मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दुसर्‍या दिवशी सकाळी दावीद उठण्यापूर्वी, दावीदाचा द्रष्टा, गाद संदेष्टा, याच्याकडे याहवेहचे वचन आले:

  2. “जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर, जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ”

  3. तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “तुमच्यासमोर देशभर तीन वर्षांचा दुष्काळ असावा? किंवा शत्रूकडून तुमचा पाठलाग होत असताना तीन महिने तुम्ही त्यांच्यापासून पळ काढावा? किंवा तुमच्या देशात तीन दिवस पीडा यावी? तर आता यावर विचार करून ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.”

  4. दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात आहे. आपण याहवेहच्या हाती पडू, कारण त्यांची कृपा अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.”

  5. दावीदाने जेव्हा लोकांचा नाश करणार्‍या दूताला पाहिले, तो याहवेहला म्हणाला, “मी पाप केले आहे; जो मी मेंढपाळ, तो मी चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो.”

  6. त्या दिवशी गाद दावीदाकडे आला आणि त्याला म्हणाला, “जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध.”

  7. तेव्हा गादद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेनुसार दावीद वर गेला.

  8. अरवनाहने विचारले, “माझे स्वामी आपल्या सेवकाकडे का आले आहेत?” दावीदाने उत्तर दिले, “मी तुझे खळे विकत घेण्यासाठी आलो आहे, लोकांवर आलेली मरी थांबावी म्हणून याहवेहसाठी मी इथे वेदी बांधेन.”

  9. अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामींना मनास येईल ते त्यांनी घ्यावे व अर्पण करावे. हे पाहा होमार्पणासाठी बैल इकडे आहेत आणि लाकडासाठी मळणीची आऊते व बैलाचे जू येथे आहे.

  10. परंतु राजा अरवनाहला म्हणाला, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. फुकट मिळालेले होमार्पण याहवेह माझ्या परमेश्वराला मी अर्पिणार नाही.” म्हणून दावीदाने जात्याचे खळे आणि बैल चांदीचे पन्नास शेकेल देऊन विकत घेतले.

  11. नंतर दावीदाने तिथे याहवेहप्रीत्यर्थ एक वेदी बांधली व होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पिली. तेव्हा दावीदाने देशाच्या वतीने केलेली प्रार्थना याहवेहने ऐकली आणि इस्राएलातील पीडा नाहीशी झाली.

  12. जेव्हा दावीद राजा फार वृद्ध झाला, तेव्हा त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्याला ऊब येत नसे.

  13. परंतु सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, नाथान संदेष्टा, शिमी आणि रेई आणि दावीदाचा खास रक्षक हे अदोनियाहला जाऊन मिळाले नाही.

  14. तेव्हा शलोमोनची आई बथशेबा हिला नाथानाने विचारले, “हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा आता राजा झाला आहे, हे तू ऐकले नाही काय? आणि दावीद आमचे धनी यांना याविषयी काहीच माहिती नाही?

  15. दावीद राजाकडे जा आणि त्यांना सांग, ‘माझ्या स्वामी, आपण आपल्या दासीशी शपथ घेतली नव्हती काय, “खचितच माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन राजा होईल आणि तो माझ्या राजासनावर बसेल” तर मग अदोनियाह कसा राजा झाला?’

  16. मग दावीद राजा म्हणाला, “बथशेबाला आत बोलवा,” तेव्हा ती राजाच्या उपस्थितीत येऊन उभी राहिली.

  17. तेव्हा बथशेबाने भूमीकडे आपले मुख लवून राजासमोर दंडवत घातले आणि म्हटले, “दावीद, माझे स्वामी सदा चिरायू होवोत!”

  18. दावीद राजाने म्हटले, “सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बेनाइयाह यांना आत बोलवा.” जेव्हा ते राजापुढे आले,

  19. याहवेह जसे दावीद, माझ्या स्वामींसोबत होते, तसेच याहवेह शलोमोनसोबतही असो, म्हणजे त्याचे राजासन माझ्या स्वामींच्या राजासनापेक्षा अधिक महान करो.”

  20. तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, करेथी व पलेथी हे खाली गेले आणि शलोमोनला दावीद राजाच्या खेचरावर बसविले आणि त्याला गीहोन येथे नेले.

  21. योनाथानने अदोनियाहास उत्तर दिले, “अजिबात नाही! दावीद आमच्या स्वामींनी शलोमोनास राजा केले आहे.

  22. तसेच, राजकीय अधिकारी येऊन दावीद आपल्या स्वामींना असे म्हणत आशीर्वाद देत आहेत, ‘आपला परमेश्वर तुमच्या नावांपेक्षा शलोमोनचे नाव अधिक प्रसिद्ध करो आणि त्याचे राजासन तुमच्या राजासनापेक्षा मोठे करो!’ आणि राजाने आपल्या पलंगावरून नमन केले

  23. जेव्हा दावीदाचा शेवट जवळ आला, तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोनाला आज्ञा दिल्या.

  24. यानंतर दावीद त्याच्या पूर्वजांसोबत विसावला आणि दावीदाच्या नगरात त्याला पुरले गेले.

  25. दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले.