मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग दावीदाने योआबाला निरोप पाठवला: “उरीयाह हिथी याला माझ्याकडे पाठव.” आणि योआबाने त्याला दावीदाकडे पाठवले.

  2. जेव्हा उरीयाह त्याच्याकडे आला, तेव्हा दावीदाने त्याची विचारपूस करत विचारले योआब कसा आहे, शिपाई कसे आहेत आणि युद्ध कसे चालले आहे.

  3. नंतर दावीद उरीयाहला म्हणाला, “तुझ्या घरी जा आणि आपले पाय धू.” तेव्हा उरीयाह राजवाड्यातून निघाला आणि त्याच्यामागोमाग राजाकडून एक बक्षीस पाठवले गेले.

  4. दावीदाला कोणी सांगितले, “उरीयाह घरी गेला नाही.” तेव्हा त्याने उरीयाहाला विचारले, “तू आताच लष्कराच्या मोहिमेवरून आलास नाही काय? तू घरी का गेला नाहीस?”

  5. उरीयाह दावीदाला म्हणाला, “कोश आणि इस्राएल आणि यहूदीया हे तंबूत राहत आहेत आणि माझा सेनापती योआब आणि माझ्या धन्याची माणसे उघड्या मैदानात तळ देऊन आहेत. तर मी माझ्या घरी जाऊन खाणेपिणे आणि माझ्या पत्नीशी प्रेम कसे करू शकतो? तुमच्या जिवाची शपथ, मी अशी गोष्ट करणार नाही!”

  6. तेव्हा दावीद त्याला म्हणाला, “आणखी एक दिवस येथेच राहा, उद्या मी तुला परत पाठवेन.” त्याप्रमाणे उरीयाह तो दिवस आणि दुसरा दिवस यरुशलेममध्ये राहिला.

  7. दावीदाने त्याला आमंत्रण दिल्यावरून त्याने त्याच्याबरोबर खाणेपिणे केले आणि तो मस्त होईपर्यंत दावीदाने त्याला मद्य पाजले. परंतु संध्याकाळी उरीयाह त्याच्या धन्याच्या सेवकांमध्ये त्याच्या चटईवर झोपण्यासाठी गेला; तो घरी गेला नाही.

  8. सकाळी दावीदाने योआबाला एक पत्र लिहिले आणि ते उरीयाहच्या हाती पाठवले.

  9. जेव्हा त्या शहराची माणसे बाहेर आली आणि त्यांनी योआबाविरुद्ध लढाई केली, तेव्हा दावीदाच्या सैन्यातील काही माणसे युद्धात पडली; व उरीयाह हिथी सुद्धा मारला गेला.

  10. योआबने दावीदाकडे लढाईचा संपूर्ण वृतांत पाठवला.

  11. त्याप्रमाणे संदेशवाहक निघाला आणि पोहोचल्यानंतर त्याने दावीदाला ते सर्वकाही सांगितले जे सांगण्यासाठी योआबने त्याला पाठवले होते.

  12. संदेशवाहक दावीदाला म्हणाला, “ती माणसे आमच्यावर प्रबळ झाली आणि मोकळ्या मैदानात त्यांनी आमच्यावर हल्ला केला, परंतु आम्ही त्यांना शहराच्या प्रवेशद्वाराकडे परत लावून दिले.

  13. दावीदाने त्या संदेशवाहकाला म्हटले, “योआबाला सांग, ‘यामुळे तू निराश होऊ नकोस, कारण तलवार जसे एकाचा तसेच दुसर्‍याचाही नाश करते. त्या नगराविरुद्ध अधिक नेटाने हल्ला करा आणि त्याचा नाश करा.’ योआबाला उत्तेजित करण्यासाठी हे तू त्याला सांग.”

  14. शोककाळ संपल्यानंतर दावीदाने तिला आपल्या घरी बोलावून घेतले आणि ती त्याची पत्नी झाली आणि तिने त्याच्या पुत्राला जन्म दिला. परंतु दावीदाने जे केले होते त्यामुळे याहवेह असंतुष्ट झाले होते.

  15. नंतर याहवेहनी नाथानला दावीदाकडे पाठवले. जेव्हा नाथान त्याच्याकडे आला, तो म्हणाला, “एका शहरात दोन माणसे राहत होती, एक श्रीमंत होता तर दुसरा गरीब.

  16. हे ऐकून दावीद त्या माणसावर रागाने भडकला आणि नाथानला म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्या मनुष्याने असे केले आहे तो मेलाच पाहिजे!

  17. तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस! याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुझा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि तुला शौलाच्या हातातून सोडविले.

  18. नंतर दावीद नाथानाला म्हणाला, “मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” नाथानाने उत्तर दिले, “याहवेहने तुझे पाप दूर केले आहे. तू मरणार नाहीस.

  19. नाथान घरी निघून गेल्यानंतर, उरीयाहच्या पत्नीपासून दावीदाला झालेल्या मुलावर याहवेहने वार केला आणि तो आजारी पडला.

  20. दावीदाने मुलासाठी परमेश्वराकडे याचना केली. त्याने उपास केला व गोणपाट घालून रात्रभर जमिनीवर पडून राहिला.

  21. सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मूल मरण पावले आहे हे दावीदाला सांगण्यासाठी त्याचे सेवक घाबरत होते, कारण त्यांना वाटले, “मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजाविले पण तो आमचे ऐकत नव्हता. तर आता आम्ही त्याला कसे सांगावे की, मूल मरण पावले आहे? तो स्वतःला काही अपाय करून घेईल.”

  22. आपले सेवक एकमेकात कुजबुज करीत आहेत असे दावीदाच्या लक्षात आले, आणि त्याला समजले की मूल मरण पावले आहे. त्याने विचारले, “मूल मरण पावले आहे काय?” “होय, तो मरण पावला आहे.” त्यांनी उत्तर दिले.

  23. तेव्हा दावीद जमिनीवरून उठला, त्याचे स्नान झाल्यानंतर, तैलाभ्यंग करून आपले कपडे बदलले व याहवेहच्या घरात जाऊन त्याने आराधना केली, मग तो आपल्या स्वतःच्या घरात गेला व त्याने मागितल्यानुसार त्यांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, आणि त्याने ते खाल्ले.

  24. नंतर दावीदाने आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले आणि तो तिच्याकडे गेला आणि त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केला. तिने एका पुत्राला जन्म दिला आणि त्यांनी त्याचे नाव शलोमोन असे ठेवले. याहवेहने त्याच्यावर प्रीती केली;

  25. नंतर योआबाने संदेशवाहकांना दावीदाकडे निरोप पाठवित सांगितले, “मी राब्बाहशी युद्ध केले आणि राजदूर्ग ताब्यात घेऊन त्या शहराचा पाणी पुरवठा हस्तगत केला आहे.