Skip to content

Tabernacle बद्दल बायबलमधील वचने

465 वचने · 94 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण मेघ वर गेला नाही, तर तो वर जाईल त्या दिवसापर्यंत ते पुढे जात नसत.

  2. त्यांच्या संपूर्ण प्रवासात निवासमंडपावर दिवसा याहवेहचा मेघ, तर रात्री त्या मेघात अग्नी, असे इस्राएलने पाहिले.

  3. याहवेहनी मोशेला बोलाविले आणि सभामंडपातून त्याच्याशी बोलणे केले. ते म्हणाले,

  4. मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन, निवासमंडप व त्यातील जे सर्वकाही होते, त्यांना अभिषेक करून ती पवित्र केली.

  5. “अशाप्रकारे इस्राएली लोकांना तू अशुद्धतेपासून दूर ठेवावे. आपल्यावर मरणाचा प्रसंग ओढवू नये म्हणून त्यांनी आपल्या अशुद्धतेमुळे त्यांच्यामध्ये ज्या निवासमंडपात मी राहतो तो अशुद्ध करू नये.”

  6. याहवेह मोशेला म्हणाले, “तुझा भाऊ अहरोन याला सांग की कोश व प्रायश्चिताचे झाकण असलेल्या पडद्यामागील परमपवित्रस्थानात त्याची इच्छा होईल तेव्हा येऊ नये, नाही तर त्याला मरण येईल. कारण दयासनावरील ढगात मी प्रकट होत राहीन.

  7. “नंतर त्याने बाहेर जाऊन लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बोकडाचा वध करावा; बोकडाचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि गोर्‍ह्याचे रक्त त्याने ज्या ठिकाणी शिंपडले, त्याच ठिकाणी म्हणजे दयासनावर व दयासनासमोर ते शिंपडावे.

  8. कारण इस्राएली लोकांची अशुद्धता आणि बंडखोरी, त्यांची पापे कोणतीही असोत, अशाप्रकारे त्याने परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित्त करावे. त्याचप्रमाणे त्याने सभामंडपासाठीही असेच करावे, कारण तो त्यांच्यामध्ये उभारला असून त्यांच्या अशुद्धतेने वेढला गेला आहे.

  9. अहरोन प्रायश्चित्त करण्यासाठी परमपवित्रस्थानात जाईल, तेव्हापासून तो परत येईपर्यंत, तो स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबीयांसाठी व सर्व इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित्त करेपर्यंत कोणीही सभामंडपात जाऊ नये.

  10. “मग त्याने तिथून निघून याहवेहसमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्याने गोर्‍ह्याचे व बोकडाचे रक्त घेऊन ते वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.

  11. काही रक्त घेऊन वेदीवर आपल्या बोटांनी सात वेळा शिंपडावे. अशाप्रकारे इस्राएलांच्या अशुद्धतेपासून वेदी शुद्ध व पवित्र करावी.

  12. “परमपवित्रस्थान, सभामंडप व वेदी यांच्यासाठी प्रायश्चित्तविधी पूर्ण केल्यानंतर अहरोनाने जिवंत बोकड आणावा.

  13. परंतु याहवेहच्या निवासमंडपासमोर आणि तो प्राणी सभामंडपाच्या दाराशी याहवेहला अर्पण करण्याकरिता आणला नाही, तर त्या मनुष्याला रक्तपाताचा दोष लागेल; त्याने रक्त सांडले आहे, म्हणून त्याला आपल्या लोकातून बहिष्कृत करावे.

  14. इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले:

  15. परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा.

  16. ज्यावेळी निवासमंडप पुढे जायचा असेल, त्यावेळी लेव्यांनीच तो खाली काढावा आणि ज्यावेळी निवासमंडप उभारावयाचा असेल त्यावेळी लेव्यांनीच तो उभारावा. इतर कोणी निवासमंडपाच्या जवळ गेल्यास त्याला जिवे मारावे.

  17. परंतु लेव्यांनी आपले डेरे कराराच्या निवासमंडपाच्या सभोवती उभारावे, म्हणजे इस्राएली समुदायाविरुद्ध माझा क्रोध पेटणार नाही. लेव्यांनी कराराच्या नियमाच्या निवासमंडपाची जबाबदारी घेऊन त्याची काळजी घ्यावी.”

  18. “लेवीच्या गोत्राने अहरोन याजकाला मदत करावी म्हणून तू त्यांना त्याच्यासमोर सादर कर.

  19. त्यांनी सभामंडपात त्याच्यासाठी आणि संपूर्ण समुदायासाठी निवासमंडपाचे काम करून कर्तव्ये पार पाडावीत.

  20. सभामंडपाच्या सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी, निवासमंडपाचे काम करून इस्राएली लोकांची कर्तव्ये पूर्ण करावी.

  21. याजकाची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याच्या पुत्रांची नेमणूक करावी. इतर दुसरे कोणी पवित्रस्थानाच्या जवळ आले, तर त्यास जिवे मारावे.”

  22. गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे डेरा द्यावा.

  23. कोहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेकडे डेरे द्यायचे होते.

  24. अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते.

  25. ज्यावेळी छावणी पुढे चालण्यास निघेल, त्यावेळी अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी आत जाऊन आडपडदा खाली काढून तो कराराच्या नियमाच्या कोशावर ठेवावा.