मुख्य मजकुरावर जा

Wife बद्दल बायबलमधील वचने

171 वचने · 13 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आजच्या दिवशी पर्शिया व मेदिया या साम्राज्यातील प्रतिष्ठितांच्या स्त्रिया राणीच्या आचरणाबद्धल ऐकून राजाच्या सर्व प्रतिष्ठितांना असाच प्रतिसाद देतील. संपूर्ण साम्राज्यात अपमान व मतभेदाचा अंत राहणार नाही.

  2. “यास्तव, जर महाराजांना मान्य असेल, तर त्यांनी राजाज्ञा द्यावी व तो मेदिया व पर्शिया या प्रांतातील एक न बदलणारा कायदा म्हणून काढावा, त्यात हे नोंदलेले असावे की वश्तीने राजा अहश्वेरोश यांच्या समक्षतेत पुन्हा कधीही येऊ नये. आणि तिच्या जागी हे शाही स्थान ग्रहण करण्यास तिच्यापेक्षा चांगल्या राणीची राजाने निवड करावी.

  3. तुमच्या या विशाल साम्राज्यातून ही राजाज्ञा प्रसिद्ध झाली तर सर्व ठिकाणच्या पतीचा, मग तो लहान असो वा थोर त्यांच्या पत्नीकडून आदर केला जाईल!”

  4. राजा आणि त्याचे सर्व प्रतिष्ठित या सल्ल्याने प्रसन्न झाले, म्हणून राजाने ममुकानच्या सल्ल्याप्रमाणे केले.

  5. त्याने आपल्या राज्यातील सर्व प्रांतांना सर्व स्थानिक भाषेत, प्रत्येक व्यक्तीस त्याच्या भाषेत कळेल असे पत्र पाठविले. ज्याद्वारे जाहीर करण्यात आले की त्यांच्यामधून प्रत्येक पुरुषाने आपल्या घरात सत्ता चालवावी आणि आपल्या अधिकाराची अंमलबजावणी आपल्या मातृभाषेत करावी.

  6. तुझी पत्नी तुझ्या घरात सफल द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोपांसारखी होतील.

  7. होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांना हाच आशीर्वाद असणार.

  8. सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे.

  9. सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते.

  10. ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे. ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे.

  11. मूर्ख संतान म्हणजे वडिलांच्या नाशाचे कारण आहे. आणि भांडखोर पत्नी ही सतत ठिबकणार्‍या गळक्या छप्परासारखी आहे.

  12. पूर्वजांपासून वारसांना घरेदारे व संपत्ती मिळते, परंतु समंजस पत्नी याहवेहपासून मिळते.

  13. भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे.

  14. भांडकुदळ व सतत टोचून बोलणार्‍या पत्नीबरोबर राहण्यापेक्षा वाळवंटात राहिलेले बरे!

  15. भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे.

  16. “तीन गोष्टीमुळे पृथ्वी हादरते, चार गोष्टी ती सहन करू शकत नाही:

  17. एक नोकर जो राजा होतो, देवहीन मूर्ख ज्याला भरपूर खाण्यास मिळते,

  18. तिरस्करणीय स्त्री जी विवाहबद्ध होते, आणि एक मोलकरीण तिच्या मालकिणीची जागा घेते.

  19. सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल? तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.

  20. तिचा पती तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवतो, आणि त्याला कोणत्याही मोलवान वस्तूची उणीव पडत नाही.

  21. आयुष्यभर ती त्याच्या हितासाठी झटते, त्याचे अहित करीत नाही.

  22. ती लोकर व ताग मिळविते आणि कामात गर्क राहून ते पिंजते.

  23. ती एका व्यापारी जहाजासारखी आहे, तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते.

  24. ती रात्र सरताच उठते; आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते.

  25. ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते; तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते.