- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय ८:२५सुमारे इ.स. ३१
तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “प्रभूजी, आम्हाला वाचवा! आपण सर्वजण बुडत आहोत!”
- मत्तय ८:२६सुमारे इ.स. ३१
येशू त्यांना म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?” मग ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले.
- मत्तय ८:२७सुमारे इ.स. ३१
ते पाहून शिष्य चकित झाले आणि एकमेकास म्हणू लागले: “हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात!”
- मत्तय ८:२८सुमारे इ.स. ३१
सरोवराच्या पलीकडे गदरेकरांच्या देशात येशू आले, तेव्हा भुताने पछाडलेले दोन मनुष्य कबरस्तानातून धावत आले व त्यांना भेटले. ती माणसे इतकी हिंसक होती की त्या परिसरातून कोणालाही जाणे शक्य नव्हते.
- मत्तय ८:२९सुमारे इ.स. ३१
येशूंना पाहून ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे परमेश्वराच्या पुत्रा, तुम्हाला आमच्याशी काय काम? ठरलेल्या वेळेपूर्वीच तुम्ही आम्हाला छळण्यास आले आहे का?”
- मत्तय ८:३०सुमारे इ.स. ३१
दूर अंतरावर डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.
- मत्तय ८:३१सुमारे इ.स. ३१
भुतांनी येशूंना विनंती केली, “तुम्ही आम्हाला हाकलून देणार असाल तर आम्हाला डुकरांमध्ये जाण्याची परवानगी द्या.”
- मत्तय ८:३२सुमारे इ.स. ३१
येशू म्हणाले, “जा.” तत्काळ भुते बाहेर आली आणि डुकरांमध्ये शिरली व तो सर्व कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात बुडून मेला.
- मत्तय ८:३३सुमारे इ.स. ३१
डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात धावत गेले आणि त्यांनी ही बातमी सर्वांना सांगितली. भुतग्रस्तांच्या बाबतीत काय घडले हे त्यांनी लोकांना सांगितले.
- मत्तय ८:३४सुमारे इ.स. ३१
तेव्हा नगरातील सर्व लोक येशूंना भेटण्यास गेले आणि त्यांना भेटल्यावर, त्यांच्या भागातून निघून जावे अशी येशूंना विनंती केली.
- मत्तय ९:१सुमारे इ.स. ३१
येशू एका होडीत चढले आणि सरोवराच्या पलीकडे आपल्या शहरात आले.
- मत्तय ९:२सुमारे इ.स. ३१
काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला, खाटेवर ठेऊन त्यांच्याकडे आणले. जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहिला, त्या मनुष्याला म्हणाले, “मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
- मत्तय ९:३सुमारे इ.स. ३१
तेव्हा तिथे उपस्थित असलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात म्हणू लागले, “हा मनुष्य दुर्भाषण करतो!”
- मत्तय ९:४सुमारे इ.स. ३१
त्यांचे विचार येशूंनी ओळखून त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये दुष्टाईने भरलेले विचार का करता?
- मत्तय ९:५सुमारे इ.स. ३१
यातून कोणते म्हणणे सोपे आहे, ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’
- मत्तय ९:६सुमारे इ.स. ३१
तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.”
- मत्तय ९:७सुमारे इ.स. ३१
तेव्हा तो मनुष्य उठला आणि आपल्या घरी गेला.
- मत्तय ९:८सुमारे इ.स. ३१
प्रत्यक्ष घडलेला हा चमत्कार पाहून जमावाला भीती वाटली व ज्यांनी मनुष्यास असा अधिकार दिला त्या परमेश्वराची त्या सर्वांनी स्तुती केली.
- मत्तय ९:९सुमारे इ.स. ३१
मग येशू तिथून गेले, येशूंनी मत्तय नावाच्या एका मनुष्याला जकात नाक्यावर बसलेला पाहिले. येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये,” आणि मत्तय उठला आणि त्यांना अनुसरला.
- मत्तय ९:१०सुमारे इ.स. ३१
नंतर संध्याकाळी येशू आणि त्यांचे शिष्य मत्तयाच्या घरी भोजन करत होते. त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार आणि पापी लोक बसले होते.
- मत्तय ९:११सुमारे इ.स. ३१
ते पाहून परूशी लोकांनी येशूंच्या शिष्यांना विचारले, “तुमचे गुरू जकातदार व पापी लोकांच्या पंक्तीला बसून का जेवतात?”
- मत्तय ९:१२सुमारे इ.स. ३१
हे ऐकून, येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते.
- मत्तय ९:१३सुमारे इ.स. ३१
ते पुढे म्हणाले जा आणि याचा अर्थ काय आहे शिकून घ्या: ‘मला तुमची अर्पणे नकोत.’ पण दया हवी आहे. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे.”
- मत्तय ९:१४सुमारे इ.स. ३१
एके दिवशी बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला, “गुरुजी, आम्ही आणि परूशी लोक उपास करतो तसे तुमचे शिष्य का करत नाहीत?”
- मत्तय ९:१५सुमारे इ.स. ३१
येशूंनी उत्तर दिले, “वराचे पाहुणे वर त्यांच्याबरोबर असताना शोक कसे करू शकतात? परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.