Skip to content

Slander बद्दल बायबलमधील वचने

116 वचने · 71 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याकोबाने लाबानाच्या पुत्रांचे म्हणणे ऐकले, “आमच्या वडिलांचे जे सर्वकाही होते ते याकोबाने घेतले आहे आणि ही सर्व संपत्ती त्याला जी मिळाली आहे ती आमच्या वडिलांची होती.”

  2. तुमच्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.

  3. “तुम्ही खोट्या अफवा पसरवू नयेत. अन्यायाने साक्षीदार होऊन दोषी व्यक्तीला मदत करू नये.

  4. “ ‘तुमच्या लोकांमध्ये निंदा करीत फिरू नये. “ ‘तुमच्या शेजार्‍याचा जीव धोक्यात येईल असे काहीही करू नका. मी याहवेह आहे.

  5. तुमच्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.

  6. एखाद्याने मत्सराने खोटी साक्ष देऊन कोणावर चुकीचा आरोप लावल्यास,

  7. त्या दोन्हीही इसमांना याहवेहसमोर, त्यावेळी जबाबदार असलेल्या याजकांपुढे आणि न्यायाधीशांपुढे आणावे.

  8. न्यायाधीशांनी त्यांची बारकाईने चौकशी करावी आणि साक्षीदार खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाले व तो दुसर्‍या इस्राएली बांधवावर खोटा आरोप करीत असेल,

  9. तर त्याच्या बांधवाचे जे करण्याचे त्याने मनात योजिले होते, तेच त्याचे करण्यात यावे. अशा रीतीने तुमच्यातील दुष्टाई तुम्ही घालवून टाकावी.

  10. इतर लोक हे ऐकतील व भयभीत होतील आणि तुम्हामध्ये अशी दुष्टाई पुन्हा कधीही घडणार नाही.

  11. खोट्या साक्षीदाराला तुम्ही दया दाखवू नये: जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय.

  12. एखाद्या पुरुषाने पत्नी केली आणि तिच्याशी समागम केल्यानंतर ती त्याला आवडेनाशी झाली

  13. आणि तिची निंदा केली आणि तिच्या नावाची बदनामी करून म्हटले, “मी या स्त्रीसोबत लग्न केले, पण जेव्हा मी तिच्याजवळ गेलो तेव्हा तिच्यात मला कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,”

  14. तर मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा, त्या नगराच्या वेशीत वडील मंडळीपुढे साजरा करावा.

  15. तिच्या वडिलांनी त्यांना असे सांगावे, “मी माझी कन्या या मनुष्याला त्याची पत्नी व्हावी म्हणून दिली, परंतु आता ती त्याला आवडत नाही.

  16. आता त्याने तिची निंदा केली आणि म्हणाला, ‘मला तुमच्या कन्येमध्ये कौमार्याबद्दलचे पुरावे आढळले नाही.’ पण हे पाहा आमच्या कन्येच्या कौमार्याबद्दलचा पुरावा.” मग तिच्या आईवडिलांनी ते वस्त्र नगराच्या वडीलांपुढे सादर करावे,

  17. आणि मग नगरातील वडील मंडळीने त्या पुरुषाला घ्यावे आणि त्याला शिक्षा द्यावी.

  18. शंभर चांदीची नाणी दंडादाखल त्याच्याकडून वसूल करावी आणि मुलीच्या वडिलांना द्यावीत, कारण त्या तरुणाने एका इस्राएली कुमारिकेची बदनामी केली. ती त्याची पत्नी म्हणून राहील; तो जिवंत असेपर्यंत त्याने तिला कदापि घटस्फोट देऊ नये.

  19. परंतु शौलाच्या अधिकार्‍यांबरोबर उभा असलेला दवेग एदोमी म्हणाला, “मी नोब येथे इशायच्या पुत्राला अहीतूब याचा पुत्र अहीमेलेख याच्याकडे येताना पाहिले.

  20. अहीमेलेखने त्याच्यासाठी याहवेहकडे चौकशी केली; त्याने त्याला काही अन्नसामुग्री व पलिष्टी गल्याथाची तलवार सुद्धा दिली.”

  21. तेव्हा राजाने अहीतूबचा पुत्र अहीमेलेख याजक आणि त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुष, जे नोब येथे याजक होते यांना बोलाविणे पाठविले आणि ते सर्व राजाकडे आले.

  22. तो शौलाला म्हणाला, “तुम्ही लोकांचे का ऐकता, जेव्हा ते म्हणतात, ‘दावीद तुला इजा करण्यास पाहत आहे’?

  23. तेव्हा अम्मोनी अधिकार्‍यांनी त्यांचा धनी हानून याला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवून आपल्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ शहराची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?”

  24. तेव्हा राजाने विचारले, “तुझ्या धन्याचा नातू कुठे आहे?” सीबा त्याला म्हणाला, “तो यरुशलेमात राहत आहे, कारण त्याला असे वाटते, ‘इस्राएलचे लोक मला माझ्या आजोबांचे राज्य आज परत मिळवून देतील.’ ”

  25. मग दोन अधम व्यक्ती त्याच्यासमोर येऊन बसले आणि लोकांसमक्ष नाबोथविरुद्ध आरोप आणले. ते म्हणाले, “नाबोथने परमेश्वराला व राजाला शाप दिला आहे.” म्हणून त्यांनी त्याला शहराच्या बाहेर नेले आणि तो मरेपर्यंत त्याला धोंडमार केली.