circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय १२:३१सुमारे इ.स. ३१
आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रकारचे पाप किंवा निंदा यांची क्षमा होऊ शकेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या निंदेची क्षमा होणार नाही.
- मत्तय १२:३२सुमारे इ.स. ३१
जो कोणी मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करेल, त्याला या युगात आणि येणार्या युगात कधीही क्षमा होणार नाही.
- मत्तय १२:३३सुमारे इ.स. ३१
“जर झाड चांगले असेल तर त्याचे फळ देखील चांगले असते आणि जर झाड चांगले नसेल तर त्याचे फळ देखील चांगले नसते. झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते.
- मत्तय १२:३४सुमारे इ.स. ३१
अहो सापांच्या पिलांनो! तुमच्यासारख्या दुष्टांना चांगले आणि यथायोग्य कसे बोलता येईल? कारण अंतःकरणात जे भरलेले आहे तेच मुखातून बाहेर पडते.
- मत्तय १२:३५सुमारे इ.स. ३१
चांगला मनुष्य आपल्यात साठविलेल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर दुष्ट मनुष्य वाईटाने भरलेल्या साठ्यातून वाईटच बाहेर काढतो.
- मत्तय १२:३६सुमारे इ.स. ३१
मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक निरर्थक शब्दाबद्दल जाब द्यावा लागणार आहे.
- मत्तय १२:३७सुमारे इ.स. ३१
कारण तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही निर्दोष ठराल, किंवा तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही दोषी ठराल.”
- मत्तय १२:३८सुमारे इ.स. ३१
मग परूशी व नियमशास्त्र शिक्षक यांच्यापैकी काही येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्याकडून आम्हास चिन्ह पाहायचे आहे.”
- मत्तय १२:३९सुमारे इ.स. ३१
येशू त्यांना म्हणाले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते! परंतु योनाह संदेष्ट्याच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.
- मत्तय १२:४०सुमारे इ.स. ३१
कारण ज्याप्रमाणे योनाह मोठ्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला, तसेच मानवपुत्र, भूमीच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहील.
- मत्तय १२:४१सुमारे इ.स. ३१
न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे.
- मत्तय १२:४२सुमारे इ.स. ३१
दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठेल आणि त्यांना दंडपात्र ठरवेल, कारण ती शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या टोकाकडून आली; आणि पाहा, आता तर शलोमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे.
- मत्तय १२:४३सुमारे इ.स. ३१
“एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला, म्हणजे तो रुक्ष ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा शोधतो, आणि ती त्याला सापडत नाही,
- मत्तय १२:४४सुमारे इ.स. ३१
त्यावेळी तो म्हणतो, ‘जे घर मी सोडले, तिथे परत जाईन.’ तो परत आला म्हणजे त्याला ते घर रिकामे, झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते.
- मत्तय १२:४५सुमारे इ.स. ३१
नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा अधिक दुष्ट असे आणखी सात दुरात्मे आपल्याबरोबर घेऊन येतो व ते आत जाऊन तिथे राहतात, आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीचे होईल.”
- मत्तय १२:४६सुमारे इ.स. ३१
येशू समुहाशी बोलत असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते.
- मत्तय १२:४७सुमारे इ.स. ३१
कोणी त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत व आपल्याशी बोलू इच्छित आहेत.”
- मत्तय १२:४८सुमारे इ.स. ३१
त्यांनी त्याला उत्तर दिले, “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?”
- मत्तय १२:४९सुमारे इ.स. ३१
मग आपल्या शिष्यांकडे बोट दाखवित ते म्हणाले, “हे माझी आई आणि माझे भाऊ आहेत.
- मत्तय १२:५०सुमारे इ.स. ३१
ते पुढे म्हणाले, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि माझी आई आहे.”
- मत्तय १३:१सुमारे इ.स. ३१
त्याच दिवशी येशू घरातून बाहेर पडले आणि सरोवराच्या किनार्यावर बसले.
- मत्तय १३:२सुमारे इ.स. ३१
तेव्हा लोकांनी त्यांच्याभोवती इतकी मोठी गर्दी केली, म्हणून ते एका होडीत बसून किनार्यावर उभे असलेल्या लोकांना शिकवू लागले.
- मत्तय १३:३सुमारे इ.स. ३१
अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकवीत ते म्हणाले: “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला.
- मत्तय १३:४सुमारे इ.स. ३१
तो बी पेरीत असताना, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले.
- मत्तय १३:५सुमारे इ.स. ३१
काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते झटकन उगवले.