- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Slander बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तू जो फसव्या कृतीत गुंतलेला आहे, दिवसभर तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्यासारखी विनाशाची योजना करीत असते.
अगे कपटी जिभे, अपायकारक बोलणे तुला प्रिय आहे!
आपल्या शेजार्यांची गुप्तपणे निंदानालस्ती करणार्यास, मी नष्ट करेन; दुसर्यांकडे तुच्छतेने पाहणार्याचा व अहंकारी हृदयाच्या मनुष्याचा सहवास मला असह्य वाटेल.
कारण दुष्ट आणि कपटी लोकांनी माझ्याविरुद्ध त्यांचे मुख उघडले आहे; ते माझ्याविरुद्ध असत्य गोष्टी बोलले आहेत.
त्यांनी द्वेषपूर्ण शब्दांचा माझ्यावर वर्षाव केला; विनाकारण ते माझ्यावर हल्ला करतात.
जे माझे शत्रू माझ्याविषयी खोट्या गोष्टी उठवितात, त्यांना माझे याहवेह परमेश्वर हाच मोबदला देवो.
त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे; नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते. सेला
याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात, त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो:
खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो, आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो.
जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो, आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय.
भक्तिहीनाच्या मुखातील शब्दांनी त्यांच्या शेजार्याचा नाश होतो, परंतु नीतिमानांचे ज्ञान त्यांना नाशापासून वाचवते.
निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो, पण सुज्ञ मनुष्याचे बोलणे आरोग्यदायी असते.
विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते.
जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो; परंतु जो कोणी ती अप्रिय गोष्ट पुन्हापुन्हा बोलतो त्याचे जवळचे मित्र दूरावतात.
अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.
शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे, जाड काठीने किंवा तलवारीने मारणे किंवा तीक्ष्ण बाण सोडणे यासारखे आहे.
जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो तसेच कावेबाज जीभ—क्रोधित मुद्रेला चेतावणी देते.
लाकूड नसले तर आग विझते; आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते.
अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.
साप वश होण्यापूर्वी जर गारुड्याला चावला, तर गारुड्याला त्याचा काही उपयोग नाही.
त्यांचे बोलणे प्रथम मूर्खतेचे असते; आणि त्यांच्या बोलण्याचा शेवट दुष्टाईच्या वेडेपणाने होतो;
ते सर्व कठोर बंडखोर आहेत, निंदा करीत फिरत आहेत. ते कास्य आणि लोखंडासारखे; त्या सर्वांची वर्तणूक दूषित आहे.
“तुमच्या मित्रांपासून सावध राहा; तुमच्या भाऊबंदावर भरवसा करू नका. कारण त्यांच्यातील प्रत्येकजण फसविणारा आहे, व प्रत्येक मित्र निंदा करणारा आहे.
मी कित्येकांना कुजबुजतांना ऐकले आहे, “सर्व बाजूंनी दहशत! त्याला दोषी ठरवा! चला, त्याला दोषी ठरवू या!” माझे सर्व मित्रगण माझ्या हातून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहेत. ते म्हणतात, “कदाचित त्याची फसवणूक होईल; मग आपण त्याच्यावर वर्चस्व करू आणि आपला सूड उगवू.”
मग हे ऐकताच अधिकारी राजाकडे गेले व म्हणाले, “महाराज, या मनुष्याला जिवे मारलेच पाहिजे. कारण याच्या बोलण्याने नगरात आपल्या उरलेल्या सैनिकांचे आणि जनतेचेही मनोधैर्य खचत आहे, हा या लोकांच्या कल्याणाचे बोलत नाही, तर त्यांच्या नाशाबद्दल बोलतो.”