circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय १२:६सुमारे इ.स. ३१
मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा श्रेष्ठ असलेला एकजण येथे आहे.
- मत्तय १२:७सुमारे इ.स. ३१
‘मला तुमची अर्पणे नकोत पण दया हवी आहे.’ या शास्त्रवचनाचा अर्थ तुम्हाला समजला असता तर जे दोषी नाहीत त्यांच्यावर आरोप लावला नसता.
- मत्तय १२:८सुमारे इ.स. ३१
कारण मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.”
- मत्तय १२:९सुमारे इ.स. ३१
नंतर ते तिथून निघाले आणि सभागृहामध्ये गेले.
- मत्तय १२:१०सुमारे इ.स. ३१
तिथे हात वाळून गेलेला एक मनुष्य उपस्थित होता. येशूंवर आरोप सिद्ध व्हावे म्हणून त्यांनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमानुसार आहे काय?”
- मत्तय १२:११सुमारे इ.स. ३१
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “समजा, तुमच्याजवळ एकच मेंढरू आहे आणि शब्बाथ दिवशी ते विहिरीत पडले, तर तुम्ही त्याला धरून वर काढणार नाही काय?
- मत्तय १२:१२सुमारे इ.स. ३१
मग मेंढरापेक्षा मनुष्य कितीतरी पटीने अधिक मोलवान आहे! म्हणून शब्बाथ दिवशी नियमानुसार चांगले करणे योग्य आहे.”
- मत्तय १२:१३सुमारे इ.स. ३१
मग ते त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो दुसऱ्या हातासारखा अगदी चांगला झाला.
- मत्तय १२:१४सुमारे इ.स. ३१
परंतु परूश्यांनी जाऊन येशूंना जिवे कसे मारता येईल याची योजना आखली.
- मत्तय १२:१५सुमारे इ.स. ३१
परंतु त्यांचा कट येशूंनी जाणला, व ते मंदिरातून निघून गेले. त्यांच्यामागे एक मोठा जनसमुदाय निघाला, आणि येशूंनी सर्व आजार्यांना बरे केले.
- मत्तय १२:१६सुमारे इ.स. ३१
त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका, अशी त्यांनी लोकांना सूचनाही दिली.
- मत्तय १२:१७सुमारे इ.स. ३१
या घटनेद्वारे यशायाह संदेष्ट्याने येशूंविषयी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली; ती अशी:
- मत्तय १२:१८सुमारे इ.स. ३१
“पाहा, हा माझा सेवक, ज्याला मी निवडलेले आहे, जो मला प्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन. राष्ट्रांना तो न्याय जाहीर करेल.
- मत्तय १२:१९सुमारे इ.स. ३१
तो भांडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. रस्त्यांमध्ये त्याचा आवाज ऐकू येणार नाही.
- मत्तय १२:२०सुमारे इ.स. ३१
जोपर्यंत तो न्याय विजयास आणणार नाही तोपर्यंत चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही.
- मत्तय १२:२१सुमारे इ.स. ३१
त्याच्या नावावर सर्व राष्ट्रे आपली आशा ठेवतील.”
- मत्तय १२:२२सुमारे इ.स. ३१
नंतर त्यांनी एका भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले, जो आंधळा व मुका होता, आणि येशूंनी त्याला बरे केले, व त्याला बोलता व पाहता येऊ लागले.
- मत्तय १२:२३सुमारे इ.स. ३१
तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हाच दावीदाचा पुत्र असेल काय?”
- मत्तय १२:२४सुमारे इ.स. ३१
परंतु हे ऐकल्यावर परूशी लोक म्हणाले, “हा मनुष्य केवळ बालजबूल, जो भुतांचा राजा सैतान, याच्या साहाय्याने भुते घालवितो.”
- मत्तय १२:२५सुमारे इ.स. ३१
त्यांचे विचार येशूंना माहीत होते, आणि ते त्यांना म्हणाले, “प्रत्येक फूट पडलेल्या राज्याचा नाश होतो किंवा एखाद्या शहरातील किंवा घरातील लोकांत आपसात फूट पडली, तर ते शहर किंवा ते घर टिकू शकत नाही.
- मत्तय १२:२६सुमारे इ.स. ३१
जर सैतानच सैतानाला घालवू लागला आणि त्याच्यात फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल?
- मत्तय १२:२७सुमारे इ.स. ३१
आणि जर मी बालजबूलाच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग, ते तुमचे न्यायाधीश असतील.
- मत्तय १२:२८सुमारे इ.स. ३१
परंतु, मी जर परमेश्वराच्या आत्म्याने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे.
- मत्तय १२:२९सुमारे इ.स. ३१
“किंवा मग, बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याला आधी बांधल्याशिवाय त्याची मालमत्ता लुटून नेणे कसे शक्य होईल? त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.
- मत्तय १२:३०सुमारे इ.स. ३१
“जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो.