Skip to content

Slander बद्दल बायबलमधील वचने

116 वचने · 71 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीतही त्यांनी असेच केले. बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबील आणि त्यांचे साथीदार यांनी पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत व अरामी लिपीत पत्र पाठविले.

  2. राज्यपाल रहूम, शिमशय लेखक यांनी यरुशलेमविरुद्ध पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत असे पत्र लिहिले:

  3. राज्यपाल रहूम, शिमशय लेखक, तसेच अनेक न्यायाधीश, स्थानिक पुढारी आणि पर्शियाचे, बाबेलच्या येरेक आणि सुसा येथील एलामी लोक त्यात सामील होते.

  4. तसेच इतर अनेक राष्ट्रांचे लोकही या पत्राच्या लेखनात गोवलेले होते. त्यांना महान आणि थोर आसनपर ने त्यांच्या स्वतःच्या देशातून काढून पुन्हा यरुशलेमात, शोमरोनात व फरात नदीच्या पश्चिमेला असलेल्या प्रदेशांमध्ये वसविले होते.

  5. अर्तहशश्त राजास त्यांनी पाठविलेल्या पत्रात असा मजकूर होता: अर्तहशश्त महाराज, फरात नदीच्या पश्चिमेला राहणार्‍या आपल्या विश्वासू प्रजाजनांकडून आपणास शुभेच्छा.

  6. कृपया राजास ही बाब विदित असावी की, बाबेलमधून यरुशलेमला पाठविलेले यहूदी लोक हे बंडखोर आणि दुष्ट शहर पुन्हा बांधत आहेत. ते या शहराचे कोट पुन्हा बांधत आहेत व मंदिराच्या पायाची दुरुस्तीही सुरू झाली आहे.

  7. परंतु हे शहर पुन्हा बांधले गेले, शहराचे कोट पुन्हा बांधले, तर त्यात महाराजांचे नुकसान आहे, कारण मग यहूदी लोक आपली खंडणी, नजराणे व कर भरण्यास नकार देतील.

  8. आमचे आश्रयदाते म्हणून आम्ही आपले ॠणी आहोत आणि महाराजांच्या चांगुलपणाचा असा गैरफायदा घेऊन, आपली अप्रतिष्ठा व्हावी, हे आम्हाला बघण्याची इच्छा नाही. म्हणून आम्ही ही बातमी महाराजांस पत्र पाठवून कळवीत आहोत.

  9. आम्ही आपणास अशी विनंती करतो की आपण या शहराचा राजद्रोहाचा जुना इतिहास आपल्या पूर्वजांच्या जुन्या कागदपत्रात शोधून पाहावा, म्हणजे हे नगर मागील काळात किती बंडखोर होते हे आपणास आढळून येईल. राजांच्या विरुद्ध आणि त्याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या राष्ट्रांविरुद्ध बंडाळी केल्यामुळेच या नगराचा नाश करण्यात आला होता.

  10. आता आम्ही असे जाहीर करू इच्छितो की जर हे नगर परत बांधले गेले आणि त्याची तटबंदी पूर्ण झाली, तर फरात नदीच्या पलीकडील काहीही प्रदेश महाराजांच्या ताब्यात राहणार नाही.

  11. त्या पत्रात असा मजकूर होता: “देशादेशात असे ऐकिवात येत आहे की—गेशेमचे म्हणणे आहे की हे सत्य आहे की, यहूदी लोक बंड करण्याची योजना आखीत आहेत आणि त्यासाठीच तू हा तट बांधत आहेस. असेही म्हटले जाते की तू त्यांचा राजा बनणार आहेस,

  12. आता हामान अहश्वेरोश राजास म्हणाला, “सर्व प्रांतात एका विशिष्ट जातीचे लोक विखुरलेले आहेत, जे स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवतात. त्यांचे रीतिरिवाज इतर लोकांपासून भिन्न आहेत, हे लोक राजाचे कायदे पाळत नाहीत; म्हणून या लोकांचे असे वागणे सहन करणे राजाच्या हिताचे नाही.

  13. जिभेच्या तडाख्यापासून तू सुरक्षित राहशील, विनाश आल्यावर तुला भय बाळगण्याचे नाही.

  14. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?

  15. जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही, जो आपल्या शेजार्‍यांचे वाईट करीत नाही, आणि इतरांना काळिमा लावत नाही;

  16. कारण अनेकांना कुजबुजतांना मी ऐकले आहे. “सर्व बाजूने दहशत आहे!” ते माझ्याविरुद्ध कट रचीत आहे आणि माझा जीव घेण्यासाठी ते तयार आहेत.

  17. तर तू आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ असत्य बोलण्यापासून राखावे.

  18. हे दुष्ट लोक शपथेवर खोटे बोलतात; ज्या गोष्टींची मला जाणीवही नाही, अशा गोष्टीचे आरोप ते मजवर करतात.

  19. माझा जीव घेऊ पाहणारे त्यांचे जाळे रचतात, मला इजा करणारे माझ्या नाशाबद्दल बोलतात; ते दिवसभर फसवणूक आणि लबाडी करतात.

  20. माझे शत्रू माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात, “तो केव्हा मरणार आणि त्याचे नाव विसरले जाणार?”

  21. जेव्हा त्यांच्यापैकी कोणी मला भेटायला येतो, तेव्हा तो पोकळपणा दर्शवितो, तो अंतःकरणात वाईटाचा संग्रह करतो; तो बाहेर जाऊन या गोष्टीचा प्रचार करतो.

  22. माझे सर्व शत्रू एकत्र मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात; माझ्याबाबतीत वाईट बेत आखतात.

  23. “त्याला असाध्य रोग झालेला आहे; तो आता या रोगशय्येवरून पुन्हा उठणार नाही,” असे ते म्हणतात.

  24. प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील, ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता, ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.

  25. तुम्ही बसून आपल्या भावाविरुद्ध साक्ष देता आणि आपल्या सख्ख्या भावाची निंदा करता.