circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय ११:११सुमारे इ.स. ३१
मी तुम्हाला निश्चित सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्या व्यक्तीमध्ये योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जो कनिष्ठ आहे, तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.
- मत्तय ११:१२सुमारे इ.स. ३१
योहानाच्या काळापासून आतापर्यंत स्वर्गाचे राज्य मोठ्या शक्तीने पसरत आहे. आणि आवेशी लोक याचे अधिकार प्राप्त करीत आहेत.
- मत्तय ११:१३सुमारे इ.स. ३१
कारण सर्व संदेष्ट्यांनी आणि नियमशास्त्रांनी योहानापर्यंत भविष्यकथन केलेले आहे.
- मत्तय ११:१४सुमारे इ.स. ३१
आणि ते मान्य करण्याची तुमची तयारी असेल तर ऐका: येणारा एलीयाह तो हाच आहे.
- मत्तय ११:१५सुमारे इ.स. ३१
ज्यांना कान आहेत, त्यांनी ऐकावे.
- मत्तय ११:१६सुमारे इ.स. ३१
“या पिढीच्या लोकांची तुलना मी कशाशी करू? बाजारात बसून इतरांना हाक मारणार्या लहान मुलांसारखी ही पिढी आहे:
- मत्तय ११:१७सुमारे इ.स. ३१
“ ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजविली तरी तुम्ही नाचला नाही; आम्ही शोकगीत गाईले, तरी तुम्ही शोक केला नाही.’
- मत्तय ११:१८सुमारे इ.स. ३१
कारण योहान काहीही न खाता किंवा पिता आला होता आणि ते म्हणतात, ‘तो दुरात्म्याने ग्रस्त आहे.’
- मत्तय ११:१९सुमारे इ.स. ३१
मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि ते म्हणतात, ‘पाहा, हा खादाड आणि मद्यपी मनुष्य! जकातदार आणि पापी लोकांचा मित्र!’ परंतु ज्ञान आपल्या कृत्याने खरे सिद्ध झाले आहे.”
- मत्तय ११:२०सुमारे इ.स. ३१
मग ज्या नगरांमध्ये सर्वात अधिक चमत्कार केले होते आणि तरीही त्यांनी पश्चात्ताप केला नाही, त्यांच्यावर येशूंनी टीका करण्यास सुरुवात केली.
- मत्तय ११:२१सुमारे इ.स. ३१
“खोराजिना, तुला धिक्कार असो! बेथसैदा, तुला धिक्कार असो! कारण जे चमत्कार तुमच्यामध्ये केले ते सोर आणि सीदोनात केले असते, तर त्यांनी गोणपाट नेसून आणि डोक्यात राख घालून केव्हाच पश्चात्ताप केला असता.
- मत्तय ११:२२सुमारे इ.स. ३१
परंतु मी तुम्हाला सांगतो, न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सोर व सीदोनला अधिक सुसह्य असेल.
- मत्तय ११:२३सुमारे इ.स. ३१
हे कफर्णहूमा, तुला आकाशापर्यंत उंच केले जाईल काय? नाही, तू नरकात खोलवर जाशील, कारण जी अद्भुत कृत्ये मी तुझ्यात केली ती सदोममध्ये केली असती तर सदोम आजपर्यंत अस्तित्वात असते.
- मत्तय ११:२४सुमारे इ.स. ३१
परंतु मी तुम्हाला सांगतो की न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सदोमाला अधिक सुसह्य असेल.”
- मत्तय ११:२५सुमारे इ.स. ३१
त्यावेळी येशूंनी ही प्रार्थना केली, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्या लोकांपासून या गोष्टी गुप्त ठेऊन, त्या तुम्ही लहान बालकांना प्रगट केल्यास म्हणून मी तुमचे आभार मानतो.
- मत्तय ११:२६सुमारे इ.स. ३१
कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले.
- मत्तय ११:२७सुमारे इ.स. ३१
“माझ्या पित्याने माझ्याकडे सर्वकाही सोपविले आहे. पित्याशिवाय पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पिता कोण आहे हे पुत्राशिवाय, आणि पुत्र ज्यांना प्रकट करण्यास निवडतो त्यांच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.
- मत्तय ११:२८सुमारे इ.स. ३१
“जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन.
- मत्तय ११:२९सुमारे इ.स. ३१
माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.
- मत्तय ११:३०सुमारे इ.स. ३१
कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे.”
- मत्तय १२:१सुमारे इ.स. ३१
शब्बाथाच्या दिवशी येशू धान्याच्या शेतामधून गेले. त्यांच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले.
- मत्तय १२:२सुमारे इ.स. ३१
जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, ते त्यांना म्हणाले, “पाहा! तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते करतात.”
- मत्तय १२:३सुमारे इ.स. ३१
येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता त्यांनी काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?
- मत्तय १२:४सुमारे इ.स. ३१
तो परमेश्वराच्या मंदिरात गेला, त्याने आणि त्याच्या सोबत्यांनी समर्पित भाकरी खाल्या, हे नियमानुसार नव्हते, त्या केवळ याजकांसाठीच होत्या.
- मत्तय १२:५सुमारे इ.स. ३१
किंवा, मंदिरात सेवा करीत असलेले याजक शब्बाथ दिवशी काम करून शब्बाथ विटाळवितात तरी ते निर्दोष असतात, हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय?