Skip to content

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने

465 वचने · 94 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडप, सभामंडप उभा करावा.

  2. त्याभोवती अंगण करावे आणि त्या अंगणाच्या प्रवेशद्वारास पडदा लावावा.

  3. “अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडप व त्यातील प्रत्येक वस्तूवर अभिषेक करावा, ते व त्यातील सर्व सामान वेगळे करावे म्हणजे ते पवित्र होईल.

  4. मग होमार्पणाची वेदी व तिची सर्व पात्रे यांचा अभिषेक करावा; वेदीला पवित्र करावे म्हणजे ती वेदी परमपवित्र होईल.

  5. मग गंगाळ व त्याच्या बैठकीस अभिषेक कर व ते समर्पित कर.

  6. “अहरोन व त्याचे पुत्र यांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणावे व त्यांना पाण्याने धुवावे.

  7. मग अहरोनाला पवित्र वस्त्रे घालावीत. त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्याला अभिषेक करून पवित्र करावे.

  8. त्याच्या पुत्रांना आणून त्यांना झगे घालावे.

  9. जसा त्यांच्या पित्याला अभिषेक केला, तसाच त्यांनाही अभिषेक करावा, म्हणजे याजक म्हणून ते माझी सेवा करतील. त्यांचा हा याजकपणाचा अभिषेक पिढ्यान् पिढ्या चालू राहील.”

  10. जसे याहवेहने आज्ञापिले होते, मोशेने सर्वकाही तसेच केले.

  11. दुसर्‍या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडपाची उभारणी करण्यात आली.

  12. जेव्हा मोशेने निवासमंडपाची उभारणी केली, त्याने बैठका जागेवर लावल्या, फळ्या उभ्या केल्या, त्यात अडसर टाकले व खांब उभे केले.

  13. मग मोशेने निवासमंडपावरून तंबू पसरला आणि तंबूवर आच्छादन टाकले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

  14. मग त्याने कराराच्या नियमाच्या पाट्या घेतल्या व त्या कोशामध्ये ठेवल्या, कोशाचे दांडे जोडले व त्यावर प्रायश्चिताचे झाकण लावले.

  15. मग मोशेने कोश निवासमंडपात आणला आणि पडदे अडकविले आणि याहवेहने त्याला आज्ञापिल्याप्रमाणे कराराच्या नियमाचा कोश झाकून घेतला.

  16. मोशेने सभामंडपामध्ये, निवासमंडपाच्या उत्तर दिशेला पडद्याच्या बाहेर मेज ठेवला

  17. व मोशेने त्यावर याहवेहसमोर भाकर ठेवली, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

  18. त्याने सभामंडपामध्ये मेजासमोर, निवासमंडपाच्या दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवला

  19. आणि याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे याहवेहसमोर दिवे लावले.

  20. मग मोशेने सभामंडपात, पडद्याच्या समोर सोन्याची वेदी ठेवली

  21. मग मोशेने निवासमंडपाच्या, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ होमार्पणाची वेदी ठेवली व त्यावर होमार्पण व अन्नार्पण केले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

  22. नंतर मोशेने सभामंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यात पाणी भरून ठेवले,

  23. मग मेघाने सभामंडप झाकले आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला.

  24. मोशे सभामंडपात प्रवेश करू शकत नव्हता कारण त्यावर मेघ होता आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला होता.

  25. इस्राएली लोकांच्या सर्व प्रवासात, जेव्हा निवासमंडपावरून मेघ वर जाई तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत;