:४सुमारे इ.स. ३३

    शिमोन कनानी आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने येशूंना विश्वासघाताने धरून दिले.

  3. मत्तय १०:५सुमारे इ.स. ३३

    येशूंनी बारा प्रेषितांना सूचना देऊन पाठविले: “गैरयहूदी लोकांकडे जाऊ नका किंवा शोमरोन्यांच्या कोणत्याही शहरात प्रवेश करू नका.

  4. मत्तय १०:६सुमारे इ.स. ३३

    इस्राएलांच्या हरवलेल्या मेंढराकडे जा.

  5. मत्तय १०:७सुमारे इ.स. ३३

    जात असताना, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे’ अशी घोषणा करा.

  6. मत्तय १०:८सुमारे इ.स. ३३

    आजार्‍यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या.

  7. मत्तय १०:९सुमारे इ.स. ३३

    “प्रवासाला जाताना कमरपट्ट्यात सोने, चांदी किंवा तांबे असे काहीही घेऊ नका.

  8. मत्तय १०:१०सुमारे इ.स. ३३

    तुमच्या प्रवासासाठी थैली किंवा अधिक अंगरखा किंवा पायतण किंवा काठी घेऊ नका; कारण कामकरी अन्नास पात्र आहे.

  9. मत्तय १०:११सुमारे इ.स. ३३

    ज्या एखाद्या शहरात किंवा गावात तुम्ही प्रवेश कराल, त्यावेळी एखाद्या योग्य मनुष्याचा शोध करा आणि निघेपर्यंत त्याच्याच घरी राहा.

  10. मत्तय १०:१२सुमारे इ.स. ३३

    एखाद्या घरात प्रवेश करताना शुभेच्छा द्या.

  11. मत्तय १०:१३सुमारे इ.स. ३३

    ते घर योग्य असेल, तर तुमच्या आशीर्वादाप्रमाणे तिथे शांती नांदेल. पण याउलट परिस्थिती असली तर तुमचा आशीर्वाद तुम्हाकडे परत येईल.

  12. मत्तय १०:१४सुमारे इ.स. ३३

    जर कोणी तुमचे स्वागत केले नाही किंवा तुमचे शब्द ऐकले नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून निघा आणि तुमच्या पायाची धूळ तिथेच झटकून टाका.

  13. मत्तय १०:१५सुमारे इ.स. ३३

    मी तुम्हाला निश्चित सांगतो की, न्यायाचा दिवस सदोम व गमोराला त्या नगरापेक्षा अधिक सुसह्य असेल.

  14. मत्तय १०:१६सुमारे इ.स. ३३

    “मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरांसारखे निर्दोष असा.

  15. मत्तय १०:१७सुमारे इ.स. ३३

    तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल.

  16. मत्तय १०:१८सुमारे इ.स. ३३

    तुम्हाला माझ्या नावासाठी त्यांना व गैरयहूदीयांना साक्ष व्हावी म्हणून अधिकारी व राजांसमोर आणले जाईल.

  17. मत्तय १०:१९सुमारे इ.स. ३३

    तुम्हाला अटक करून नेल्यावर न्यायालयासमोर काय बोलावे व कसे बोलावे याविषयी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला काय बोलावे ते सुचविले जाईल.

  18. मत्तय १०:२०सुमारे इ.स. ३३

    कारण तुम्ही बोलणार नाही पण तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.

  19. मत्तय १०:२१सुमारे इ.स. ३३

    “भाऊ भावाला, पिता आपल्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील.

  20. मत्तय १०:२२सुमारे इ.स. ३३

    माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहतील, त्याचे मात्र तारण होईल.

  21. मत्तय १०:२३सुमारे इ.स. ३३

    तुमचा एका शहरात छळ होऊ लागला की दुसर्‍या शहरात पळून जा. कारण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, मानवपुत्र येण्याअगोदर इस्राएलाच्या नगरांमधून तुमचे फिरणे संपणारच नाही.

  22. मत्तय १०:२४सुमारे इ.स. ३३

    “शिष्य गुरूपेक्षा थोर नाही, किंवा दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही.

  23. मत्तय १०:२५सुमारे इ.स. ३३

    शिष्याने आपल्या गुरू सारखे असणे आणि दासाने आपल्या धन्यासारखे असणे पुरे आहे. जर घर प्रमुखाला बालजबूल म्हटले, तर घरच्या सभासदांना कितीतरी अधिक म्हणतील!

  24. मत्तय १०:२६सुमारे इ.स. ३३

    “तुम्ही त्यांना भिऊ नका, जे प्रकट होणार नाही, असे काही झाकलेले नाही उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही.

  25. मत्तय १०:२७सुमारे इ.स. ३३

    आता मी तुम्हाला अंधारात सांगत आहे, ते दिवसाच्या प्रकाशात सांगा; जे मी तुमच्या कानात सांगत आहे, ते घराच्या धाब्यावरून जाहीर करा.