मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय ९:१६सुमारे इ.स. ३१

    “नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल.

  2. मत्तय ९:१७सुमारे इ.स. ३१

    त्याचप्रमाणे कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्याचा नाश होईल. नाही, तसे होऊ नये म्हणून ते नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात आणि दोन्ही सुरक्षित राहतात.”

  3. मत्तय ९:१८सुमारे इ.स. ३१

    हे बोलत आहे तोच, सभागृहाचा पुढारी आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “माझी कन्या नुकतीच मरण पावली आहे, कृपा करून या व आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल!”

  4. मत्तय ९:१९सुमारे इ.स. ३१

    येशू उठून त्याच्याबरोबर गेले आणि त्यांचे शिष्यही त्यांच्याबरोबर निघाले.

  5. मत्तय ९:२०सुमारे इ.स. ३१

    तेव्हा बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी असलेल्या एका स्त्रीने त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला.

  6. मत्तय ९:२१सुमारे इ.स. ३१

    कारण तिने आपल्या मनात म्हटले, “मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन.”

  7. मत्तय ९:२२सुमारे इ.स. ३१

    येशू मागे वळून तिला म्हणाले, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” आणि त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली.

  8. मत्तय ९:२३सुमारे इ.स. ३१

    येशू त्या सभागृहाच्या अधिकार्‍याच्या घरी आले, तेव्हा त्यांनी आकांत करणारा मोठा जमाव तिथे पाहिला. लोक बासरी वाजवून शोक करीत होते.

  9. मत्तय ९:२४सुमारे इ.स. ३१

    ते म्हणाले, “बाहेर जा. मुलगी मरण पावली नाही पण झोपली आहे!” हे ऐकून ते त्यांना हसू लागले.

  10. मत्तय ९:२५सुमारे इ.स. ३१

    शेवटी सर्व जमाव बाहेर आल्यानंतर येशू त्या मुलीला ठेवले होते तिथे गेले; त्यांनी तिच्या हाताला धरून तिला उठविले आणि ती उठून बसली.

  11. मत्तय ९:२६सुमारे इ.स. ३१

    याविषयीची बातमी त्या सर्व प्रदेशात पसरली.

  12. मत्तय ९:२७सुमारे इ.स. ३१

    येशू तिथून पुढे निघाल्यावर, दोन आंधळे माणसे त्यांच्यामागे आले व मोठ्याने म्हणाले, “अहो, दावीदाचे पुत्र, आम्हावर दया करा.”

  13. मत्तय ९:२८सुमारे इ.स. ३१

    जेव्हा ते घरात गेले त्यावेळी ते आंधळे त्यांच्याकडे आले आणि येशूंनी त्यांना विचारले, “मी हे करण्यास समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे काय?” “होय प्रभू,” त्यांनी उत्तर दिले.

  14. मत्तय ९:२९सुमारे इ.स. ३१

    मग येशूंनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि ते त्यांना म्हणाले, “तुमच्या विश्वासानुसार तुम्हासाठी केले जावो.”

  15. मत्तय ९:३०सुमारे इ.स. ३१

    आणि त्याच क्षणाला त्यांना दिसू लागले. येशूंनी त्यांना सक्त ताकीद दिली, “याविषयी कोणालाही काहीही सांगू नका,”

  16. मत्तय ९:३१सुमारे इ.स. ३१

    परंतु याउलट त्यांनी येशूंची किर्ती त्या सर्व भागात पसरविली.

  17. मत्तय ९:३२सुमारे इ.स. ३१

    ते बाहेर जात असताना, एका मुक्या भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले.

  18. मत्तय ९:३३सुमारे इ.स. ३१

    येशूंनी तो दुरात्मा त्याच्यामधून हाकलून लावला, तेव्हा त्या मुक्या मनुष्याला बोलता येऊ लागले. ते पाहून गर्दीतील लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “असा अद्भुत प्रकार इस्राएलात आम्ही कधीच पाहिला नव्हता.”

  19. मत्तय ९:३४सुमारे इ.स. ३१

    परंतु परूशी लोक म्हणाले, “भुतांचा राजा सैतानाच्या साहाय्याने तो भुते घालवितो.”

  20. मत्तय ९:३५सुमारे इ.स. ३१

    येशू सर्व नगरांत व गावात सभागृहांमध्ये शिक्षण देत, राज्याच्या शुभवार्तेची घोषणा करीत आणि प्रत्येक आजार व विकार बरे करीत फिरले.

  21. मत्तय ९:३६सुमारे इ.स. ३१

    त्यांनी समुहाला पाहिले तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते.

  22. मत्तय ९:३७सुमारे इ.स. ३१

    ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत.

  23. मत्तय ९:३८सुमारे इ.स. ३१

    हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून त्यांना विनंती करा.”

  24. मत्तय १०:१सुमारे इ.स. ३३

    येशूंनी आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलाविले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला.

  25. मत्तय १०:२सुमारे इ.स. ३३

    त्यांच्या बारा प्रेषितांची नावे ही: शिमोन ज्याला पेत्र असेही म्हणतात आणि त्याचा भाऊ आंद्रिया; जब्दीचा पुत्र याकोब, त्याचा भाऊ योहान;