मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दावीद आणि त्याची माणसे त्यांच्या वाटेने पुढे जात राहिले आणि शिमी त्यांच्या समोरच्या टेकडीकडून, दावीदाला शाप देत, त्याच्यावर दगडफेक करीत व त्याच्यावर धूळ उधळत चालत होता.

  2. तेव्हा दावीदाचा मित्र हूशाई अर्की अबशालोमकडे गेला व त्याला म्हणाला, “राजा चिरायू होवो! राजा चिरायू होवो!”

  3. त्या दिवसांमध्ये अहीथोफेलने दिलेला कोणताही सल्ला जणू काय परमेश्वराकडे विचारल्याप्रमाणे होता. व त्याप्रमाणेच दावीद व अबशालोम त्याचा सल्ला मानीत असत.

  4. अहीथोफेल अबशालोमला म्हणाला, “आज रात्री दावीदाचा पाठलाग करण्यासाठी मला बारा हजार माणसे निवडून घेऊ दे.

  5. आता लवकर निरोप पाठवा आणि दावीदाला सांगा, ‘आजची रात्र रानाच्या उतारावर घालवू नको; तर लवकर पलीकडे जा, नाहीतर राजा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक नष्ट केले जातील.’ ”

  6. आपण शहरात जाताना कोणी पाहून धोका देऊ नये, म्हणून योनाथान आणि अहीमाज एन-रोगेल येथे राहत होते. त्यांनी ही सूचना दावीद राजाला द्यावी म्हणून त्यांच्याकडे एक दासी पाठवली.

  7. ते तिथून निघून गेल्यानंतर, दोघेजण विहिरीतून बाहेर आले आणि दावीद राजाला जाऊन सांगितले, ते त्याला म्हणाले, “लवकर निघा आणि नदी पार करा; अहीथोफेलने तुमच्याविरुद्ध अमुक सल्ला दिला आहे.”

  8. तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबरच्या सर्व लोकांनी यार्देन नदी पार केली. दिवस उजाडेपर्यंत यार्देन पार केली नाही असा कोणीही मागे राहिला नाही.

  9. नंतर दावीद महनाईम येथे गेला आणि अबशालोम सर्व इस्राएली सैन्यासह यार्देन पार करून गेला.

  10. दावीद जेव्हा महनाईम येथे पोहोचला, तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बाह येथील नाहाशाचा पुत्र शोबाई आणि लो-देबार येथील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील गिलआदी बारजिल्लई यांनी

  11. मध व दही, मेंढरे आणि गाईच्या दुधाचा खवा, हे सुद्धा आणले. कारण ते म्हणाले, “रानात दावीद आणि त्याचे लोक थकलेले, भुकेले व तहानलेले झाले असतील.”

  12. दावीदाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना एकत्र करून त्यांची मोजणी केली आणि त्यांच्या हजारांवर सेनापती आणि शंभरांवर सेनापती नेमले.

  13. दावीदाने एकतृतीयांश लोक योआबाच्या हाताखाली, एकतृतीयांश सैन्य योआबाचा भाऊ, जेरुइयाहचा पुत्र अबीशाईच्या हाताखाली आणि एकतृतीयांश इत्तय गित्तीच्या हाताखाली असे आपले सैन्य पाठवले. राजाने सैन्यास सांगितले, “मी स्वतः अवश्य तुम्हाबरोबर चालत जाईन.”

  14. दावीदाच्या सैन्यापुढे इस्राएली सैन्याचा मोड झाला आणि त्या दिवशी वीस हजार लोक मरण पावले.

  15. यावेळी अचानक अबशालोमची दावीदाच्या माणसांशी गाठ पडली. तो त्याच्या खेचरावर बसून जात असता, खेचर एका मोठ्या एला झाडाच्या दाट फांद्यांखालून गेले आणि अबशालोमचे केस त्यात अडकले. तो हवेत लटकत राहिला आणि त्याचे खेचर ज्यावर तो बसला होता ते पुढे चालत राहिले.

  16. दावीद शहराच्या आतील व बाहेरील वेशीच्या मध्ये बसलेला असता. पहारेकरी भिंतीवरून वेशीच्या छपरावर चढून गेला, तेव्हा त्याने पाहिले की एक मनुष्य एकटाच धावत येत आहे.

  17. दावीद राजाने सादोक आणि अबीयाथार याजकांना निरोप पाठवला: “यहूदीयाच्या वडीलजनांना विचारा, ‘जे सर्व इस्राएलात बोलले जात आहे ते राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या राजवाड्यात आणण्यास तुम्ही सर्वात शेवटचे का आहात?

  18. यहूदीयाच्या लोकांबरोबर बहूरीम येथील बिन्यामीन गोत्रातील, गेराचा पुत्र शिमी हा सुद्धा घाईने दावीद राजाला भेटण्यासाठी गेला.

  19. तेव्हा दावीद म्हणाला, “जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला त्याचे काय? तुम्हाला लुडबुड करण्याचा अधिकार कोणी दिला? इस्राएलमध्ये आज कोणाचा मृत्यू व्हावा काय? आज मी इस्राएलचा राजा आहे हे मला समजत नाही काय?”

  20. लवकरच सर्व इस्राएली लोक दावीद राजाकडे येऊन त्यांना म्हणू लागले, “आमचे भाऊबंद, यहूदीयाच्या लोकांनी राजाला का चोरून नेले आणि त्यांना व त्यांच्या घराण्याला, त्यांच्या सैन्यासह यार्देन पार करून नेले?”

  21. यावर इस्राएली लोकांनी यहूदीयाच्या लोकांना उत्तर दिले, “राजामध्ये आम्हाला दहा हिस्से आहेत; म्हणून दावीदावर तुमच्यापेक्षा आमचा हक्क मोठा आहे. मग तुम्ही आम्हाला का तुच्छ लेखता? आमच्या राजाला परत आणण्याविषयी प्रथम आम्ही बोलणे केले नाही काय?” परंतु यहूदीयाच्या माणसांनी इस्राएलच्या लोकांपेक्षा अधिक जोराने दावा केला.

  22. बिन्यामीन गोत्रातील बिकरीचा पुत्र शबा जो फार त्रासदायक होता, तो तिथे आला. त्याने रणशिंग फुंकले आणि ओरडून म्हणाला, “आम्हाला दावीदाबरोबर वाटा नाही, इशायच्या पुत्रामध्ये काही भाग नाही! इस्राएलातील प्रत्येकाने आपल्या तंबूत जावे!”

  23. तेव्हा बिकरीचा पुत्र शबाच्या मागे जाण्यासाठी इस्राएलच्या सर्व पुरुषांनी दावीदाला सोडून दिले. परंतु यार्देनपासून यरुशलेमपर्यंतचे यहूदाह गोत्राचे लोक त्यांच्या राजाबरोबर राहिले.

  24. दावीद जेव्हा यरुशलेमात त्याच्या राजवाड्यात परतला, तेव्हा त्याने राजवाड्याची व्यवस्था पाहण्यासाठी मागे ठेवलेल्या त्याच्या दहा उपपत्नींना घेऊन एका घरात देखरेखीत ठेवले आणि त्यांना सामुग्री पुरविली परंतु त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाही. त्यांच्या मरणाच्या दिवसापर्यंत, विधवांप्रमाणे बंदिवासात ठेवले.

  25. तेव्हा दावीदाने अबीशाईला म्हटले, “अबशालोमाने केलेल्या हानीपेक्षा बिकरीचा पुत्र शबा आपले अधिक नुकसान करेल. तू तुझ्या स्वामीच्या माणसांना घे आणि त्याचा पाठलाग कर, नाहीतर त्याला तटबंदीची शहरे सापडतील आणि तो आपल्यापासून निसटून जाईल.”