मुख्य मजकुरावर जा

Wife बद्दल बायबलमधील वचने

171 वचने · 13 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तर आता, माझ्या धन्या, याहवेह तुमच्या जिवंत परमेश्वराची व तुमची शपथ, याहवेहने तुम्हाला रक्तपातापासून आणि तुमच्या हातांना सूड घेण्यापासून आवरले आहे, तुमचे सर्व शत्रू आणि जे माझ्या धन्याला इजा आणू पाहतात ते नाबालाप्रमाणे होवो.

  2. आणि ही भेट, जी तुमच्या दासीने माझ्या धन्यासाठी आणली आहे ती तुमच्या बरोबरच्या माणसांना दिली जावो.

  3. “तुमच्या दासीच्या उद्धटपणाची कृपा करून क्षमा करा. याहवेह तुमचा परमेश्वर खचितच माझ्या धन्याचे राजघराणे कायमचे स्थापित करेल, कारण आपण याहवेहतर्फे युद्ध करत आहात आणि तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या ठायी दुष्टता आढळणार नाही.

  4. जरी कोणा मनुष्याने तुमचा जीव घेण्यासाठी तुमचा पाठलाग केला, तरी माझ्या धन्याचा जीव याहवेह तुमचा परमेश्वर यांच्याजवळ जिवंतांच्या गाठोड्यामध्ये सुरक्षित राहील, परंतु जसे गोफणीच्या झोळीतून फेकावे तसे याहवेह तुमच्या शत्रूंचे प्राण भिरकावून देतील.

  5. याहवेहने माझ्या धन्यासाठी जी चांगली अभिवचने दिली आहेत, ती प्रत्येक गोष्ट पूर्णतेस नेऊन आपणास इस्राएलवर अधिकारी म्हणून नेमल्यावर,

  6. माझ्या धन्याने विनाकारण रक्तपात केल्याविषयी किंवा सूड घेतल्याविषयी तुमच्या मनाला टोचणी लागणार नाही किंवा लटपटणारे ओझे असणार नाही. आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला यश मिळवून देतील तेव्हा आपल्या दासीची आठवण करा.”

  7. दावीद अबीगईलला म्हणाला, “ज्यांनी तुला आज माझी भेट घेण्यासाठी पाठवले, ते याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत.

  8. तुझ्या उत्तम निर्णयामुळे व तू मला आज रक्तपातापासून आणि माझ्या हाताने सूड घेण्यापासून दूर ठेवले त्यामुळे तू आशीर्वादित असो.

  9. नाहीतर जिवंत याहवेह इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला तुझा नाश करण्यापासून आवरले त्यांची शपथ, जर तू त्वरा करून माझी भेट घेण्यास आली नसतीस तर पहाटेपर्यंत नाबालाचा एकही पुरुष जिवंत राहिला नसता.”

  10. नंतर तिने जे काही त्याच्यासाठी आणले होते ते तिच्या हातून दावीदाने स्वीकारले आणि म्हणाला, “शांतीने घरी जा. मी तुझे म्हणणे ऐकले आहे आणि तुझी विनंती मान्य केली आहे.”

  11. जेव्हा अबीगईल नाबालाकडे गेली तेव्हा तो घरात होता, त्याने एका राजासारखी मेजवानी आयोजित केली होती. आणि मद्यपान करून तो फार नशेत होता, म्हणून सकाळ होईपर्यंत तिने त्याला काहीही सांगितले नाही.

  12. नंतर सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर, त्याच्या पत्नीने त्याला घडलेल्या गोष्टी सांगितल्या, ते सर्व नाबालाला सांगितले. तेव्हा त्याच्या हृदयाला धक्का बसला आणि तो दगडासारखा झाला.

  13. सुमारे दहा दिवसानंतर नाबालाला याहवेहने फटका मारला आणि तो मरण पावला.

  14. जेव्हा दावीदाला कळले की, नाबाल मरण पावला आहे, तेव्हा तो म्हणाला, “ज्यांनी माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्यांनी आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरले आहे त्या याहवेहची स्तुती असो. याहवेहने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर आणली आहे.” नंतर अबीगईलने त्याची पत्नी व्हावे म्हणून दावीदाने तिच्याकडे संदेश पाठवला.

  15. त्याचे सेवक कर्मेल येथे जाऊन अबीगईलला म्हणाले, “दावीदाने आम्हाला तुमच्याकडे पाठविले आहे यासाठी की, तुम्हाला त्यांची पत्नी होण्यास आम्ही घेऊन जावे.”

  16. तिने तिचे मस्तक जमिनीपर्यंत लवून म्हणाली, “मी तुमची दासी आहे. मी तुमची सेवा करण्यास व माझ्या धन्याच्या सेवकांचे पाय धुण्यास तयार आहे.”

  17. अबीगईल त्वरित गाढवावर बसली आणि तिच्या पाच दासी घेऊन दावीदाच्या निरोप्यांबरोबर गेली आणि त्याची पत्नी झाली.

  18. सातव्या दिवशी, अहश्वेरोश राजा मद्य पिऊन पूर्णपणे उल्लसित झाला असताना त्याने त्याच्या तैनातीस असलेल्या खोजांना—महूमान, बिजथा, हरबोना, बिग्था, अबग्था, जेथर व कर्खस यांना—

  19. राणी वश्तीला मस्तकावर राजमुकुट घालून आपणाकडे आणण्यास सांगितले. हेतू हा की जमलेले सर्व लोक व प्रतिष्ठितांसमोर तिच्या सौंदर्याचे प्रदर्शन करावे, कारण ती एक अतिशय सुंदर स्त्री होती.

  20. परंतु राजाची आज्ञा जेव्हा खोजांनी वश्ती राणीला कळविली, तेव्हा तिने येण्यास नकार दिला. त्यामुळे राजा अहश्वेरोश संतापला व त्याचा क्रोधाग्नी भडकला.

  21. परंतु चालीरीतींना अनुसरून राजाने कायदा व न्यायात पारंगत व्यक्तीचा सल्ला घेतला. ते ज्ञानी गृहस्थ होते व त्यांना त्या काळाच्या परिस्थितीचे योग्य आकलन होते.

  22. शिवाय जे राजाचे जिवलग मित्र होते—कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शीश, मेरेस, मर्सेना व ममुकान—ते पर्शिया व मेदिया या साम्राज्यातील सात प्रतिष्ठित लोक व सर्वात उच्चाधिकारी होते, ज्यांना राजाच्या सानिध्यात प्रवेश करण्याची खास मुभा होती.

  23. राजाने त्यांना विचारले, “कायद्यानुसार, वश्ती राणीच्या बाबतीत काय करावे? खोजाद्वारे पाठविलेली अहश्वेरोश राजाची आज्ञा तिने पाळली नाही.”

  24. राजा व प्रतिष्ठितांच्या समक्षतेत ममुकानाने उत्तर दिले, “वश्ती राणीने चूक केली आहे, केवळ राजाच्याच विरुद्ध नव्हे तर अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातील सर्व प्रतिष्ठित व नागरिकांच्या विरुद्ध केली आहे.

  25. कारण राणी वश्तीची वागणूक सर्व ठिकाणच्या स्त्रियांना समजल्यावर त्याही आपआपल्या पतीची अवज्ञा करून म्हणतील, ‘अहश्वेरोश राजाने वश्ती राणीस त्याच्या समक्षतेत आणण्याची आज्ञा दिली होती, पण ती आली नाही.’