मुख्य मजकुरावर जा

Wife बद्दल बायबलमधील वचने

171 वचने · 13 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ती उत्साही व कष्टाळू आहे. कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत.

  2. तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते, आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही.

  3. ती तिच्या हातांमध्‍ये चाती धरते, आणि ती बोटांनी चरकी चालविते.

  4. ती गरिबांना उदारहस्ते देते आणि गरजूंना सढळ हाताने देते.

  5. हिवाळा येतो तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची चिंता करीत नसते; कारण ते सर्वजण किरमिजी वस्त्र घातलेले असतात.

  6. ती तिचा पलंग सजविण्यासाठी चादरी विणते; ती रेशमी तागाचा आणि जांभळा पोशाख घालते.

  7. तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो, जिथे तो देशातील पुढार्‍यांबरोबर बसतो.

  8. ती तागाची वस्त्रे करून विकते आणि व्यापार्‍यांना कमरबंद पुरविते.

  9. बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत. भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते.

  10. तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत. तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते.

  11. घरातील प्रत्येक गोष्टींवर तिचे बारकाईने लक्ष असते; आळसाने मिळवलेली भाकर ती कधीही खात नाही.

  12. तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात; आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो:

  13. “उत्कृष्ट कार्य करणार्‍या अनेक स्त्रिया आहेत, पण त्या सर्वात तू उत्तम आहेस.”

  14. मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते, परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते.

  15. तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर, आणि तिच्या कार्याबद्दल शहराच्या वेशीजवळ तिची प्रशंसा केली जावो.

  16. तरी जारकर्म वाढले आहे म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीशी संबंध ठेवावे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पतीशी.

  17. विवाहित स्त्री म्हणून असलेले सर्व हक्क पुरुषाने आपल्या पत्नीला द्यावेत, आणि पत्नीनेही आपल्या पतीसाठी तसेच करावे.

  18. पत्नीच्या शरीरावर तिचा स्वतःचा अधिकार नाही तर, पतीचा असतो. त्याचप्रमाणे पतीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो तर तो त्याच्या पत्नीला असतो.

  19. एकमेकांची वंचना करू नका, पण प्रार्थनेला वेळ मिळावा म्हणून एकमेकांच्या संमतीने काही काळ अलिप्त राहा. पण तुम्ही पुन्हा एकत्र यावे म्हणजे आत्मसंयमनाच्या अभावी सैतान तुम्हाला मोहात पाडणार नाही.

  20. मी हे आज्ञारूपाने म्हणत नाही परंतु अनुमती म्हणून सांगतो.

  21. आता जे विवाहित आहेत, त्यांच्यासाठी मी एक आज्ञा देतो (मी नाही, पण प्रभू देतात) पत्नीने पतीपासून विभक्त होऊ नये.

  22. पण पत्नी विभक्त झाली असेल, तर तिने दुसरा विवाह करू नये किंवा आपल्या पतीशी समेट करावा. पतीनेही आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ नये.

  23. इतरांना मी हे सांगतो (प्रभू नव्हे, पण मी): एखाद्या भावाची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल आणि ती त्याच्या जवळच राहण्यास तयार असेल, तर त्याने तिला घटस्फोट देऊ नये.

  24. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीचा पती अविश्वासी असेल आणि तिच्याबरोबर राहण्यास तयार असेल, तर तिनेही त्याला घटस्फोट देऊ नये.

  25. कारण अविश्वासी पती, विश्वासणाऱ्या पत्नीद्वारे पवित्र होऊ शकेल आणि अविश्वासी पत्नी, विश्वासणाऱ्या पतीद्वारे पवित्र होऊ शकेल. नाही तर तुमची लेकरे अशुद्ध असती, परंतु ती आता पवित्र आहेत.