मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याप्रमाणे दावीदाने संपूर्ण सैन्य एकत्रित केले आणि तो राब्बाह शहराकडे गेला आणि त्यावर हल्ला करून ते ताब्यात घेतले.

  2. दावीदाने त्यांच्या राजाच्या डोक्यावरून मुकुट काढून घेतला आणि तो स्वतःच्या डोक्यावर ठेवला. त्याचे वजन सोन्याचा एक तालांत होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती. दावीदाने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली

  3. आणि त्या शहरातील लोक जे तिथे होते त्यांना त्याने बाहेर आणले, व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयास लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या नगरांचे असे केले. नंतर तो व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले.

  4. काही काळानंतर, दावीदाचा पुत्र अम्नोन हा तामार, जी दावीदाचा पुत्र अबशालोमची सुंदर बहीण होती, तिच्या प्रेमात पडला.

  5. दावीदाचा भाऊ शिमिआहचा पुत्र योनादाब अम्नोनाचा सल्लागार असून अतिशय धूर्त होता.

  6. दावीदाने राजवाड्यात तामारकडे निरोप पाठवला: “तुझा भाऊ अम्नोन याच्या घरी जा आणि त्याच्यासाठी भोजन तयार कर.”

  7. जेव्हा दावीद राजाने हे सर्व ऐकले, तेव्हा त्याला संताप आला.

  8. ते त्यांच्या मार्गावर असता, दावीदाकडे निरोप आला: “अबशालोमने राजाच्या सर्व पुत्रांना मारून टाकले आहे; त्यांच्यातील एकही जिवंत राहिलेले नाही.”

  9. परंतु दावीदाचा भाऊ शिमिआह याचा पुत्र योनादाब म्हणाला “सर्वच राजपुत्रांना मारून टाकले आहे असा माझ्या धन्याने विचार करू नये; केवळ अम्नोन मरण पावला आहे. कारण अम्नोनाने त्याची बहीण तामार हिच्यावर बलात्कार केला होता, तेव्हापासून अबशालोमाने हा निश्चय केला होता.

  10. अबशालोम तिथून पळाला आणि अम्मीहूदाचा पुत्र, गशूरचा राजा तलमय याच्याकडे गेला. परंतु दावीद राजाने आपल्या पुत्रासाठी पुष्कळ दिवस शोक केला.

  11. आणि दावीद राजाला अबशालोमकडे जाण्याची इच्छा झाली, कारण अम्नोनाच्या मृत्यूबद्दल त्याचे सांत्वन झाले होते.

  12. अबशालोम यज्ञार्पण करीत असताना, त्याने दावीदाचा सल्लागार गिलोनी अहीथोफेल याला सुद्धा त्याचे नगर गिलोह येथून बोलाविले. त्यामुळे कटकारस्थानाला अधिक बळ मिळत गेले व अबशालोमच्या मागे जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली.

  13. तेव्हा एका संदेशवाहकाने येऊन दावीदाला सांगितले, “इस्राएलच्या लोकांची मने अबशालोमशी जडली आहेत.”

  14. तेव्हा दावीद त्याच्याबरोबर यरुशलेमात असलेल्या आपल्या सर्व अधिकार्‍यांना म्हणाला, “चला! आपण पळून जाऊ या, नाहीतर आपल्यातील कोणीही अबशालोमच्या हातून वाचणार नाही. आपण लवकर निघाले पाहिजे, नाहीतर तो त्वरेने आपल्याला गाठून आपल्यावर अरिष्ट आणेल व तलवारीने शहराचा नाश करेल.”

  15. दावीद इत्तयला म्हणाला, “पुढे जा, चालत राहा.” तेव्हा गित्ती इत्तय पुढे चालत गेला. त्याची सर्व माणसे व त्याचे घराणे त्याच्याबरोबर होते.

  16. परंतु दावीद जैतुनाच्या डोंगराकडे रडत रडतच चालत चढत होता; त्याने आपले मस्तक झाकून घेतले होते व अनवाणी चालत होता. त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांनीसुद्धा आपले मस्तक झाकून ते रडत रडत वर चढले.

  17. “अहीथोफेल अबशालोमबरोबर कट रचणाऱ्यांपैकी एक आहे” असे कोणी दावीदाला सांगितले, तेव्हा दावीदाने प्रार्थना केली, “हे याहवेह, अहीथोफेलचा सल्ला मूर्खपणा असे होऊ द्या.”

  18. दावीद जेव्हा डोंगराच्या माथ्यावर जिथे लोक परमेश्वराची उपासना करीत असत तिथे जाऊन पोहोचला, तेव्हा अर्कीचा हूशाई त्याची वस्त्रे फाटलेली व डोक्यात धूळ घातलेला असा दावीदास भेटण्यास तिथे होता.

  19. दावीद त्याला म्हणाला, “तू जर माझ्याबरोबर आलास, तर तू मला भार मात्र होशील.

  20. तेव्हा अबशालोम शहरात प्रवेश करीत असताना, दावीदाचा मित्र हूशाई यरुशलेमात पोहोचला.

  21. जेव्हा दावीद डोंगराच्या माथ्यावर काही अंतरावर गेला, तिथे मेफीबोशेथचा कारभारी सीबा त्याला भेटण्यासाठी तिथे वाट पाहत होता. त्याच्याकडे खोगीर घातलेली गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, मनुक्यांच्या शंभर ढेपा, अंजिराच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा एक बुधला होता.

  22. दावीद राजा बहूरीमजवळ पोहोचताच, एक मनुष्य बाहेर आला, जो शौलाच्या घराण्यातील एका कुळातील होता. त्याचे नाव शिमी होते, तो गेराचा पुत्र होता, तो बाहेर येताच शाप देऊ लागला.

  23. त्याने दावीद व राजाच्या सर्व अधिकार्‍यांवर धोंडमार केली, सर्व सैन्यदल व विशेष अंगरक्षक दावीदाच्या उजव्या व डाव्या बाजूंना होते.

  24. परंतु राजा म्हणाला, “अहो जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला याचे काय? याहवेहनेच जर त्याला सांगितले असले, ‘दावीदाला शाप दे,’ तर ‘तू असे का करतोस,’ असे त्याला कोणी विचारावे?”

  25. तेव्हा दावीद अबीशाई व त्याच्या सर्व अधिकार्‍यांना म्हणाला, “माझा पुत्र, माझे स्वतःचे रक्त-मांस मला मारून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, तर हा बिन्यामीन किती अधिक करेल! त्याला जाऊ द्या; व शाप देऊ द्या, कारण याहवेहने त्याला तसे करण्यास सांगितले आहे.